नवीन लेखन...

या मार्गाने थकवा दूर करा

सततचे काम, शरीराला विश्रांती न दिल्याने खूप थकवा आणि अशक्तपणा येतो. अशावेळी काम करायचे ठरवले तरी शरीर मात्र साथ देत नाही. या थकव्याला दूर करण्याचे उपाय हे आपल्याच हातात आहेत हे आपण काय लक्षात ठेवले पाहिजे.

दिवसभर काम, काम आणि फक्‍त काम करणारे अनेक जण असतात. त्या कामापुढे मग त्यांना कशाचेही भान नसते. याचा परिणाम त्यांच्या केवळ जीवनशैलीवरच होत नाही तर आरोग्यावरही होतो. विशेष म्हणजे सततचे काम आणि दररोजचे ताण देणारे काम यामुळे एकप्रकारे थकवा येतो. हा थकवा दूर करण्यासाठी मग नाना प्रकारे प्रयत्न केले जातात. असेच काही योग्य रीत्या केलेले उपाय आणि प्रयत्न थकवा दूर करू शकतात. 

सकाळी झोपेतून उठल्यावर थकवा जाणवत असेल आणि कोणतेही काम करायची इच्छा होत नसेल तर त्यासाठी आपण मनातून काही गोष्टी करणे आवश्‍यक आहे.

1) जेवण वेळेवर न घेणे, जंक फूड खाणे, स्टार्च आणि गोड पदार्थ खूप खाणे यामुळे बऱ्याचवेळेला अशक्तपणा येतो. यासारख्या सवयींमुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी सतत कमी-जास्त होते आणि त्यामुळे कालांतराने आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात. ह्या अशा पदार्थांमुळे आपल्या शरीराला पुरेशी एनर्जी मिळत नाहीत. म्हणूनच आपण रोजच्या रोज व्यवस्थित आहार घेतला जाईल, याची काळजी घ्यावी. रोजचा आहार शक्यतो ठरलेल्या वेळेतच घ्यावा. पोषणतत्वांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्यावा. दर दोन ते तीन तासांनी थोडे थोडे खावे. जेवणावर तुमच्या शरीराची शक्‍ती केंद्रित असते. व्हिटॉमिन बी, मॅग्नेशियम, पोटेशियम आणि लोहयुक्‍त जेवणाने ताकद वाढते. म्हणून जेवणात फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवावे. चॉकलेट, मांस, अल्कोहोल व कॅफीनयुक्‍त पदार्थ खाणे टाळावे.

2) एखाद्या गोष्टीचा अतिविचार, सतत निगेटीव्ह विचार करणे किंवा मला सगळं येतं अशा अविर्भावात राहणे, यासारख्या गोष्टी आपल्याला बऱ्याच वेळेला सकारात्मकतेपासून दूर नेतात. यामुळे देखील आपल्याला मानसिक थकवा येऊ शकतो. तेव्हा तुम्ही तुमच्या विचाराची दिशा सुरूवातीला बदलली पाहीजे. एखाद्या गोष्टीची विनाकारण भिती बाळगल्यामुळे आलेल्या समस्या, तसेच नकारात्मक विचारांमुळे भूतकाळात सामना करावे लागलेले प्रॉब्लेम्स, याबद्दल एका ठिकाणी लिहून ठेवा आणि समस्येवर कशी मात करता येईल, याचा विचार करा. थकवा दूर करण्यासाठी तणावमुक्‍त राहणे गरजेचे आहे. तणावामुळे शरीराची ऊर्जा संपते व थकवा येतो.

3) थोडा जरी मोकळा वेळ मिळाला तरी आपण नेहमी चांगल्या गोष्टी कराव्यात जसे की आपण स्वतःला चांगल्या आशयाची पुस्तकं वाचण्याची सवय लावून घ्यावी. कारण त्यामुळे आपले माइंड आपोआपच रिलॅक्स होण्यास खूपच मोठी मदत होते. दिवसभर आपण ऑफिसच्या कामात व्यस्त असतो किंवा घरातही सातत्याने काही ना काही काम असतेच. परिणामी धावपळीमुळे श्वासोच्छवास आणि हार्ट बीट्सचा रेट कमी होतो. तसेच ब्लड सर्क्युलेशन मंदावते. त्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो. म्हणूनच आपण आपल्याला फावल्या वेळेत चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत.

4) शरीरास मुबलक ऑक्सिजन न मिळाल्यास आपल्याला थकवा जाणवतो. त्यामुळे इतर समस्यांना तोंड द्यावे लागते. तेव्हा शक्य तितक्या वेळेस दिर्घ श्वास घेऊन तो तोंडावाटे सोडण्याची सवय लावून घ्या. शक्‍य झाल्यास एका जागी बसून एखादा प्राणायाम केल्यास त्याचा नक्‍कीच फायदा होईल. तसेच नेहमी स्वतःला मोकळ्या जागेत नियमित व्यायाम करण्याची सवय लावावी. ताजी हवा व मोकळ्या वातावरणामुळे थकवा दूर होतो.

ह्या अशा गोष्टी जर तुम्ही नीट समजून घेतल्यात आणि त्याचे रोजच्यारोज योग्य पालन केलेत तर तुमचा थकवा दूर होण्यास ह्याचा नक्की तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा मिळू शकतो. जास्त काम करणे, अवेळी जेवण करणे, पूर्ण झोप न घेणे यासारख्या सवयींचा वाईट परिणाम शरीराच्या कार्यक्षमतेवर पडतो. यामुळे सतत अशक्तपणा जाणवतो. अशा वेळी खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. शारीरिक किंवा मानिसकरित्या तुम्ही जास्त थकला असाल तर तुम्हाला सातत्याने अकार्यक्षमता जाणवते. अनेकदा हा थकवा तुमच्या जीवनशैलीशी निगडीत असतो. दिर्घकाळ काम करणे, जेवण टाळणे, अतिश्रम आणि कमी झोप ही थकवा येण्याची काही मुख्य कारणे आहेत.

— संकेत रमेश प्रसादे 

Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..