नवीन लेखन...

स्वप्न मजला आवडते

ये ! प्रियकरा स्वप्नात माझ्या,  स्वप्न मजला भावते
कल्पनेचे राज्य जरी असे,  आनंददायी वाटते….II धृ II

तव प्रतिमा ही मनी बसवली, आठवण सदैव येवू लागली
जागेपणी जे मिळे न मजला,  स्वप्नी मी सारे तेच अनुभवते…….१
स्वप्न मजला भावते,

पूर्णत्वाचे सुख आगळे, जीवन प्रवाही येती अडथळे
हवे हवेसे मनी ठरवी ते,  केवळ स्वप्नची मिळवूनी देते….२
स्वप्न मजला भावते,

कल्पना भाव तरंगे उठूनी,  रात्री गेल्या कित्येक रंगूनी
क्षणीक असूनी भ्रामक जरी,  स्वप्न दिलासी देवून जाते….३
स्वप्न मजला भावते,

विश्वपसारा मायेचा हा,  जीवन गुंता दिसतो पहा
किरण आशेचे त्यात चमकूनी,  स्वप्न हे वरदान ठरते….४
स्वप्न मजला भावते

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..