नवीन लेखन...

तरुणाईत लैंगिक शिक्षणाचा अभाव !

|| हरी ॐ ||

देशात कुठे अल्पवयीन तरुणीवर बलात्कार झाला, हत्या झाली की काही दिवस प्रिंट मिडिया पासून ते इलेक्ट्रोनिक मिडीयात डॉक्टर, मानसोपचारतज्ञ आणि समुपदेशकांच्या मुलाखती आणि चर्चा सत्र रोज झडत असतात पण त्या बाबतचे ठोस पाऊल ना शासन, एनजीओज् आणि शाळा/कॉलेजेस उचलताना दिसतात किंवा त्या बाबत एखादा पाठ/लेसन/धडा त्यांच्या पाठ्यपुस्तकात असतो. तसेच पालक सुद्धा वयात येणाऱ्या आपल्या मुला/मुलींशी या गंभीर, नाजूक परंतु अत्यावश्यक विषयावर चर्चा करतांना दिसतात. त्याला करणे बरीच असतील पण त्याला काही पर्याय नाहीत असे खेदाने म्हणावेसे वाटते. पण अश्या घटना घडण्या नंतर पश्च्याताप करण्यापेक्षा बरे ना?

असो. राजधानीतील बहुचर्चित आरूषी तलवार हत्या प्रकरणास अखेर पाच वर्षांनंतर उत्तरप्रदेशातील गाजियाबाद सीबीआय विशेष न्यायालयाने आरूषीचे वडील डॉ. राजेश तलवार आणि आई डॉ. नूपुर तलवार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने हा निकाल दिला असला, तरी त्यानंतर ज्या प्रकारे प्रिंट मिडिया आणि टीव्ही वाहिन्यांवर चर्चा चालू असताना आणि उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत त्यावरून या प्रकरणातील रहस्याची टांगती “तलवार” अजून तरी तलवार दाम्पत्यांवर कायमच आहे असे दिसते. या प्रकरणात कोर्टाने निकाल दिला असला, तरी न्याय केला काय? या शंकेची पाल प्रत्येकाच्या मनात चुकचुकत आहे. शंभर अपराधी सुटले तरी चालतील, मात्र एका निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये, या तत्त्वानुसार जरी न्यायालयात निर्णय होत असले, तरी याच्या उलटे घडून खरे अपराधी सुटले तरी चालतील पण कोणाला तरी अपराधी म्हणून शिक्षा झालीच पाहिजे, असा दृष्टिकोन कोर्टाने समोर ठेवला नाही ना? असा प्रश्‍न परिस्थितिजन्य पुराव्यावरून दिलेल्या निकालाने अनेकांच्या मनात उभा राहण्याची शक्यता आहे. अशी शंका मनामनात उभी राहण्याची कारणे अनेक दिवस या प्रकरणातील न उलगडलेले रहस्य आणि तपास यंत्रणांनी दाखविलेली ढिलाईतही सुद्धा असू शकतात.

या दुर्घटनेकडे बघताना मनात दोन प्रश्न निर्माण होतात. प्रथम स्त्री, आई, जन्मदाती आपल्या बाळाला नऊ महिने नऊ दिवस आपला श्वास जो जगण्यासाठी आवश्यक आहे तो, अन्न, रक्त, विचार, भावभावना, प्रेम अगदी सगळं सगळं देते त्यासाठी एवढे दिवस कष्ट घेते ती स्त्री, आई, जन्मदात्री अशी आपल्याच बाळाची एवढ्या वर्षानंतर वयात येणाऱ्या आपल्या मुलीचीच, पोटच्या गोळ्याचीच निर्घुण हत्या करेल किंवा त्यात सहभागी होईल हे थोडेसं मनाला पटत नाही, कुठेतरी विसंगत वाटतं. परंतु एकीकडे असा विचार येतो की तिला त्यात नाईलाजाने, खोट्या प्रतीष्टेपाई सहभागी व्हावे लागणे किंवा समाजातील प्रतिष्ठा जपण्यासाठी हे सगळे करण्यास भाग पाडले/पडले असेल. कारण ज्या मुलीचे आई-वडील डॉक्टर आहेत, त्यांची चांगली प्रक्टिस चालली आहे, या आधी दुसरा कुठला त्यांच्या चारित्र्यावर धब्बा नाही. आणि मुख्य म्हणजे डॉक्टरकीचा अभ्यास करताना आरुषीच्या पालकांनी मानशास्त्र विषय अभ्यासला असणार (Human psychology) तरीही त्यांना त्यांच्या वयात येणाऱ्या एकुलत्या एक मुलीतील शारीरिक आणि मानसिक बदल एवढ्या वर्ष्यात कधी जाणवले नाहीत? कधी अक्षेपाहार्य वर्तन करताना जाणवले नाही? कधी भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल बोलताना आढळे नाही? कधी तिचा पेहेराव, पैशाची जास्त मागणी, मित्र/मैत्रिणींच्या वाढदिवसाच्या किंवा इतर पार्टीजना न सांगता जाणे, पौगंडावस्थेत चोरून काहीबाही पुस्तके वाचणे, मोबाईलचा मेसेजसाठी जास्त वापर आणि गरजेपेक्षा जास्त बोलणे, या सगळ्याचा शेवटी अभ्यासावर परिणाम होतोच आणि परीक्षेत कमी मार्क मिळण्यात होतो. पण याकडे मुख्य म्हणजे पालक आणि त्यात डॉक्टर असून आपल्या मुलीकडे लक्ष कसे नव्हते? आपली मुलगी वयात येते आहे आणि तिला लैंगिक शिक्षण दिले पाहिजे असे डॉक्टर आई/वडिलांना कसे वाटले नाही? कारण अश्या घटना दिल्ली सारख्या शहरात बऱ्याच वेळा घडल्या आहेत आणि देशातील बऱ्याच मानशात्रातील तज्ञांनी तर हा विषय शाळा-कॉलेजातून शिकविला जावा म्हणून प्रयत्न सुद्धा केले आहेत. मग त्यांनी या गोष्टी कधी मनावर घेल्याच नाहीत का? एवढी केस हाता बाहेर कशी गेली? ज्याने त्यांना अखेरीस टोकाचा माणुसकीला काळिमा फासणारा लांच्छनास्पद, घृणास्पद निर्णय घ्यावा लागला? हत्या केली असेल तर का? कश्यासाठी? कोणाच्या सांगण्यावरून? का स्वत: हत्या घडवून आणली असेल? कारणे बरीच असतील परंतु डॉक्टर दाम्पत्यांनी त्यांच्या मुलीची मग हत्या का केली हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो !

