नवीन लेखन...

या मसाल्यात दडलंय काय? – भाग तीन

७) जिरे- बहुतेक मसाल्यात व सुवासिक द्रव्यात याचा वापर. भारत व चीन मसाले मुख्य उत्पादक. एकेकाळी जिरे युरोपात चलनासारखे वापरात होते. राजांच्या कलेवरांना याचा लेप लावायचे. पडसे, खोकला, पोटातील वायू कमी करण्यासाठी, पाचक, स्वादुपिंड, विकर उत्तेजक म्हणून वापर. कर्करोगप्रतिबंधक, (यकृत व जठराचा) यकृतातील निर्विषीकरण विकर उत्तेजक, अॅण्टिऑक्सिडंट, शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवतात. प्रथिने १७.७%, मेद २३.८, तंतू ९, कर्बोदके ३५.५ व क्षार ७.७%, कॅल्शियम १०८० मि.ग्रॅ., फॉस्फरस ५११, लोह १२, कोलीन १०६५, १०६५, मॅग्नेशिअम ४७५, जस्त ३ व ‘अ’ जीवनसत्त्व ५२२ मायक्रो क्षुल्लक दिसणारे हे जिरे किती बहुगुणी !

८) मिरची- ‘झणझणीत फोडणी’ या शब्दप्रयोगाला जन्म देणारी मिरची जगात सर्वात जास्त पिकवणारा, निर्यात करणारा व खाणारा देश म्हणजे भारत. दरवर्षी अंदाजे १२ लाख टन पिकते व २ लाख टन देशात खपते. मिरचीचा तिखटपणा ‘कॅप्सिसीन’ या वेदनाशामक द्रव्यामुळे असतो, मिरच्यात सी, के, पी जीवनसत्त्वे विपुल असतात. यांचा रक्त साकळण्याशी संबंध असतो. प्रतिशत ‘क’ जीवनसत्त्व १११ कॅल्शियम ३०, फॉस्फरस ८०, तांबे, मँगनीज, जस्त प्रत्येकी २, लोह ५, वाळल्यावर कॅल्शियम १६० व फॉस्फरस ३७० होते. मिरच्या पाचक रस वाढवतात विशेषतः प्रथिनांसाठी लागणारे.

९) लसूण- लसणाचा विशिष्ट वास ‘अॅलिसीन’ द्रव्यामुळे असतो. लसणाच्या पाकळीत असणाऱ्या ‘ॲलीन’चे ठेचल्यावर आतील विकरांमुळे ‘अॅलिसीन’ मध्ये रुपांतर होते. अॅलिसीनमुळे छातीतील कफ पातळ होण्यास
मदत होते. लसणाच्या नियमित सेवनाने जठर व मोठ्या आतड्याचा कर्करोग कमी होतो असे आढळले. लसणातील ‘अगोन’मुळे बिंबिकांची गुठळी होत नाही. अगोन व अन्य द्रव्यांमुळे कोलेस्टेरॉल कमी होते. यात कॅल्शिअम ३०, फॉस्फरस ३१०, मॅग्नेशिअम ७.१, जस्त २ मि. ग्रॅ. प्रतिशत असते. लसूण उत्तेजक, कफनाशक, मूत्रोत्तेजक आहे.

१०) चिंच- टॅमरिंडस
इंडिकस. अरब ‘भारतीय खजूर’ म्हणतात. चिंचेतील ‘क’ जीवनसत्त्व उष्णतेने नष्ट होत नाही व त्यातील आम्लांमुळे चिंच एखाद्या पदार्थात टाकल्यास त्या पदार्थातील अन्य जीवनसत्त्वे नाश पावत नाहीत. पाचक, उत्तेजक व लाळ वाढवणारी. यात कॅल्शियम १७०, फॉस्फरस ११०, मॅग्नेशियम ४१ व लोह १७ मि. ग्रॅ. प्रतिशत असते. ११) जायपत्री-जायफळला चिकटलेले जाळीदार आवरण. वापर गरम मसाल्यात. यात कॅल्शियम १८०, फॉस्फरस १००, लोह १२, मॅग्नेशिअम २१३, मँगनीज व जस्त २ बीटा कॅरोटिन ३०२७ मायक्रो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..