नवीन लेखन...

स्वस्त, मस्त आणि आकर्षक खेळणं!

आपल्या देशात ६०-७० वर्षापूर्वी रेडिओ, फ्रीज, टीव्ही, मोटार, फोन या चैनीच्या वस्तू म्हणून पहिल्या व वापरल्या जात होत्या. तसेच ज्याच्या घरात या वस्तू आहेत हे ते स्टेटस्चा भाग समजायचे.

त्याकाळी काही तातडीचे काम किंवा निरोप हा तारायंत्राद्वारे पाठविला जात असे परंतू विज्ञान व तंत्रज्ञातील नवनवीन शोधामुळे फोन सेवेत अमुलाग्र बदल होत जाऊन सारेजग माणूस मुठीत ठेवण्याची स्वप्ने बघू लागला. वैज्ञानिक व तांत्रिक बाळावर माणूस अंतराळात ट्रीपला जाण्याची स्वप्ने बघत आहे.

प्रथम काही थोडक्याच ठिकाणी फोन सेवा उपलब्ध होत्या. त्यात काळानुसार फोनच्या इस्तृमेंटस् व वेगात बदल होऊन आता मोबाईल फोन आले. मुक्त व्यापारामुळे हे क्षेत्र सरकारने खाजगी कंपन्यांसाठी खूले केले. त्यात स्पर्धा आल्या. लँडलाईन फोन पेक्षा मोबाईल फोनना मागणी वाढली. कारण स्वस्त, मस्त, आकर्षक, बदली करून मिळणारे, वापरण्यास सोपे व खर्चाच्या बाबतीतही स्पर्धेमुळे सुट. परंतू या बाबी येथेच संपत नाहीत तर प्रत्येक शोधाचे फायदे व तोटे हे असतातच तसे मोबाईल फोनाचेही आहेत.

 वेगवेगळया स्कीम मध्ये मोबाईल स्वस्त किंमतीला मिळाल्यामुळे त्याचा समाजकंटक गैरवापरच करतान दिसतात.

 शाळा संपवून कोलेजात प्रवेश मिळाला की हातात मोबाईल नसेल तर काही मूल-मुली आपल्या पालकांना सांगताना आपण बघतो “आम्हांला आता मोबाईल हवाच नाहीतर आम्हांला मित्र-मैत्रिणी बावळट म्हणतात व त्यांच्या ग्रुपमध्ये घेत नाहीत” बिचाऱ्या पालकांची ऐपत नसेल तर काय करणार? फाजील लाडाने काही पालक “आम्हांला नाही वापरता आला त्यांना तरी वापरुद्या, त्याचा उपयोग करुद्या, देवाच्या कृपेने पैसे व सोय आहे”. याबद्दल दुमत नाही पण त्यांना पैशाची किंमत कळू दे. पैसे मिळविण्यासाठी किती कष्ट करावे लागतात व किती पैसा हाती राहतो हे समजावून सांगणकाची गरज आहे. बहुतांशी विद्यार्थी/विद्यार्थिनी मोबाईलवर फालतू व नकोते सतत बोलताना दिसतात तसेच अश्लील एसएमएस पाठवतात. सरसकट सगळे विद्यार्थी/विद्यार्थिनी बद्दल बोळात नाही. याने अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊन पालकांचीही फसवणूक होते. पालकांनी विद्यार्थ्यांना एक झकास खेळण दिले आहे मग काय होणार? तरुणाईत मोबाईल हातात आला की देहबोलीत अमुलाग्र बदल होताना दिसतात.
 मोबाईल एक चैनीची वस्तू न राहता नैसर्गिक व मानव निर्मित आपत्तीत चांगल्या प्रकारे उपयोग करताना आपण पाहीले आहे याचा काही अंशी विसर पडत आहे असे वाटते.
 तातडीचा निरोप, गंभीर प्रसंगाची बातमी सबंधीताना कळविण्यासाठीच वापरावा.
 मोबाईलच्या अमर्याद वापराचे शारीरिक व मानासिक दुष्परिणामच त्याच्या वापरावर बंधन आणेल की काय अशी भीती वाटते.
 कुठलीही वस्तू सहज व स्वस्त मिळाली की त्याच वापर कोणीही कसाही व केव्हाही करतो.
 मोबाईल वापराची सामाजिक मानसिकता बदलण्याची गरज आहे. आपण टॅक्सी, रिक्षा आणि बसमधून प्रवास करीत असताना जर मोबाईल फोनवर फोन आल्यास आपण स्थळ, काळाचे भान न ठेवता आपल्या खाजगी जीवनाबद्दल व जे बोलू नये तेच नेमके बोलले जाते याने ऐकणाऱ्यांची करमणूक तर होतेच पण महत्वाची माहिती अनवधानाने सगळ्या म्हणजे तेथे हजार असलेल्या क्रमश: चालक, वाहक, इतर प्रवाश्यांना देत असतो व आपण आपल्या पायावर दगड पाडून घेत असतो तरी याचे भान ठेवावयास पाहिजे. मोबाईलवर मोजके, माफक व हळू बोलावे ज्यामुळे कोणास त्रास होणार नाही. कधी कधी खाजगी वाहन चालवताना बऱ्याच जणांना मोबाईल फोनवर बोलण्याची सवय असते ही फार चिंतेची बाबा आहे याने अपघात होऊन स्वत:चे व इतरांचे नुकसान होण्याची भीती असते.
 बऱ्याच प्रसिद्धी माध्यमाद्वारे ऐकण्यात व वाचण्यात येते की मोबाईलच्या अमर्याद वाढीचे व वापाचे परिणाम वातावरणात सूक्ष्म लहरी मिसळून प्रदूषण वाढविण्यास मदत करतात असे वैज्ञानिकांचे मत आहे. कारण प्रत्येक वस्तू ही नाश न पावता वस्तूच्या अवनाशित्वाच्या नियम प्रमाणे त्यात भौगोलिक, रासायनिक, वायू किंवा ध्वनिलहरीत वा दुसऱ्या घटकात बदल घडून त्याला वेगळे स्वरूप प्राप्त होते त्याचा परिणाम कदाचित प्रदूषण वाढीला कारणीभूत होतो.

 मोबाईलवर बरेच वर्ष सतत बोलण्याने कॅन्सरसारखे तसेच कानाचे व मेंदूचे गंभीर आजार भविष्यात उदभवण्याचा धोका आहे असे डॉक्टर/शास्त्रज्ञांचे मत आहे.
तरी आपण या सर्वांचा साधक बाधक विचार करून मोबाईल फोन कसा वापरावा याचे अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे.जगदीश पटवर्धन बोरिवली (प.)

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..