नवीन लेखन...

पिरॅमिडसच्या देशात

१०-१२ वर्षापूर्वी इजिप्त आजच्या पेक्षा खूपच शांत व सुरक्षित होतं. सरकारने सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवला होता. रस्त्यावर, हॉटेलमध्ये, चौकाचौकात पोलीस तैनात होते. ते दिवस रमादानचे होते. त्यामुळे सिंगापूरहून निघतानाच टूर एजन्सीकडे आम्ही खूप चौकशा केल्या होत्या. […]

जपानमधील अप्रतिम साकुरा

भारताच्या पूर्वेला अगदी चिंचोळा, चारी बाजूंनी समुद्राचे संरक्षण असणारा, निसर्गसौंदर्याने नटलेला देश. हिमालयाच्या काही शिखरांशी स्पर्धा करू पाहणारा माउंट फुजी सारखा पर्वत, ‘लेक अशी’ सारखी विस्तीर्ण व निर्मळ तळी, पॅगोडा सारख्या उतरत्या छपरांच्या वैशिष्ठ्यपूर्ण इमारती, रस्त्याचे चढउतार, त्यावरून लगबगीने चालणारी मध्यम उंचीची गोरीपान चपट्या नाकाची माणसे….. कायकाय अन् कशाकशाचं वर्णन करावं…पण त्यातही तिथल्या चेरीब्लॉसमच्या वर्णनांनी मनावर भुरळ घातली […]

कशासाठी पोटासाठी!

‘कॉर्निश ‘ हा शब्द इथे येईपर्यंत माझ्या शब्दकोषात आलाच नव्हता. इंग्रजी/फ्रेंच भाषेतला ‘डोंगराच्या जवळून जाणारा रस्ता ‘ हा अर्थ इथे अजिबात लागू होत नाही, पण अरबी भाषेप्रमाणे जमिनीत आतपर्यंत घुसलेला समुद्राचा भाग हाच अर्थ इथेतरी जास्त योग्य वाटतो. विमानातून खाली दुबईकडे झेप घेतानाच दिव्यांच्या रेखीव चमकणाऱ्या रेघेच्या रूपात ह्या कॉर्निशची पहिली सलामी मिळते. […]

अडथळ्यांची शर्यत

शेवटी सगळे अडथळे पार करून रात्री जाण्याचे नक्की झाले. त्यावेळी भांडूपमध्ये आमच्या घरी फोन नव्हता. त्यामुळे ह्यांच्याकडून आलेल्या एकमेव अस्पष्ट ऐकू आलेल्या फोनवर व त्यांनी दिलेल्या फ्रान्सच्या विमानतळाच्या माहितीवर काम चालवायचे होते. त्यातच माझे मधले ३ दिवस घरच्या अडचणींमध्ये वाया गेले होते. महिनाभर रहायचे होते, जरी तिकडे उन्हाळा होता, तरी आमच्यासाठी ती थंडीच! त्यामुळे गरम कपडे, खाण्याचे भरपूर पदार्थ…. बापरे…यादी संपतच नव्हती. आठवून आठवून सामान गोळा होत होते. कसेबसे सगळे कोंबले गेले. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..