नवीन लेखन...

सुभाषित रत्नांनी – भाग ५

१. न त्वमात्मानं बहु विगणयन्नात्मनैवावलम्बे ।
   तत्कल्याणित्वमपि नितरां मा गमः कातरत्वम् ||
   कस्यैकान्तं सुखम् उपनतं, दु:खम् एकान्ततो वा।
   नीचैर् गच्छति उपरि च, दशा चक्रनेमिक्रमेण॥ [२/४९ मेघदूत कालिदास]
अर्थ :
हे (माझ्या) नशीबवान (प्रिये) तू याबद्दल खूप भिऊन जाऊ नकोस. मी स्वतः ला सावरीन. फक्त सुख एके सुख असे कोणाला मिळत? रहाट गाडग्याप्रमाणे ही स्थिती वर खाली फिरत रहाते.

२. विकाशमीयुर्जगतीशमार्गणा
   विकाशमीयुर्जगतीशमार्गणाः।
   विकाशमीयुर्जगतीशमार्गणा
   विकाशमीयुर्जगतीशमार्गणाः॥
अर्थ:
अर्जुनाचे बाण सर्वत्र व्याप्त झाले आहेत. ज्यामुळे शंकरांचे बाण खंडित झाले आहेत. ह्याप्रकारे अर्जुनाचे रणकौशल पाहून दानवांचा पराभव करणारे शंकरांचे गण आश्चर्यचकित झाले आहेत. शंकर आणि तपस्वी अर्जुनाचे युद्ध पाहण्यासाठी शंकरांचे भक्त आकाशात आले आहेत.
महायमक अलंकरातील एक श्लोपदाचा अर्थ भिन्न आहे. ह्याचे चारही पद सारखे आहेत पण प्रत्येक पदाचा अर्थ भिन्न आहे.

३. त्रिविक्रमोऽभूदपि वामनोऽसौ स सूकरश्चेति स वै नृसिंहः|
   नीचैरनीचैतिनीचनीचैः सर्वैरुपायैः फलमेव साध्यम् ||
अर्थ:
(भगवान विष्णु) त्रिविक्रम झाला तोच वामन (अति बुटका; याचक) पण झाला; त्यांनी डुकराचं रूप सुद्धा धारण केलं. तोच नरसिंह सुद्धा (अति उग्ररूप) झाला (तात्पर्य असं की) हलक; क्षुद्र अगदी क्षुल्लक, एकदम महान, काहीही करून काम पूर्ण होईल त्याप्रकारे प्रयत्न करायचे. (त्यात कमीपणा वाटायचं काही कारण नाही. काम सुफळ करण्याला महत्व द्यावं.)

४. श्रद्दधानः शुभां विद्यामाददीतावरादपि |
   अमित्रादपि सद्वृत्तं बालादपि सुभाषितम् ||
अर्थ:
(आपल्या पेक्षा) हलक्या व्यक्तीकडून सुद्धा श्रद्धाळू माणसाने हिताची असेल ती विद्या शिकून घ्यावी; शत्रूपासून सुद्धा चांगल्या आचरणाचे अनुकरण करावे. चांगली गोष्ट लहान मुलांनी सांगितली तरी (शिकून) घ्यावी.

५. श्रुत्वा षडाननजनुरर्मुदितान्तरेण पञ्चाननेन सहसा चतुराननाय|
   शार्दूलचर्म भुजगाभरणं सभस्म दत्तं निशम्य गिरिजाहसितं पुनातु ||
अर्थ:
षडानन [सहा मुखे असलेल्या कार्तिकेयाच्य] जन्माची (खबर मिळाल्याच्या) आनंदात पंचाननाने (पाच मुखे असणाऱ्या भगवान शंकराने) चटकन चतुराननाला (चार मुखे असणाऱ्या ब्रह्मदेवाला; आपल्या जवळ असणारी संपत्ती (?) वाघाच चर्म; सापांची कडी आणि भस्म दिलं हे ऐकून पार्वतीला हसू फुटलं.
मुलाच्या जन्माचा आनंद मानवालाच काय पण देवांना सुद्धा होतो. थोडेसे विनोदी सुभाषित आहे.

