नवीन लेखन...

तक्षशिला – भारतातील प्राचीन विद्यापीठ – भाग 1

INDIA - FEBRUARY 17: Great stupa in Taxila (UNESCO World Heritage List, 1980), Pakistan. Indus civilization, 3rd century BC. (Photo by DeAgostini/Getty Images)

पूर्वइतिहास

तक्षशिला हे  भारतातली व जगातील प्राचीन विद्यापीठापैकी एक विद्यापीठ होते. त्याकाळात भारतीय संस्कृती किती पुढारलेली होती, हे समजून येते. या विद्यापीठाचा काळ सुमारे १००० वर्ष ख्रिस्तपूर्व ते इसवि ५०० मानला जातो.

विद्यापीठाचे नाव भारताचे दोन पुत्र तक्ष व पुष्कल या दोन पुत्रावरून पडले. या विद्यापीठाचे स्थान साधारण सिंधु नदीच्या पूर्वेस आठ योजने ( साधारण ५५ मैल) होते. उत्खनन विभागाच्या अंदाजानुसार विद्यापीठ ६ मैलात पसरले होते. भारतातील इतके प्राचीन वैभवशाली विद्यापीठ असूनही दुर्दैवाने आज हा भाग भारतात नाही.

भाग १  तक्षशिला विद्यापीठाचे प्रशासन व शिक्षण पद्धती

विद्यापीठात वेगवेगळ्या विषयातील पारंगत अनेक गुरु राहत असत. म्हणून त्याला गुरुकुल पद्धती म्हटली जात असे.या विद्यापीठात भारतातीलच नव्हे तर भारतीय उपखंडातील अनेक विद्यार्थी शिकायला येत.इथे येण्याचा मार्ग खडतर व धोकादायक असे. विद्यापीठांबाहेरील कोणतीही संस्था अगदी राजादेखील प्रशासनात ढवळाढवळ करीत नसे.प्रत्येक गुरुला स्वताचे स्वातंत्र्य असे.प्रत्येक गुरुला आपला विषय ठरवायची मुभा असे. कोणत्या विद्यार्थ्याला निवडायचे यांचे त्याला स्वातंत्र्य असे.विद्यार्थी तेव्हाच परिपूर्ण मानला जाई,जेव्हा गुरूला त्याच्या परिपूर्णतेच समाधान होई. साधारण विद्यार्थी दशेचा काळ आठ वर्ष असे.त्यामुळे सोळा ते बावीस वयाची मुले  आश्रमात दाखल होत ,पण विद्यार्थ्याच्या आकलन शक्ति नुसार  विद्यार्थी दशेचा काळ कमीजास्त होई. विद्यार्थी गुरूच्या घरीच राही.निपुण झाल्यावर त्याला कोणतेही प्रमाणपत्र दिले जात नसे. गुरूचे समाधान हाच एक निकष होता आणि त्याला कोणीही आव्हान देत नसे,अगदी राजपुत्र शिकत असला तरी  राजा सुद्धा दखल देत नसे. इथे फक्त उच्च शिक्षणासाठीच विद्यार्थी येत.या विद्यापीठाची ख्याती इतकी होती की विद्यार्थी  आपल्या घरातील सुरक्षितता बाजूला ठेऊन  व दूरच्या मार्गातील धोके पत्करून शिकायला येत,आणि पालक सुद्धा पाठवत.अनेक संदर्भ  दाखवतात की बनारस,राजगढ, मिथीला,उज्जैन, कोसला अश्या दूरच्या भागातून विद्यार्थी येत.   तक्षशिला देशाची बौद्धिक राजधानी होती. अश्या प्रकारे तक्षशिला देशावर शैक्षणिक आधिपत्य गाजवत होती. देशांच्या इतर भागात शिकवले जाणारे अभ्यासक्रम तक्षशिलाशी संलग्न होते.

– रवींद्र शरद वाळिंबे

 

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 79 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..