नवीन लेखन...

ऊर्जा संवर्धन



हवा, अन्न, पाणी ,वस्त्र निवारा या आजपर्यंतच्या आपल्या अत्यावश्यक गरजा आहेत. आता यात आणखी एक महत्वाच्या गरजेची भर पडली आहे.किंबहुना याशिवाय दैनंदिन जीवन विस्कळीत होवून जगणे अशक्य होण्यापर्यत मजल गेली आहे. त्या गरजेचे नाव आहे वीज. ही वीज खर्‍या अर्थाने आज पावर झाली आहे.माणसाच्या गरजा जशा वाढत चालल्या, तसे विजेचा वापर वाढत चाललाय. जीवनात आधुनिकता येत असल्यामुळं चैन म्हणून जशी वीज वापरली जाते, तशी ती अत्यावश्यक भाग म्हणूनही वापरली जाते. किंबहुना एखाद्या देशाची प्रगती या देशातले लोक विजेचा कितपत करतात (कॉपिटा कन्झंमशन ऑफ पॉवर ) यावर ठरविले जाते.भारतात दर माणसी दरवर्षी जवळपास ६०० युनिट वीज वापरली जाते.प्रगत देशात अमेरिकेत किंवा युरोपमध्ये हाच दर प्रती माणसी १२००० युनिट आहे. पाणी वीज वापरासाठी विजेची उपलब्धता असणं हेही तेवढचं आवश्यक आहे. जगाच्या नाही, किमान आपल्या देशाचा किंवा प्रांताचा विचार केला तर आपणास असं दिसून येईल की, विजेच्या वापराची आपली क्षमता वाढलेली असली तरीही उपलब्धता नसल्यामुळं आपण वीज वापरु शकत नाही. महाराष्ट्रापुरता विचार केला तर आपली वीज वापराची क्षमता १६००० मेगावॅट इतकी वाढली आहे.भविष्यात मागणी कितीतरी पटीनं वाढण्याची शक्यता आहे.आज उपलब्ध असलेल्या वीज निर्मिती क्षमतेपैकी ९० ते १० हजार मेगावॅट वीजच आपण वापरु शकतो.या प्रचंड तफावतीमुळं भारनियमन किंवा लोड शेडिंग करावं लागतं.भारनियमनामुळं शेती उद्योग संकटात येऊ शकतो.मोठयामोठया कारखान्यातलं उत्पादन घटतं.क्षमतेइतका माल उत्पादित होऊ शकत नाही. त्यामुळं उत्पादित वस्तुच्या किंमती वाढतात.पाणी असून शेतीला पाणी देता येत नाही. शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन जातं.खेडी अंधकारमय होतात.तात्पुरत्या उपाय योजनामुळं हा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार नाही.नवीन वी

ज निर्मिती योजना मंजूर करुन या कार्यान्वीत करणं आणि मोठया खर्चाची तरतूद करणं हे एकदम शासनालासुध्दा

शक्य नाही.यासाठी निश्चितपणे वेळ लागणार आहे.