६. श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् |
   अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ||
   इति पुंसार्पिता विष्णौ भक्तिश्चेन्नवलक्षणा |
   क्रियते भगवत्यद्धा तन्मन्येऽधीतमुत्तमम् ||
(भागवत सातवा स्कंध पाचवा अध्याय)
अर्थ:
प्रल्हाद हिरण्यकश्यपुला सांगतो विष्णूची भक्ति – श्रवण (त्याच्या कथा ऐकणे, नामसंकीर्तन, मनात स्मरण करणे, पाय चेपणे, पूजा करणे, नमस्कार करणे, दास्य भक्ति (हनुमानाप्रमाणे), सख्य भक्ति (अर्जुनाप्रमाणे) आणि आत्मनिवेदन (स्वतः देव आपलं ऐकतो आहे अशा प्रकारे त्याला सर्व सांगणे) – अशी नवविधा भक्ति केली तर ते उत्तम शिक्षण होय. —

७. षट्पद: पुष्पमध्यस्थो यथा सारं समुद्धरेत् |
   तथा सर्वेषु शास्त्रेषु सारं गृह्णन्ति पण्डिताः ||
अर्थ:
फुलाच्या मधल्या भागामधून ज्याप्रमाणे भुंगा त्यातलं सार (मकरंद अचूक) घेतो, त्याप्रमाणे ज्ञानी लोक सर्व शास्त्रांमधून त्यातील अगदी गाभा समजून घेतात.

८. क्षतात्किल त्रायत इत्युदग्रः क्षत्रस्य शब्दः भुवनेषु रूढः |
   राज्येन किं तद्विपरीतवृत्तेः प्राणैरुपक्रोशमलीमसैर्वा || रघुवंश
अर्थ:
त्रिभुवनात क्षत्रीयांबद्दल खरोखर “क्षतात् त्रायते” (जखमांपासून – सर्व संकटापासून – रक्षण करणारा) अशी महान कीर्ति पसरलेली आहे. त्याच्या उलट वागून काळजाला बट्टा लागल्यावर मिळालेल्या राज्याचा काय बरे उपयोग? (दिलीप राजा गोमातेच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राण देण्यास सिद्ध झाला असता वरील संवाद होतो. मला खाऊन तू गाईला सोडून दे असं तो सिंहाला सांगतो.)

९. क्षमा शत्रौ च मित्रे च यतीनामेव भूषणम् |
   शाम्येत्प्रत्यपकारेण नोपकारेण दुर्जन: |
अर्थ:
मित्र आणि शत्रूंना सुद्धा क्षमा करणे ही गोष्ट यतिस (संन्यास घेतलेल्यांनाच) कौतुकास्पद आहे. (गृहस्थाला ते योग्य नव्हे कारण) दुष्ट मनुष्य हा त्याला (त्याच्या दुष्कृत्यांचे) वाईट परिणाम भोगल्यामुळेच वठणीवर येईल त्याच्यावर उपकार केल्यामुळे नव्हे.

१०. छिन्नोऽपि रोहति तरुः क्षीणोऽप्युपचीयते पुनश्चन्द्रः |
     इति विमृशन्तः सन्तः संन्तप्यन्ते न ते विपदा ||
अर्थ:
सज्जन लोक; तोडलेला वृक्षसुद्धा (हळूहळू का होईना पुन्हा) वाढतो; चन्द्र (एका पंधरवड्यात) खंगला तरी पुन्हा वृद्धिंगत होतोच; (त्याचप्रमाणे संकटे आली तरी त्यांचा निरास होतो.) असा विचार करून संकटांमुळे चिडत नाहीत.

११. स्थान एव नियोज्यन्ते भृत्याश्चाभरणानि च|
     नहि चूडामणि: पादे नूपुरं मूर्ध्नि धार्यते ||
अर्थ:
दागिने आणि नोकर यांना योग्य ठिकाणीच ठेवावं. (नोकराशी फ़ार जवळिक करु नये; फ़ार लाड करु नयेत तसंच अपमान पण करु नये.) जसं (डोक्यावर घालण्याचं) चूडामणि (रत्न) पायात घालत नाहीत आणि पैन्जण डोक्यात घालत नाहीत.

१२. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः।
     कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः॥
     सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्।
     जीवेद्वर्षशतं सोपि सर्वव्याधिविवर्जित।।
अर्थ: अश्वत्थामा, बलि, व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य और भगवान परशुराम हे सात महामानव चिरंजीवी आहेत. जो कोणी या सात महामानवांचे नाव घेऊन नंतर आठवे नाव ऋषि मार्कण्डेय यांचे नित्य स्मरण करेल शरीराच्या सर्व व्याधी दूर होऊन त्यास शंभर वर्षे आयुष्य प्राप्त होते.

१३. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं
     द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्।
     एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं
     भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि॥
अर्थ: ब्रह्मानंद, भव भय हरण करणारा, केवल ज्ञानमूर्तिं, सुख दुःख आदि द्वंदा पासून मुक्त, आकाशासारखा निर्लेप व गंभीर, ‘त्वत्तमसी’ आदि महावाक्यांना जाणणारा, नित्य, निर्मल,व अचल सर्वदा साक्षीरूप, सर्वभावापासून मुक्त, आणी त्रिगुण रहित सद्गुरूंना नमस्कार करतो. सद्गुरूंना वंदन करणारा श्लोक.

