नवीन लेखन...

पुण्याचे अत्याधुनिक जिल्हाधिकारी कार्यालय

पुण्यातील  नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाची ओळख केवळ प्रशासकीय इमारत म्हणून राहणार नाही तर पुण्याच्या वैभवात या इमारतीमुळे एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. या इमारतीच्या बांधकामावर सुमारे ६७ कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे. ‘ग्रीन बिल्डिंग’ म्हणून या इमारतीची एक वेगळी ओळख तयार होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या देखण्या इमारतीचे उद्घाटन नुकतेच झाले. त्या निमित्ताने पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याशी साधलेला संवाद …


नवीन इमारतीची मुहुर्तमेढ कशी रोवली ?

-कार्यालयाची जुनी इमारत ही सुमारे १३५ वर्षे जुनी होती. नागरिकांची गर्दी आणि अभिलेखांची संख्या वाढत असल्याने या कार्यालयाच्या आवारातील इमारती अपुऱ्या पडत होत्या; तसेच त्या इमारती धोकादायक झाल्याने त्या ठिकाणीच नवीन इमारत उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. यानिमित्ताने सर्व कार्यालये एकाच छताखाली असावीत, या उद्देशाने नवीन इमारतीची निर्मिती करण्यात आली आहे. या इमारतीचे भूमीपूजन तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते.

नवीन इमारतीची रचना कशी असेल?

-प्रामुख्याने नवीन मुख्य इमारतीमध्ये तळमजला आणि अन्य पाच माळे आहेत. एकूण १० हजार २१५ चौरस मीटर क्षेत्रफळावर इमारत बांधण्यात आली आहे. ८ हजार २२९ चौरस मीटर जागा वाहनतळासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये एकाच वेळी २२७ चारचाकी, १ हजार १३७ दुचाकी, तर ३१० सायकली उभ्या करता येणार आहेत. यात ए, बी आणि सी विंग आहेत.

पर्यावरणपूरक इमारतीसाठी काय केले?

-पर्यावरणपूरक इमारत म्हणून या इमारतीची नोंद होणार आहे. त्यासाठी सोलर यंत्रणा उभारण्यात येणार असून अशा प्रकारची इमारत असलेले पुणे जिल्हाधिकारी कार्यालय हे राज्यातील पहिले कार्यालय आहे. मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण इमारत अग्निरोधक बनविण्यात आली आहे. त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या फर्निचरचा वापर करण्यात आला आहे. विशिष्ट तापमान झाल्यास येथील अग्निशमन यंत्रणा आपोआप कार्यान्वित होऊन पाण्याचे फवारे उडतील, अशी यंत्रणा बसविण्यात आली आहे. तसेच सहा रिश्टर स्केल भूकंपातही ही इमारत सुरक्षित राहील, याची काळजी घेण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

नागरिकांना काय फायदा होईल?

– जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीमुळे नागरिकांची एका छताखाली कामे मार्गी लागतील. शहरातील वाढता पसारा, वाढते प्रशासनातील प्रश्‍न यामुळे एकाच ठिकाणी इमारत असणे आवश्यक होते. जिल्ह्याचे क्षेत्रफळ तब्बल १५,६४२ चौरस किमी एवढे आहे. लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याकरिता एक चांगले प्रशस्त प्रशासकीय कार्यालय हवे होते. ते यामुळे मार्गी लागेल. लोकांना विखुरलेल्या ठिकाणी जावे लागणार नाही.

सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीमध्ये काय करण्यात आले?

-नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्यात आली आहे. त्यामध्ये तब्बल ९६ सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात आले आहेत. एक कंट्रोल रुम तयार करण्यात आली आहे. या रुममध्ये सर्व बिल्डिंगची माहिती उपलब्ध होणार आहे. या रुमला युनिक मॅनेजमेंट सर्व्हिस म्हणून संबोधले जाईल.

आपल्या कार्यकाळात इमारत झाली त्याबद्दल काय सांगाल?

-माझ्या कार्यकाळात ही इमारत झाली, याचा मोठा आनंद आहे. खऱ्या अर्थाने स्वप्नपूर्ती झाली आहे. कोणत्याही अधिकाऱ्याला आपल्या कार्यकाळात मोठे काम करण्याची संधी मिळणे हे देखील महत्वाचे असते. राज्य सरकारचा देखील मी खूप आभारी आहे. शासनाने वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला. पहिल्यापासून मी या इमारतीकडे बारकाईने लक्ष दिले. सार्वजनिक शौचालये कशी असावीत, इमारत बांधताना कमीत कमी झाडे तोडली जावीत, या हेतूने काळजी घेतली गेली. परिणामी देखणी इमारत उभी राहिली, असेही श्री. राव यांनी सांगितले.

या नवीन देखण्या इमारतीमुळे पुण्याच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. सर्वसामान्यांची सेवा या इमारतीमधून सदैव घडो, अशी प्रार्थना करूया.

— दिगंबर दराडे
पत्रकार, पुणे.

`महान्यूज’च्या सौजन्याने 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..