नवीन लेखन...

स्वामी विवेकानंद जयंती

स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी झाला.

स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ. इंग्रजांचे वर्चस्व असतांना भारतभूमी व हिंदु धर्म यांच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वहाणारी आणि तन, मन, धन व प्राण याच उद्धारकार्यासाठी अर्पण करणारी काही नवरत्ने भारतात होऊन गेली. त्यांपैकी एक दैदिप्यमान रत्नी म्हणजे स्वामी विवेकानंद. धर्मप्रवर्तक, तत्त्वचिंतक, विचारवंत व वेदान्तमार्गी राष्ट्रसंत इत्यादी विविध नात्यांनी विवेकानंदांचे नाव सर्व जगात प्रसिद्ध आहे. ऐन तारुण्यात संन्यासाश्रमाची दीक्षा घेऊन हिंदु धर्माचे प्रसारक बनलेल्या तेजस्वी व ध्येयवादी व्यक्ती्मत्त्व म्हणजे स्वामी विवेकानंदआहे. त्यांच्या जयंतीच्या दिवशी` आंतरराष्ट्रीय युवकदिन’ साजरा करण्यात येतो. स्वातंत्र्यानंतर भारतभूमी व हिंदु धर्म यांची झालेली दुरवस्था रोखण्यासाठी आजही स्वामी विवेकानंद यांच्या तेजस्वी विचारांची गरज आहे.

गांधीजी म्हणत,विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली.नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात,आज स्वामी विवेकानंद असते,तर मी त्यांची गुरुस्थानी स्थापना केली असती. जवाहरलाल नेहरू म्हणतात की,विवेकानंद हे अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय करणारे महापुरुष होते.स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्यापासून ते जमशेटजी टाटा यांच्यापर्यंत शेकडो महापुरुषांनी विवेकानंदांच्या जीवन व विचारातून प्रेरणा घेतली.योद्धा,संन्यासी आणि कोट्यवधी तरुणांचे स्फूर्तिस्थान म्हणजे स्वामी विवेकानंद.

सकारात्मक विचारांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते.सकारात्मक विचारामुळे जीवनाचे नंदनवन होऊ शकते,परंतु केवळ सकारात्मक विचार उपयोगाचे नसून,माणसाला आपल्या ध्येयाची निश्चिततीही करता आली पाहिजे.स्वामी विवेकानंद म्हणतात की,‘‘एखादे ध्येय निश्चिवत केलेला मनुष्य शंभर चुका करीत असेल,तर ध्येय नसलेला मनुष्य दहा हजार चुका करतो.’’तात्पर्य असे की,ध्येयामुळे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो,परंतु असे असले,तरी ध्येयाची निवड देखील महत्त्वाची बाब असते.

स्वामी विवेकानंदांच्या जीवन वाङ्‌मयातून आपल्याला उच्च ध्येयमार्गासाठीची दिशा मिळते. प्राचीन भारत ग्रंथातून अभ्यासून न थांबता स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण वर्तमान भारत पायी फिरून अनुभवला.शेवटी स्वामीजी देशाच्या दक्षिण टोकाला-कन्याकुमारी येथे आले.तिथल्या श्रीपाद शिलेवर की,जिथे देवी पार्वतीने कैलासातल्या शिवशंकरासाठी एका पायावर तपश्चतर्या केली होती,तिथे २५,२६ आणि २७ डिसेंबर १८९२ या तीन दिवस-रात्री त्यांनी ध्यान केलं.

हा पहिला संन्यासी होता की,ज्याने आपल्याला वैयक्तिक मोक्ष अथवा मुक्ती मिळावी म्हणून ध्यान साधना केली नाही.भारताला पुन्हा तिचं गतवैभव कसे मिळवता येईल हा त्यांच्या ध्यानाचा केंद्रबिंदू होता.एकेकाळी वैभवावर असलेल्या या देशाचे भग्नावशेष त्यांनी जागोजागी भ्रमणकाळात पाहिले होते.पाश्चारत्य देशातील लोकांना जेव्हा कपडे घालण्याचीही बुद्धी नव्हती.तेव्हा या देशात एक प्रगल्भ संस्कृती नांदत होती,हेही त्यांना माहीत होते,परंतु आज मात्र भारत गुलामीत होता.भारताचा स्वाभिमान ब्रिटिशांनी पायदळी तुडवला होता. दारिद्र्याने आणि लाचारीने कळस गाठला होता. जातीभेद स्पृशास्पृशतेसारख्या घातक रूढींनी उच्छाद मांडला होता.

स्वामी विवेकानंदांनी भारतीयांना भारताकडे भारतीय दृष्टिकोनातून पाहायची दृष्टी दिली.

स्वामी विवेकानंद म्हणजे साक्षात घनिभूत देशभक्ती.त्यांचा युवा पिढीवर प्रगाढ विश्वा्स होता.भारताच्या पुनरुत्थानच्या कार्यासाठी युवकच पुढे येतील,असा त्यांना विश्वासस होता.देशभक्तीचे मूर्तीमंत प्रतीक असणारे स्वामी विवेकानंद केवळ भारतासाठीच प्रेरक आहेत असे मात्र बिलकुल नाही.संपूर्ण जगात सुख-शांती नांदण्यासाठी त्यांनी केलेले मार्गदर्शन लाखमोलाचे ठरले होते.म्हणूनच तर सार्यात जगासाठी असा काय संदेश स्वामीजींनी दिला होता,तेही समजून घेतले पाहिजे.अन्यथा मोठा गोंधळ होईल.

दोन वर्षांपूर्वी जपानचे पंतप्रधान भारतात आले होते. भारताने गेल्या दहा हजार वर्षांत कोणत्याही देशावर आक्रमण केले नाही.कारण दुसर्यां ना पायदळी तुडविणे हा भारताचा स्वभाव नाही,परंतु जगाला शांतीचा आणि शाश्वत मार्ग दाखवायचा असेल,तर भारताने बलशाली झालेच पाहिजे.त्याला पर्याय नाही.भारताला बलशाली करण्याच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलणे हेच आपल्यासमोरचे सर्वोच्च ध्येय असू शकते.तुम्ही विद्यार्थी असा की, शिक्षक, शिपाई असा की, अधिकारी, शेतकरी असा की, सौनिक तुम्ही कोणीही असा,आपले सर्वोच्च ध्येय भारत पुनरुत्थानाच्या कार्यात योगदान देणे हेच असू द्या.स्वामी विवेकानंदांच्या शब्दांत सांगायचे तर आगामी काळात हे राष्ट्र हेच तुमचे दैवत असू द्या.एकदा ध्येय ठरले की,कार्य करण्याची दिशा आपोआप गवसून जाईल.

संघटित कार्य करण्याचा मंत्र स्वामीजींनी दिला आहे.संघटित कार्यात सहभागी झाल्याने आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाचा वेग वाढतो.विवेकानंदांच्या शब्दांत,करावयास लागा म्हणजे कळून येईल की,तुमच्यात किती प्रचंड सामर्थ्य आहे.व्यक्तिमत्त्व विकासाची प्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.यासाठी शक्तीदायी विचारांची सोबत आवश्यक असते.

स्वामी विवेकानंद यांचे ४ जुलै १९०२ रोजी निधन झाले. आपल्या समूहाकडून स्वामी विवेकानंद यांना आदरांजली.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..