माझं गुपित
काळजाच्या डबीत, मनाच्या कुपीत जपलय् मी माझं इवलसं गुपित ॥ आहे त्याचा तर आनंद आहे नसत्याची नाही उणीव काही आनंदपरिमल दुःखाची मळमळ कुठल्या भासाची, तळमळ न ठेवत जपलय् मी माझं इवलंसं गुपित ॥ १ ॥ चक्रावणाऱ्या या चक्रव्यूहातून गुदमरवणाऱ्या गाढ गर्दीतून विवंचनांच्या वावटळींमधून शहाणपण माझं आटोकाट जपत जपलय् मी माझं इवलंसं गुपित ॥ २ ॥ जीवाचा […]