नवीन लेखन...

वचन

वाणी मधूनी शब्द निघाला,  कदर त्याची करीत होते  ।

मुखावाटे बाहेर पडे जे,  वचन त्याला समजत होते  ।।

दिले वचन पालन करण्या,  सर्वस्व पणाला लावीत होते  ।

प्राणाची लावून बाजी,  किंमत शब्दांची करीत होते  ।।

स्वप्नामध्ये दिले वचन,  हरिश्चंद्र ते पालन करी  ।

राज्य गमवूनी सारे आपले, स्मशानी बनला डोंबकरी  ।।

प्राण आहूती देई दशरथ, वनी धाडूनी राम प्रभूला  ।

पालन केले तेच वचन, रणांगणी दिले जे कैकयीला  ।।

आज लोपूनी तेज वाणीचे, तुटले विश्वासाचे नाते  ।

बदलूनी जाती क्षणात सारे, घटकेपूर्वीचे शब्द जे होते  ।।

मित्र वा आप्त कुणी, आई-बाप वा भाऊ-बहीण  ।

स्वार्थीभाव अंगी मुरूनी, पाळीत नाही आपले वचन  ।।

अंतर्यामी बसला ईश्वर,  जाण त्याची सदैव असावी  ।

‘वचन’रूपे व्यक्त होई , हीच भावना मनी  ठसावी  ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2046 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..