नवीन लेखन...

सिंह झालेले गाढव

मी ह्या उघड्या डोळ्यांनी पाहिले —
जंगलात कित्येक गाढव सिंह होताना,
आणि कित्येक सिंह गाढव होताना…

जंगलाचा खरा राजा सिंहच होता,
पण आज जंगलात गाढवालाही
राजाचं मान मिळालं आहे.
कारण जंगलात सिंहाचे नाही,
तर गाढवाचे समर्थक जास्त झालेत…

आज गाढवाला मिळणारे समर्थन पाहून
सिंहही स्वतःला शेळी समजू लागला आहे.
प्रत्यक्षात नाही, पण मनाच्या आत
त्याचाही जणू लिंगबदल झाल्यासारखा आहे.

शंभर गाढवे मिळून
एका सिंहाला मूर्ख ठरवतात,
त्याला नाममात्र राजा करून
वर्षानुवर्षं जंगलावर राज्य करतात…

©कवी – निलेश बामणे

( दिनांक: 25/10/2025 )

 

Avatar
About निलेश बामणे 426 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

2 Comments on सिंह झालेले गाढव

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..