मग तोपर्यत काय ? हा प्रश्न बहुतेकाच्या मनात असतो.यावर काही उपाय आहे काय ? निश्चित आहे.यासाठी जनतेनं पर्यायानं वीज वापर करणार्‍या वीज उपभोक्त्यांनी पुढाकार घेऊन विजेचा वापर कमीत कमी कसा करता येईल ते पहावं.आज प्रत्येक ठिकाणी अनिर्बंधपणे विजेचा वापर होत असल्याचं आपण पाहतो.ज्यांची वीज मापक यंत्र (मीटर) बंद पडलेली आहेत अशा ठिकाणी तर दिवस रात्र वीज चालू असते.अगदी रस्त्यावरील दिव्यापासून सणासमारंभापर्यत, घरातील दिव्यांपासून सार्वजनिक कार्यक्रमातील रोशनाईपर्यत, विविध कार्यालयापासून ते पंचतारांकित हॉटेल्स, मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स या अनेकांकडून होणारा गैरवापर आपण दररोज पाहतो. विजेची चोरी ही तर फार मोठी समस्या आहे.हवा, पाणी काही प्रमाणात अन्न ही नैसर्गिक संपत्ती आहे.याचा जपून वापर करावा.अपव्यय हाऊ नये हे आपणास लहानपणापासून शिकविलं जातं.वीज ही नैसर्गिक नाही.तिची निर्मिती वेगवेगळे स्त्रोत आणि पर्याय वापरुन करावी लागते.यासाठी खूप मोठा खर्च करावा लागतो.आपल्या घरातला एक दिवा (बल्ब किंवा टयूब) चालू ठेवण्यासाठी शासनानं अकरा हजार रुपये खर्च केलेले असतात.हे किती जणांना ठाऊक असतं.वीज निर्मितीच्या ठिकाणापासून प्रत्यक्ष वीज वापर करणार्‍या ग्राहकाच्या दारात वीज आणेपर्यत १५ टक्के विजेची तूट तांत्रिकदष्टया येते.वीज वितरण कंपनीचे आकडेच असे सांगतात की, ही तूट ३५ टक्क्यांच्या पुढे आहे. काही भागात तर ४५ ते ४६ टक्के विजेची तूट असते.मग ही वीज जाते कुठे ? याचा शोध घेणं जसं महत्वाचं आहे तसं विजेच्या चोरीबाबत कायदा कडकपणे राबवून वीज चोरांना शासन होणं आवश्यक आहे.विजेची एक टक्का तूट कमी केली तर वितरण
कंपनीना २२० कोटी रुपये जास्त मिळतात.अशा प्रकारे किमान १० टक्के तूट कमी झाली तर प्रतिवर्षी २२०० कोटी रुपये जास्त मिळतील.ज्यातून ४०० मेगावॉट विजेची निर्मिती करणं शक्य होईल.आपल्याकडं सध्या असलेल्या वीज टंचाईच्या समस्येवर महत्वाचा उपाय म्हणजे वीज वाचविणं यासाठी वीज वापर करणार्‍या ग्राहकांना वीज बचतीचं प्रबोधन करणं, वीज वापरांसंबधी उद्बोधक माहिती देणं. वीज ग्राहकांचे जागो जागी मेळावे घेऊन कशा प्रकारे वीज वापर कमी करता येते याचं प्रात्याक्षिक दाखविणं हे गरजेचं झालं आहे.उदाहरणार्थ शहरी किंवा ग्रामीण भागात देवी देवतांच्या पुढं २४ तास बल्ब लावला जातो.तो झिरो वॅटचा असतो असा बर्‍याच जणांचा गैरसमज.प्रत्यक्षात तो १५ वॅटचा असतो.त्यामुळं होणारं नुकसान लाखोच्या घरात आहे. तसेच प्रत्येकानं रिमोटवर टी.व्ही बंद न करता मुख्य बटन बंद केलं तर एका २५ वॅट इतका दिव्याचा प्रकाश आपण वाचवू शकतो.म्हणजे फक्त रिमोटवरुन टी.व्ही. बंद करणं थांबविलं तर देशात होणार्‍या वीज बचतीमुळं कित्येक जिल्हयांना वीज पुरवठा करणं शक्य होईल. अशा प्रकारच्या अनेक छोटया छोटया घटनामुळं वाचणारी वीज काय करु शकते, याची माहिती थक्क करणारी आहे. महाराष्ट्रातल्या एक कोटी ६२ लाख वीज ग्राहकांपैकी निम्म्या वीज ग्राहकांने एक दिवा किंवा टयूब कायमचा बंद केला तर ५०० मेगावॅट वीज वाचविली जाऊ शकते. पर्यायानं याचा उपयोग इतर ग्राहकांना होऊन याप्रमाणात भारनियमन कमी होण्यास मदतच होईल आणि हे शक्य आहे.शिवाय वीज बचत योग्य, वीज वापर, वीज बील कसे तपासावे, वीज संबंधीच्या तक्रारी, वीज कायदा, इलेक्ट्रीसिटी ऍक्ट २००३ एनर्जी कर्न्झवेशन ऍक्ट २००१, ब्युरो ऑफ एनजी इफिशिएन्सी, एनर्जी ऑडिट म्हणजे काय ? अशा अनेक बाबींवर उद्बोधक मार्गदर्शन प्रबोधन सार्वजनिक कार्यक्रम वेळोवेळी आयोजित करणं गरजेच

ं आहे . सर्वसामन्यांना याची थोडक्यात पुन्हा माहिती व्हावी, वीज बचतीचं महत्व पटावं आणि वीज बचत म्हणजेच वीज निर्मिती. या तत्वाच्या अंगीकार करावा, असं वाटतं .वीज निर्मितीचा सगळयात सोपा मार्ग म्हणजे वीज बचतीचा आणि यासाठी भांडवल लागत नाही. वाचविलेली एक युनिट

वीज म्हणजे दोन युनिट वीज निर्मिती केल्यासारखे होतं. भारत सरकारनं वीज बचतीसाठी

एनर्जी कर्न्झवेशन ऍक्ट २००१ हा कायदा संमत केला आहे.या कायद्याची माहिती जनतेला व्हावी, वीज बचतीचं महत्व समजावं आणि जनजागृती व्हावी या उद्देशानं राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह १४ ते २१ डिसेंबर या काळात साजरा केला जातो. पण त्यानंतरही कमीत कमी ऊर्जेचा वापर करुन ऊजेचे संकट निवारण्याचा अल्पसा प्रयत्न प्रत्येकांनं केल्यास देश सेवेचं कार्य होईल , एवढं निश्चित .
<यशवंत भंडारेमहान्यूजच्या सौजन्याने

— मराठीसृष्टी टिम

1 Comment on ऊर्जा संवर्धन

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..