स्वत:चे करिअर करण्याच्या नादात या गंभीर गोष्टीकडे बघण्यास त्या दोघांना वेळच मिळाला नाही आणि ज्या वेळी हे प्रकरण त्यांनी आपल्या उघडया डोळ्यांनी बघितले तेंव्हा ते हाता बाहेर गेल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय आपली समाजातील प्रतिष्ठा, घराण्याची इज्जत, रूढी, परंपरा, समजा काय म्हणेल याला भिऊन, येणाऱ्या समस्यांना आपल्याला तोंड देता येणार नाही, समाजाने विचारलेल्या संबंधीत सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता येणार नाहीत म्हणून?

डॉ. तलवार या पतीपत्नीनी घेलेल्या निर्णयाचे न्यायालयाने अनुमान काढले त्याप्रमाणे केवळ प्रतिष्ठेपायी आरूषीचा आणि हेमराजचा खून केला असेल, तर ते अतिशय दुर्दैवी आहे आणि ते मनाला पटतही नाही. विभक्त आणि छोट्या कुटुंबात मुलांकडे होणारे दुर्लक्ष, ते लक्षात न घेता मुलांकडून केल्या जाणार्‍या शिस्त आणि सुसंस्कारित वर्तणुकीच्या अपेक्षा, चंगळवादामुळे मुलांवर न होणारे चांगले संस्कार, अर्धवट स्वीकारलेला मोकळेपणा आणि प्रतिष्ठेचे अवडंबर अशा गोष्टींमध्ये समाज अडकत चालला आहे असे नाईलाजाने म्हणावे लागत आहे. आपल्या तीन जणांच्या कुटुंबात आपली वयात येत असलेली मुलगी काय करते आहे आणि तिच्या भाव-भावना आणि मनात काय चालले आहे, याचा थांगपत्ता डॉक्टर असलेल्या आईवडिलांना लागत नाही हे सामान्य माणसांच्या पचनी पडणे जरा कठीणच वाटते. स्वत: मात्र चंगळवादात वाहून जाताना संस्काराचा धागा सोडलेले आईवडील मुलांवर कसलेही जीवनमूल्यांचे संस्कार करत नाहीत आणि त्यांच्याकडून सुसंस्कारित वर्तणुकीची अपेक्षा मात्र करतात. मुलांवर संस्कार करणार्‍या घर, शाळा आणि समाज या तीनही संस्था आज उद्ध्वस्त झाल्याचे दैनंदिन जीवनात अश्या प्रकारे घडलेल्या प्रसंगावरून जाणवते. घरात मुलांशी संवाद साधणारे, मुलांवर संस्कार करणारे, त्यांच्यासाठी वेळ देणारे, त्यांना अनुकरण करण्यासाठी आपल्या आचरणातून आदर्श दाखवून देणारे आज आपल्या अवती भवती कोणी नाहीत अश्यातला भाग नाही. परंतू इच्छाशक्तीचा अभाव जाणवतो. या मुलांकडून सुसंस्कारित किंवा आपल्या मनात बसलेल्या प्रतिष्ठेच्या अनुरूप वर्तणुकीची मात्र अपेक्षा केली जाते. अशा वेळी ही मुले अपेक्षित वर्तन करत नसतील, तर तो अपराध कोणाचा?

जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..