वेडे आम्ही सारे,
तुझेच घेवूनी तुला देतो,
त्यातच मोठेपण मिरवितो…१,
जाण आहे याची
सर्व जगाला चकमा देतो,
स्वत:लाही फसविता असतो….२,
फुले बागेमधली
तोडून तुजला वाहतो,
हार त्यांचे करूनी घालतो….३,
गंगेतील थोडे पाणी,
अर्घ्य आम्ही तुला देतो,
भक्तीभावाने अर्पण करितो….४,
सारे असूनी तुझे,
मीपणा हा सतत राहतो,
परी हा भाव दुजासाठी असतो…५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com


Leave a Reply