नवीन लेखन...

मौखिक आरोग्य सांभाळा

Take care of your oral health

दातांची काळजी कशी घ्यावी आणि मौखिक आरोग्य कसे जपावे याचे मार्गदर्शन डॉ. उल्हास वाघ यांनी केले. महान्यूजच्या सौजन्याने ही प्रश्नोत्तरे खास मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी………


प्रश्न- मौखिक आरोग्य म्हणजे काय?
उत्तर-
आपले तोंड हे वरुन सुंदर दिसले तरी दाताची निगा व स्वच्छता राखणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. आपल्या शरीराचे ते प्रवेशद्वार आहे. दात, जीभ, ओठ यांचा दैनंदिन जीवनाशी संबंध आहे. चेहरा हा माणसाचा आरसा आहे. भावनांचा गोंधळ चेहर्‍यावर स्पष्ट दिसतो. मौखिक आरोग्य चांगले नसल्यास दाताचे, हिरडय़ांचे विकार उद्भवतात. दात स्वच्छ न ठेवल्यास त्या ठिकाणी आम्ल तयार होते व दात किडतात. या कारणामुळे ९५ टक्के लोकांचे दात किडलेले असतात. काहीवेळा त्यामुळे दाताला छिद्रे पडतात. ही छिद्रे भरली नाहीत तर दात लवकर पडतो आणि तो दुखायला लागतो. तेथील रक्तवाहिन्या तुटतात. तेथून रक्त व पू येतो. अशावेळी हिरडय़ांचा आधार असलेले हाड घातले जाते.

प्रश्न- दाताला किड लागली की दात पडतात. परंतु सध्या नवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या?
उत्तर-
दाताला किड लागली की दात पडतो. परंतु आधुनिक जगात विज्ञानाचा वापर करुन घेतला नाही तर ते योग्य होणार नाही. खेळताना मुलांचे दात पडतात. तेव्हा पडलेला दात लवकरात लवकर डॉक्टरकडे घेऊन गेल्यास त्याच जागी तो लावता येतो. काही वेळा दाताचे मूळ तसेच रहाते आणि काही भाग खिळखिळा होऊन पडतो. तेव्हा तेथे दात बसवून घ्यावा. अन्यथा अन्न चावता येत नाही व अन्न चावले नाही तर पचन होत नाही.

प्रश्न- एखादा पदार्थ खाल्यास प्रत्येकवेळी तोंड धुणे आवश्यक आहे का?
उत्तर-
माणसे विविध पदार्थ खातात. परंतु तोंड धुवत नाहीत. अन्नकण तेथेच अडकून रहातात. मुले काही खाल्ल्यावर तोंड धुवत नाहीत

ही वाईट सवय आहे. त्यामुळे हिरडय़ांचे विकार उद्भवतात. ब्रश योग्य पध्दतीने केला पाहिजे. हिरडय़ांवर बोटाने हात फिरविला पाहिजे. त्यामुळे तेथील वाहिन्या कार्यक्षम होतात. दाताच्या फटीत अन्नकण अडकून आम्ल तयार होत
. दातावरील आवरण दाताचे संरक्षण करीत असते. या आम्लांमुळे त्या आवरणावर वाईट परिणाम होतात.’

प्रश्न- ब्रशने दात स्वच्छ करताना ते कसे करावेत याबद्दल आपण काय सांगाल?
उत्तर-
ब्रशने आपण दात स्वच्छ करतो. परंतु ब्रश विविध वयाच्या व्यक्तींसाठी वेगवेगळे व योग्य असावेत. लहान मुलांसाठी त्यांचे तोंड लहान असल्याने ज्युनिअर ब्रश उपयोगी पडतात. मोठया व्यक्तींनी दात स्वच्छ करताना आपण ज्याप्रमाणे झाडू फिरवितो त्याप्रमाणे ब्रश आतून बाहेर फिरवावा जेणेकरुन अडकलेले अन्नाचे कण बाहेर पडतील. ब्रश वर-खाली या पध्दतीने फिरविल्यास दातांच्या फटीमध्ये अडकलेले कण निघून जातात. काही वेळा ब्रश खराब होतो आणि आपण तो वापरतच रहातो. खराब ब्रशमुळे हिरडय़ा दुखावल्या जातात. त्यामुळे ब्रश खराब झाल्यावर ताबडतोब फेकून द्यावा

