नवीन लेखन...

श्री कनकधारा स्तोत्रम् – ८

दद्याद्दयानुपवनो द्रविणाम्बुधाराम- स्मिन्नकिञ्चन विहङ्ग शिशौ विषण्णे।दुष्कर्मधर्ममपनीय चिराय दूरं नारायणप्रणयिनीनयनाम्बुवाह:।।८।। आई भगवतीच्या कृपादृष्टी वर्षावाचा विचार मनात आल्यानंतर पूज्यपाद आचार्यश्री त्या वर्षावाशी संबंधित अन्य गोष्टींचा विचार एकत्रित करून उपमासौंदर्य साधत आहेत. नारायणप्रणयिनीनयनाम्बुवाह:- हा मेघ सामान्य नाही. आई जगदंबेच्या कृपादृष्टीचा हा मेघ. कशी आहे आई जगदंबा, तर नारायण प्रणयिनी. भगवान श्री विष्णूची प्रियतमा. त्यातही नारायण शब्द वापरणारी आचार्यश्रींची प्रतिभा […]

श्री कनकधारा स्तोत्रम् – ७

प्राप्तं पदं प्रथमत: किल यत्प्रभावान्मांगल्य भाजि: मधुमाथिनि मन्मथेन। मय्यापतेत्दिह मन्थर मीक्षणार्द्धं मन्दालसं च मकरालयकन्यकाया:।।७।। प्राप्तं पदं प्रथमत: किल यत्प्रभावान्- पद शब्दाचा अर्थ स्थान. प्राप्त म्हणजे उपलब्ध होणे. प्रथमतः अर्थात पहिल्याच वेळी. किल यत्प्रभावात् अर्थात तिच्या प्रभावामुळे. मांगल्यभाजि- अर्थात सकलम मंगलाचे पात्र, अधिष्ठान असणारे. मधुमाथिनि- मधु नावाच्या दैत्याचे मथन अर्थात विनाश करणारे जे भगवान विष्णू त्यांच्यात, अर्थात […]

श्री कनकधारा स्तोत्रम् – ६

कालाम्बुदालिललितोरसि कैटभारे-र्धाराधरे स्फुरति या तडिदंगनेव्। मातु: समस्त जगतां महनीय मूर्ति भद्राणि मे दिशतु भार्गवनन्दनाया:।।६।। कालाम्बुदालिललितोरसि कैटभारे- अंबु म्हणजे पाणी. ते देणारा तो अंबुद म्हणजे ढग. ढगांचा खरा काळ पावसाळा. त्या काळातील ढग काळेशार असतात. त्यांची अली म्हणजे रांग. एकामागोमाग एक आल्यामुळे विशाल समूह वाटणाऱ्या आणि अत्यंत काळेशार दिसणाऱ्या. कैटभारे:- कैटभ नावाच्या राक्षसाचे अरि म्हणजे शत्रू अर्थात […]

श्री कनकधारा स्तोत्रम् – ५

बाह्वन्तरे मधुजित: श्रितकौस्तुभेया हारावलीव हरि‍नीलमयी विभाति।कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला कल्याणमावहतु मे कमलालयाया:।।५।। बाह्वन्तरे- बाहू म्हणजे हात. त्यांच्या अंतरे म्हणजे आत मध्ये. दोन हातांच्या आत असणारा अवयव म्हणजे छाती. मधुजित:- मधु नावाच्या राक्षसाला जिंकणारे. भगवान श्रीविष्णु. विश्व रचनेच्या आरंभी भगवान श्रीविष्णूच्याच कानातून निघालेल्या मळा च्या दोन थेंबांमधून मधु आणि कैटभ या नावाचे दोन राक्षस जन्माला आल्याची कथा आहे. […]

श्री कनकधारा स्तोत्रम् – ४

आमीलिताक्षमधिगम्य मुदामुकुन्द-मानन्दकन्दमनिमेषमनङ्गतन्त्रम्। आकेकरस्थितकनीनिकपक्ष्मनेत्रं भूत्यै भवेन्मम भुजङ्गशयनाङ्गनाया:।।४।। आनंदकंद म्हणजे आनंदाचा जणू भरगच्च संग्रह. मुकुंद म्हणजे मुक्ती देणारे, भगवान श्रीहरी. त्यांना मुदा म्हणजे आपल्याच आनंदात, आमीलिताक्षमधिगम्य डोळे मिटून शांत पहुडलेले पाहून, अनिमेषमनङ्गतन्त्रम्- अनिमिष अर्थात पापणी देखील न ललवता. अनंग म्हणजे भगवान मदन. त्यांचे तंत्र म्हणजे प्रेम. सगळ्याचा एकत्रित विचार करता आनंदकंद भगवान श्रीहरी आपल्याच आनंदात नेत्र मिटून बसलेले […]

