तूच माझा ईश्वर

मनांत ठसले रूप तुझे,  येते नयना पुढे  ।

रात्रंदिन मज चैन ना पडे…..।।धृ।।

शरीर जरी सुंदर मिळे  ।

प्रयत्नांनी तूंच कमविले  ।।

चपलता ही छाप पाडीते  ।

लक्ष्य खेचूनी तुझ्याकडे

मनी ठसविले रूप तुझे येत नयना पुढे  ।१।

हासणे खेळणें आणि चालणें  ।

‘ढंगदार’  तुझे बोलणे  ।।

शरीरामधल्या हालचालींना  ।

सहजपणाचे वळण पडे

मनी ठसविले रूप तुझे येत नयना पुढे….।२।

स्वभाव आहे जरी मृदू तो  ।

प्रसंग पडतां कठीण भासतो  ।।

सज्जना पुढती नम्र दिसूनी  ।

दुर्जना शिरीं वज्र पडे

मनी ठसविले रूप तुझे येत नयना पुढे  ….।३।

हृदयीं माझ्या घर करूनी  ।

तव प्रतिमा दिली ठेवूनी  ।।

ईश्वर तूंच खरा तो  ।

पूजन सदैव करीते

मनी ठसविले रूप तुझे  येत नयना पुढे ….।४।

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1681 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…