१४. विद्या ददाति विनयं विनयाद्याति पात्रताम् ।
     पात्रात्वाद्धनमाप्नोति धनाद्धर्मम् ततः सुखम् ।।
अर्थ: विद्ये ने विनय ,विनयाने योग्यता, योग्यते मुळे धन, धना मुळे धर्म आणी धर्मामुळे सुखाची प्राप्ति होते.

१५. कामधेनुसमा विद्या सदैव फलदायिनी।
     प्रवासे मातृवत्तस्मात् विद्या गुप्तधनं स्मृतम्।।
अर्थ: कामधेनुप्रमाणेच (किंवा कल्पवृक्षाप्रमाणे) विद्यासुद्धा फळ देणारी असते. प्रवासामध्ये ती आईप्रमाणे आपले रक्षण करते. म्हणूनच तिला गुप्त धन असेही म्हणतात.

१६. कः कालः कानि मित्राणि को देशः कौ व्ययागमौ।
     कश्चाहं का च मे शक्तिरिति चिन्त्यं मुहुर्मुहुः।।
अर्थ: (कुठलेही मोठे काम हातात घेतांना) काळ, वेळ, मित्र, जागा, उत्पन्न, खर्च, आपले स्थान, शक्ती वगैरेंचा पुन्हा पुन्हा विचार करावा. अविचार करू नये.

१७. नमन्ति फलिनो वृक्षाः नमन्ति गुणिनो जनाः।
    शुष्ककाष्टश्च मूर्खाश्च न नमन्ति कदाचन।।
अर्थ: फळांनी लगडलेला वृक्ष (त्याच्या फांद्या) खाली झुकतो. गुणवान लोक नम्रतेने वागतात, कोरडे लाकूड आणि मूर्ख लोक मात्र कधीच वाकत नाहीत.
विद्या विनयेन शोभते असेही एक सुवचन आहे.
(चाणक्य नीति )

१८. अन्नदानं परं दानं विद्यादानमतः परम्।
     अन्नेन क्षणिका तृप्तिः यावज्जीवं च विद्यया।।
अर्थ: अन्न दान करणे हे मोठे दान (पुण्यकर्म) आहे, पण विद्या देणे हे त्याहून मोठे काम आहे. अन्न खाण्याने भूक भागते आणि तात्पुरती तृप्ती मिळते, पण विद्या जन्मभर उपयोगी पडते.
विद्देचे महत्व अधोरेखित केले आहे. विद्या आहे तर सरस्वती आहे व सरस्वती जेथे आहे तेथे लक्ष्मी आहे. 

१९. पापान्निवारयति योजयते हिताय
     गुह्यं निगूहति गुणान् प्रकटीकरोति ।
     आपद्गतं च न जहाति ददाति काले
     सन्मित्रलक्षणमिदं निगदन्ति सन्तः ।।
– वसंततिलका, नीतिशतक-७२, (भर्तृहरी, इसवीसनपूर्व ५५४ वर्षे)
अर्थ: जो आपल्या मित्राला पापांपासून वाचवतो, त्याचे हित साधतो, त्याची गुपिते राखतो, त्याच्या गुणांना प्रसिद्धी देतो (सर्वांना ते सांगतो). संकटसमयी त्याला सोडून जात नाही, वेळेवर त्याच्या उपयोगी पडतो, ही चांगल्या मित्राची लक्षणे आहेत असे संत (मोठे लोक) सांगतात.

२०. आत्मापराधवृक्षस्य फलान्येतानि देहिनाम्।
     दारिद्र्यरोगदुःखानि बन्धनव्यसनानि च।।४०।।
     (चाणक्य नीति शास्त्र)
अर्थ: स्वतः केलेल्या अपराधाच्या झाडाला दारिद्र्य, रोग, दुःखे, बंधने आणि संकटे (व्यसन) अशी (कटु) फळेच लागतात. करावे तसे भरावे लागते.

२१. अर्थानामार्जने दुःखं अर्जितानां तु रक्षणे।
     आये दुःखं व्यये दुःखं अर्थः किं दुःखभाजनम्।।४२।।
     -नीतिसारः
अर्थ: संपत्ति कमावण्यासाठी कष्ट करावे लागतात. तिला सांभाळण्यासाठी मेहनत करावी लागते. त्यामुळे ती येतांनाही दुःख (कष्ट) आणि खर्च करतांनाही त्रास होतो याचाच अर्थ धन (संपत्ती) हे दुःखाचे भांडे (भांडार) नाही कां?
सुभाषितकाराचे हे सांगणे ठीक आहे, पण काय करणार? ते आपल्याजवळ नसले तरी जास्तच दुःख होते ना? सगळे सोडून सन्यास तर घेता येत नाही ना? आणि संन्यासी तरी कुठे सुखी दिसतात?
याचा मतितार्थ एवढाच घ्यायचा की पैसा म्हणजे सारे कांही नाही. तो मिळवणे आणि खर्च करणे जरा जपून करावे.