प्रश्न- तोंडाची दुर्गंधी कशामुळे येते?
उत्तर-
एखादा माणूस जवळ येऊन बोलल्यास त्याच्या दातातील दुर्गंधीमुळे घाणेरडा वास येतो. हा वास टार्टरमुळे येत असतो. दात स्वच्छ न केल्यामुळे दातावर टार्टर जमतो. हा थर काढल्यास दात स्वच्छ होतात. वेळीच उपचार न केल्यास रक्त व पू येतो. काही वेळा रक्तक्षयामुळे हिरडय़ांमधून रक्त येते. अशावेळी हिरडय़ांमधील कचरा साफ करावा. औषधोपचार घ्यावेत. मानसिक ताणामुळेही दात खराब होतात.

प्रश्न- पालकांनी मुलांच्या व स्वत:च्या दातांची कशी काळजी घ्यावी?
उत्तर- लहानपणापासून पालकांनी मुलांच्या दाताची काळजी घ्यावी. मी पालकांना असे विचारले की तुम्ही दिवसातून किती वेळा ब्रश करता, तेंव्हा ते म्हणतात की फक्त एक वेळा. दिवसातून दोन वेळा ब्रश करावा. आई वडिलांनी ही सवय स्वत:ला लावून घ्यावी व मुलांनांही लावावी. काही वेळा दुधाच्या दाताच्या बाजूने दुसरा दात येण्यास सुरुवात होते. कारण दुधाचे दात वेळेवर न पडल्यास
थवा हिरडी जाड असल्यामुळे कायमचा दात ठराविक वयात वर येण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपण असे म्हणतो की डबल दात आले. दुधाचे दात काढून टाकल्यास मग कायमचे दात तिथे सरकतात. लहान मुलांना दूध पिण्यासाठी प्रवृत्त करावे. दुधामध्ये कॉल्शियम असते. बाजरी, नाचणी, शेवगा, सीताफळ, रामफळ यात कॉल्शियम असते.

प्रश्न- आज दाताचे इम्प्लान्ट या पध्दतीमुळे कायमस्वरुपी दात बसविता येतो का? ही पध्दत खर्चिक आहे का?
उत्तर-
सध्या दाताचे इम्प्लान्ट ही नवीन पध्दत अस्तित्वात आली आहे. त्या पध्दतीला खर्च खूप येतो. या पध्दतीत दात पडलेल्या जागी स्क्रू बसवितात व आपल्या दाताला शोभेल असा कृत्रिम दात कायमस्वरुपी बसविला जातो. ही पध्दत थोडीशी महागडी आहे. याच्यासाठी जे साहित्य वापरले जाते त्याचे उत्पादन भरपूर झाल्यानंतर या पध्दतीस जास्त खर्च येणार नाही. काही वेळा लहान मुले दाताला जीभ लावतात, अंगठा चोखतात, त्यामुळे दात वेडेवाकडे येतात ते दंत सौंदर्य शास्त्रानुसार सरळ करुन घ्यावेत.

प्रश्न- तंबाखूमुळे दाताचा कर्करोग होतो का?
उत्तर-
तंबाखुमुळे दाताचा कर्करोग होतो. तंबाखूत रासायनिक पदार्थ आहेत. त्यातील निकोटीन शरीरास अपायकारक आहे. लोक जीभ आणि गालाच्या पोकळीत तंबाखू, चुना, कात, सुपारी ठेवतात. तोंडात निकोटीनचे चट्टे उमटतात. ही सवय बंद केली पाहिजे. आदिवासी भागातील लोकांना आपण तोंडात जळती विडी ठेवताना पहातो. हा जळता भाग तोंडाच्या आतील बाजूस असतो. तंबाखू जळून रासायनिक पदार्थ तयार होतो. हे कर्करोगाला आमंत्रण आहे. लोक पंधरा ते वीस मिनिटे दाताला तंबाखू चोळत बसतात. त्यामुळे दातावरील आवरण निघून जाते. तोंडातील व्रण केवळ दुखतातच असे नाही ते लवकर बरे देखील होत नाहीत. अशावेळी कर्करोगाची तपासणी वेळीच करुन घ्यावी. सूक्ष्मदर्शक यंत्राखाली बायोप्सी केल्यास कर्करोगाची ला
गण झाली असल्यास आढळून येते.

(महान्यूजच्या सौजन्याने)

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..