श्री कनकधारा स्तोत्रम् – ३

विश्वामरेन्द्रपदविभ्रमदानदक्ष- मानन्दहेतुरधिकं मुरविद्विषोsपि । ईषन्निषीदतु मयि क्षणमीक्षणार्ध- मिन्दीवरोदरसहोदरमिन्दिरायाः ॥ ३ ॥ आई महालक्ष्मीच्या त्या नेत्र कटाक्षाचा अद्भुत महिमा सांगताना आचार्यश्री म्हणतात, विश्वामरेन्द्रपदविभ्रमदानदक्षम्- विश्व अर्थात जग. अमर अर्थात देवता. इंद्र अर्थात सर्वश्रेष्ठ, राजा. त्याचे पद म्हणजे अधिकार. अर्थात या जगाचाच नव्हे तर देवांचाही राजा असलेल्या इंद्राच्या पदाचा अधिकार. आई जगदंबेच्या नेत्र कटाक्षाने असे देवराज इंद्राचे पद देखील […]

श्री कनकधारा स्तोत्रम् – २

मुग्धा मुहुर्विदधती वदने मुरारेः प्रेमत्रपा-प्रणहितानि गताऽऽगतानि।मालादृशोर्मधुकरीव महोत्पले या सा मे श्रियं दिशतु सागरसम्भवायाः ॥२॥ मुग्धा – अत्यंत शुद्ध,निर्मल, सरल, निष्पाप, अबोध. आई महालक्ष्मीची दृष्टी अशी आहे. मुहुर्विदधती वदने मुरारेः- ती दृष्टी वारंवार भगवान मुरारी अर्थात मुर राक्षसाचे शत्रू भगवान श्रीहरींच्या मुखकमलावर जात असते. गताऽऽगतानि- जात राहते .येत राहते. ही आचार्यश्री ची रचना मोठी सुंदर आहे. आईची […]

श्री कनकधारा स्तोत्रम् – १

अङ्गं हरेः पुलकभूषणमाश्रयन्ती भृङ्गाङ्गनेव मुकुलाभरणं तमालम्।अङ्गीकृताऽखिल-विभूतिरपाङ्गलीला माङ्गल्यदाऽस्तु मम मङ्गलदेवतायाः ॥१॥ भगवान जगद्गुरु आदी शंकराचार्य स्वामी महाराज भिक्षा मागण्यासाठी गेले असता एका मातेची अत्यंतिक गरिबी पाहून द्रवलेल्या त्यांच्या मनात हे स्तोत्र स्फुरले आहे अशी कथा आहे. आरंभी आचार्यश्री आई जगदंबा महालक्ष्मीच्या कृपादृष्टी चे वर्णन करीत आहेत. कशी आहे ही कृपादृष्टी? भृङ्गाङ्गनेव मुकुलाभरणं तमालम्- जशी एखादी भृंगांगणा म्हणजे […]

श्री अन्नपूर्णाष्टकम् – १२

माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः ।बान्धवाः शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् ॥ १२॥ परमपूज्य आचार्यश्रींचे मागणे सामान्य नाही. त्यांची भूक केवळ पोटाची नाही. त्यांना अपेक्षित असलेले अन्न केवळ पोट भरणारे अन्न नाही. हे सिद्ध करणारा हा या स्तोत्रातील अंतिम श्लोक. आचार्यश्री आपल्या अतिदिव्य संसाराबद्दल येथे विवेचन करीत आहेत. ते म्हणतात, माता च पार्वती देवी- देवी पार्वती […]

श्री अन्नपूर्णाष्टकम् – ११

अन्नपूर्णे सदापूर्णे शङ्करप्राणवल्लभे ।ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति ॥ ११॥ आई जगदंबा पार्वतीला अन्नपूर्णेच्या स्वरूपात भिक्षा मागताना भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज येथे काही वेगळ्याच भूमिका आपल्यासमोर ठेवत आहेत. अन्नपूर्णे सदापूर्णे- या पहिल्याच उल्लेखात हे वेगळेपण लक्षात घेता येते. हे दोनही शब्द वेगवेगळे करून पाहिले तर तो भाव लक्षात येत नाही. अन्न देणारी, सदैव पूर्णता देणारी […]

1 28 29 30 31 32 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..