२२. धर्माख्याने श्मशाने च रोगिणां या मतिर्भवेत्।
    सा सर्वदैव तिष्ठेच्चेत् को न मुच्येत बन्धनात्।।
अर्थ: धार्मिक आख्याने ऐकतांना, स्मशानामध्ये आणि आजारी असतांना ज्या माणसाची बुद्धी नेहमी जागृत असते तो (जन्ममरणाच्या) बंधनामधून मुक्त कां होणार नाही?
त्याला नक्कीच मोक्ष प्राप्ति होईल.

२३. रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम्
     भास्वानुदेष्यति हसिष्यति पङ्कजश्रीः।
     इत्थं विचिन्तयति कोशगते द्विरेफे
     हा हन्त हन्त नलिनीं गज उज्जहार॥
अर्थ: “रात्र जाईल, पहाट होईल, सूर्य उगवेल, कमळ उमलेल, मग आपली मुक्तता होईल.” मिटलेल्या कमळाच्या पाकळ्यांमध्ये गुंतलेला भुंगा मनात असे विचार करतो आहे, पण अरे देवा! हत्तीने ते कमळच उपटून टाकले की!
आपण जशी अपेक्षा करतो तसे प्रत्येक वेळी होईलच असे नाही.

२४. रत्नैः महार्हैः तुतुषुर्न देवाः न भेजिरे भीमविषेण भीतिम्।
    अमृतं विना न प्रययुर्विरामम् न निश्चितार्थात्विरमन्ति धीराः।।
अर्थ: समुद्रमंथन करतांना मिळालेल्या रत्नांनी देव संतुष्ट झाले नाहीत किंवा जालिम विषाच्या भीतीलाही ते बळी पडले नाहीत. अमृत मिळेपर्यंत ते स्वस्थ बसले नाहीत. धीरोदात्त पुरुष ठरवलेले लक्ष्य गाठल्याशिवाय विश्रांति घेत नाहीत.

२५. धैर्यं यस्य पिता क्षमा च जननी शान्तिश्चिरं गेहिनी
    सत्यं सूनुरयं दया च भगिनी भ्राता मनःसंयमः।
    शय्या भूमितलं दिशोऽपि वसनं ज्ञानामृतं भोजनं
    एते यस्य कुटुम्बिनः वद सखे कस्माद् भयं योगिनः।।
अर्थ: धैर्य हा ज्याचा पिता आणि क्षमा ही माता आहे, शांति ही पत्नी, सत्य हा पुत्र, दया ही बहीण, संयम हा भाऊ आहे, जमीन ही शय्या, दिशा हीच वस्त्रे आणि ज्ञानामृत हेच भोजन आहे. ज्याचे असे सर्व कुटुंबीय आहेत अशा योग्याला कशाची भीती वाटेल ?
नंगेसे खुदा डरता है अशी एक म्हण आहे.
ज्या लोकांकडे कांहीही नाही त्यांची अगतिकता या वाक्यांमध्ये आहे. पण या सुभाषितामधल्या योग्याने आपणहून हा कठीण मार्ग स्वीकारला आहे.

— डॉ. दिलीप कुलकर्णी
१६.०४. २०२३
मोबा. ९८८१२०४९०४

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 58 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

4 Comments on सुभाषित रत्नांनी – भाग ५

  1. नेहमी प्रमाणे छान आणि सोपा अर्थ सांगितला आहे. धन्यवाद!

  2. आपले वेद, पुराणं हजारो वर्षे जुनी असुनही त्यातील प्रत्येक बाब, अजुनही काल बाह्य झाली नाही. डॉ.कुळकर्णी साहेबांनी लिहीलेली मालिका जीवनाचा आदर्श घालून देणारी आहे व त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे.

  3. प्रत्येक श्लोक व त्याचा अर्थ वाचत रहावेसे वाटते.भाषा सहज समजणारी असल्याने कंटाळा हल्लीच्या भाषेत बोअर होत नाही.मूळ संस्कृत भाषा त्यांचे सौंदर्य,गोडवा बोली भाषेत करताना त्याची गोडी वाढवली आहे.भाषा ही किती परिपूर्ण समृद्ध आहे हीच खरी रत्न आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..