नवीन लेखन...

स्वरराज छोटा गंधर्व

स्वरराज छोटा गंधर्व म्हणजे सौदागर नागनाथ गोरे ह्यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या कोरेगावात १० मार्च, १९१८ रोजी झाला. गोड आवाजाची निसर्गदत्त देणगी त्यांना मिळाली होती. छोटा गंधर्व हे हिदुस्तानी गायक आणि मराठी नाट्यसंगीतातील गायक-अभिनेते-संगीत रचनाकार होते. १० वर्षे वयाच्या सौदागराने ‘प्राणप्रतिष्ठा’ ह्या नाटकाद्वारे मराठी नाट्यसंगीत क्षेत्रात प्रवेश केला. अनंत हरी गद्रे ह्या समाजसुधारकाने मधुर गळ्याच्या या सौदागरला ‘छोटा गंधर्व’ हा किताब बहाल केला. त्यांचे गुरु होते आग्रा घराण्याचे शेंदे खान आणि जयपूर घराण्याचे भुर्जी खान.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातदेखील छोटा गंधर्वांनी मोलाची कामगिरी केली. गुनरंग ह्या नावाने त्यांनी रचलेल्या बंदिशी आणि नंदकिशोर, बसंतीकोश, नंदबसंत, बसंतीशंकरा, गुणिकंस ह्या नवीन रागांची निर्मिती ही त्यांच्या योगदानाची उदाहरणे आहेत.

संगीत सौभद्रातील तसेच ‘ सुवर्णतुले ‘तला कृष्ण, ‘संगीत मानापमाना’तील ‘ धैर्यधर ‘, ‘मृच्छकटिका’तील ‘चारुदत्त’, ‘ संशयकल्लोळ ‘मधला अश्विनशेठ ह्यांसारख्या भूमिकांमधून छोटा गंधर्व ह्यांनी मराठी संगीत रंगभूमी गाजवली. संगीत सौभद्रातील तसेच ‘ सुवर्णतुले ‘तला कृष्ण, ‘ संगीत मानापमाना ‘तील ‘ धैर्यधर ‘, ‘ मृच्छकटिका ‘ तील ‘ चारुदत्त ‘, ‘ संशयकल्लोळ ‘ मधला अश्विनशेठ ह्यांसारख्या भूमिकांमधून छोटा गंधर्व ह्यांनी मराठी संगीत रंगभूमी गाजवली. त्यानी सुमारे २१ नाटकातून वेगवेगळ्या भूमिका केल्या. उद्याचा संसार, भावबंधन, भ्रमाचा भोपळा, मानापमान, लग्नाची बेडी, विद्याहरण,शारदा, मृच्छकटिक, सुवर्णतुला, संशय कल्लोळ, साष्टांग नमस्कार, सौभद्र, स्वर्गावर स्वारी ही त्यांच्या नाटकांची काही नावे आहेत. मला आठवतंय १९८८ -८९ चा कालखंड असेल. मी नेहमी संध्याकाळी मित्राबरोबर ठाण्याच्या तलावपाळीवर मित्राबरोबर फिरायला जायचो. एके दिवशी संध्याकाळी सहाच्या सुमारास तलावपाळीवरील कट्ट्यावर बरोबर कौपिनेश्वर मंदिरसमोर एक व्यकती बसली होती. मी तिला ओळखले ते स्वरराज छोटा गंधर्व आहेत असे वाटले परंतु मी जवळ जाऊन त्यांना विचारले आपण छोटा गंधर्व आहात का ? तेव्हा ते होय म्हणाले. माझ्या खिशात नेहमी छोटी स्वाक्षरीची वही असायची तेव्हा मी त्यांची स्वाक्षरी घेतली. ते ठाण्यात कुणाकडेतरी यायचे.

आवाज खराब असेल तर थेट नाट्यप्रयोग रद्द करणार्‍या या अवलियाला आपला उतारवयातला आवाज प्रेक्षकांना ऐकू नये असे वाटत होते. म्हणूनच १९७८ मध्ये स्वरवैभवाच्या शिखरावर असताना, छोटा गंधर्व यांनी नाट्यसंन्यास स्वीकारला. परंतु १९७९ मध्ये अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवल्यानंतर तेथे झालेल्या एक प्रयोगासाठी परत एकदा चेहऱ्याला रंग लावला. पुढे १९८०-१९८१ मध्ये काही प्रयोगात काम करून त्यांनी लोकांना आनंद दिला.

संगीतावरील जुन्या ग्रंथांचे वाचन, ज्योतिष तसेच आध्यात्म्याचा अभ्यास व क्रिकेटसारख्या छंदांसोबत ते ‘ दुसरे बालपण ‘ जगत होते.

पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये ३१ डिसेंबर १९९७ रोजी छोटा गंधर्व यांचे निधन झाले.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..