नवीन लेखन...

२०१२ चा दु:खद शेवट…..

२०१२ संपलं. खरंतर हे वर्ष सरमिसळीचंच ठरलं. काही आनंदी क्षण आणि अनेक दु:खद क्षण यांनी भरलेलं हे २०१२ साल.

२०१२ चा शेवट तर फारच खराब झाला. डिसेंबर २०१२ मध्ये जगाचा अंत होणार म्हणून आधीच बराच गाजावाजा झाला होता. त्यावर सिनेमाही निघाले आणि सोशल मिडियात चर्चाही झडल्या. लौकिकार्थाने जगाचा शेवट जरी झाला नाही तरीही डिसेंबरमध्ये घडलेल्या घटनांकडे बघितल्यावर जगाचा शेवट म्हणजे आणखी काय असाच प्रश्न पडावा. माणूसकीचा खून भारताच्या राजधानीत झाला.

दिल्लीतील बलात्कार प्रकरण आणि त्यानंतरच्या घडामोडी यामुळे देश अक्षरश: ढवळून निघाला. सामान्य माणूस जागा झाल्यावर काय होऊ शकतं याचा प्रत्यय कदाचित राजकारण्यांना आला असावा. त्यामुळे येनकेनप्रकारेण ही चळवळ दडपून टाकायचाच चंग सरकारने बांधलेला दिसला. शांततेत निदर्शने करायला जमलेल्या नागरिकांवर अश्रूधूर आणि पाण्याचे फवारे, दिल्लीतील मेट्रो स्टेशन्सना टाळे यासारखे उपाय करुन सरकारने हास्यास्पद कामगिरी केली आणि घटनेचं गांभीर्यही घालवलं.

या प्रकरणात काही राजकारण्यांनी मुक्ताफळं उधळली आणि आपल्या बालबुद्धीचे दर्शन जनतेला घडवले अणि त्याचवेळी मौनीबाबांनी मौनव्रत आणखी कडक केलेलं दिसलं. “टिवटिव” थरुरांनीही यात तोंड वाजवून घेतलं आणि सोशल मिडियाचा रोष पत्करला.

मॅडमना अतिशय दु:ख झाले मात्र करण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नव्हते.

“अरविंद केजरीवाल प्रायव्हेट लिमिटेड” साठी हा नवीन विषय बर्‍याच अपेक्षा घेउन आला पण उत्स्फूर्त तरुणाईने त्यांना अजिबात थारा दिला नाही. अन्यथा हे आंदोलन “अरविंद-बाबां”नी हायजॅक केलेच असते. खर्‍या अर्थाने हे आंदोलन राजकारण विरहित झाले.

या सगळ्या गदारोळात अण्णासाहेब कुठे चमकलेले दिसले नाहीत. शबानाताई, महेश भट्ट, जावेदबुवा वगैरे मंडळी तर अदृश्यच झालेली दिसली. राजसाहेबही दिसले नाहीत. खरंतर कार्याध्यक्षही आपल्या कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले असते तर एक चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचला असता. “भीमसैनिक”, “ब्रिगेड” चे ब्रिगेडियर्स आणि पॅंथर्सही कुठे दिसले नाहीत. काय झालं होतं या सगळ्यांना?

मिडियाने मात्र मस्त धंदा केला. ऐन नाताळच्या सणात सगळ्या चॅनेल्सची टिआरपी मिळवण्याची स्पर्धा रंगात आली होती. त्यातही “सबसे तेज” वगैरे चॅनेल्सतर सुटलीच होती. “चर्चा”, “महाचर्चा”, “आजचा सवाल” यासारख्या धंदेवाईक कार्यक्रमांना उत आला होता. चर्चेचे सूत्रसंचालक घसा खरवडून बोंबलत होते.

पण प्रश्न खरा हाच आहे की एवढं सगळं झाल्यावरतरी २०१३ मध्ये परिस्थितीत काही फरक पडणार आहे का? की हे असेच निरंतर सुरु रहाणार… नेतेमंडळी, तथाकथित (so called) सामाजिक कार्यकर्ते, मिडिया वगैरे आपल्या पोळ्या भाजून घेणार आणि आपण असेच मूकपणे बघत रहाणार?

— निनाद अरविंद प्रधान 

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 96 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..