नवीन लेखन...

पालक

पालक ही एक सुंदर पालेभाजी आहे. विशेष म्हणजे अगदी हिमालय ते कन्याकुमारी कोठेही पालक होऊ शकतो. ही एक अत्यंत चविष्ठ आणि अतिशय पौष्टिक भाजी आहे. केवळ भारतातच नव्हे तर सर्व जगाच्या पाठीवर आज पालकला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. फार पूर्वीपासून अरेबियन प्रदेशात पालकला अतिशय महत्त्व आहे. नंतर ते परत युरोपात शिरले. फ्रान्सची राणी कॅथेरीना हिला पालक फारच आवडले. तिने फ्रान्समध्ये प्रत्येक ठिकाणी पालकाची लागवड केली आणि प्रत्येकाने पालकाचे महत्त्व प्राप्त झाले. हे लोण अमेरिकेत गेल्यावर प्रत्येक शास्त्रज्ञाने पालकाची अत्यंत स्तुती केली आणि अठराव्या शतकात पालकाची जणू स्पर्धाच लागली. जवळजवळ अर्ध्या भागात पालकाची लागवड करण्यात आली. आज पालकाची भाजी, सूप वगैरे असंख्य प्रकार पुढे येऊ लागले. व ते जगप्रसिद्ध होऊ लागले. भारतात पालकाची लागवड साधारणपणे मार्च ते मे आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर करतात. पण हे बाराही महिने पीक घेता येते.

पालक साधारणपणे उकडून पालकची भाजी करतात. मात्र त्यात एक समस्या येते. पालक उकडल्यावर पालकातील ऑक्झालिक ॲसिड तयार होते व मूत्रदोष निर्माण होतो. ज्यांना मूतखडा असेल त्यांनी पालक कमी प्रमाणात खावा.

हे जरी खरे असले तरी पालकाला कोणीही वाईट म्हणणार नाही. कारण मूत्रदोष सोडल्यास प्रत्येकाने पालक खाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एवढेच नव्हे तर त्याची माहिती आयुर्वेदात त्याचप्रमाणे दिली आहे.

विसाव्या शतकात पालकाचे सूप फारच प्रसिद्ध झाले. पालक पाण्यात भिजवून ज्यात थोटे बटाटे अथवा कांदे घालून त्यात लसूण अथवा आले घालून त्याचे सूप केले तर ते फारच पौष्टिक असते. पालकात जीवनसत्व ए, बी, सी तसेच बिटा कॅरोटीन हे मोठे गुणधर्म आहेत. पालक आहारात घेतल्याने सुबुद्धी येते. म्हणूनच पालक हे वैद्यकीयदृष्ट्या अतिशय पौष्टिक आहे.

वैद्यकीयदृष्ट्या पालकामध्ये लोह भरपूर प्रमाणात सापडते. त्यामुळे पंडुरोग (अॅनेमिया) त्रास बरा होतो. त्यामुळे रक्तपुरवठा वाढतो. तसेच कॅल्शियम भरपूर प्रमाणात सापडते व हाडाची बळकटी होते. तसेच दातांचे रक्त ताबडतोब थांबवता येते. पालक व गाजराचा रस मिसळून घेऊन ते दातावर चोळावे.

पालकाने, लहान मुलांचे गादी ओलं होणे ताबडतोब थांबवता येते. तसेच दम्याचे विकार झाल्यास पालकामुळे त्वरित आराम मिळतो. तसेच घशाला खवखव वाटल्यास पालकाचे रस घेतल्याने आराम पडतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालकाची भाजी नियमित खाल्ल्यास त्याची पचनशक्ती वाढते व पोट साफ राहते.

गर्भवती स्त्रीला पालकाची भाजी नियमित दिल्याने प्रसूती सुलभ होते व बाळाला पाजणे सुलभ होते. पालक हे सारक असल्याने पावसाळ्यात भाजी अत्यंत साफ करून घ्यावी.

पालकाचे थोडक्यात गुणधर्म

गालावर पुटकुळ्या पालकाचा रस लावावा. त्याने पुटकुळ्या नाहीशा होतात. तोंड आल्यास पालकाची भाजी खाल्ल्यास त्वरित आराम मिळतो. अमायनो ॲसिड (प्रथिने) सर्व प्रथिने अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरने पालकावर खूपच काम केले.

त्यांच्याप्रमाणे पालक हे हिरवीगार व ताजी भाजी असते आणि त्यामुळे पालेभाज्यामुळे लोहचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. १८० ग्रॅम पालक घेऊन ते उकळल्यास त्यात लोहचे प्रमाण ६.४३ मिलीग्रॅम इतके असते. पालक घेताना लोह आपोआप विरघळते. त्याचबरोबर व्हिटॅमिन सी घेतल्यास ते लोहाबरोबर जाते.

तसेच पालकामध्ये चुन्याचे प्रमाण खूप वाढते व बरोबर जस्त असल्याने ते लोहाबरोबर असल्याने त्याचे फायदे होतात.

साधारण २००४ ते २००६ची गोष्ट. अमेरिकेने आपल्या शेतामध्ये पालक लावला आणि बऱ्याचशा अमेरिकेन शेतकऱ्यांना एकंदर १७५ मिलीयन डॉलर एवढे पालकाचे उत्पन्न मिळाले. म्हणजे जवळजवळ संबंध अमेरिकेमध्ये ९४ टक्के पालकाची आयात वाढली. मात्र कॅनडात अत्यंत थंडी असल्याने पालकाची निर्यात केली.

पालकात भरपूर प्रथिनेच म्हणजे अमायनो अॅसिड असते म्हणूनच त्याचा वापर करावा.

ही एका पालकाची गाथा आहे. ही पालेभाजी ती हिरवीगार असते व सदैव ताजी असते अशा पालकाची भाजी निवडून करावी. मग त्यात पालक अथवा मेथी, मुळा माठ कोणताही असो, ती नेहमीच पौष्टिकच असते, असा आयुर्वेदाचा दंडक असतो. भारतामध्ये आजमितीस अनेक प्रकारच्या पालेभाज्या आपल्याकडे करत आल्या आहेत. उदाहरणार्थ पालक सूप, पालक पनीर, पालकाच्या वड्या उकडून वगैरे तयार केल्या जातात.

१०० ग्रॅम पालक घेतल्यास त्यात खालील गुणधर्म आढळतात.

– मदन देशपांडे 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..