नवीन लेखन...

श्री गणेश अवतारलीला ८ – श्री ढुंढिराज अवतार

श्री गणेश अवतारलीला ८ – श्री ढुंढिराज अवतार

कधीकाळी काशीनगरीत दिवोदास नावाचा एक अद्भुत राजा झाला. याला राज्य करण्याचा कंटाळा आला म्हणून हा वनात जाऊन तप करू लागला.


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

पुण्यशील असलेला राजा राज्य सोडून गेल्यामुळे राज्यात अवर्षणाचे संकट आले. सगळ्यांनी देवांचा धावा केला.

आपल्या सृष्टीची रचना कोलमडत आहे हे पाहून व्यथित झालेले ब्रह्मदेव दिवोदासाला भेटायला गेले. त्याला पुन्हा राज्य स्वीकारण्यास सांगितले. दिवोदासाने अजबच अट घातली.माझ्या राज्यात देवांची सत्ता चालणार नाही.

श्री ब्रह्मदेवांचा नाईलाज होता. त्यांनी होकार दिला. अडचण अशी की काशीत सत्ता चालते विश्वनाथाची. त्यांना बाहेर कसे काढायचे?

शेवटी ब्रह्मदेवांनी प्रार्थना केली की विंध्य पर्वतावर तपश्चर्या करणार्‍या मरीची नामक ऋषींना दर्शन देण्याकरता चला. श्री शंकरही तयार झाले. ऋषी नाट्यदर्शन आणि मुक्ती मिळाली पण ब्रह्मदेवांनी त्यांना आपली अडचण सांगितली.

मी काशीचा स्वामी आहे मला काशीचा कधी विरह होणार नाही. या भगवान शंकरांच्या कल्पनेला धक्का बसला.

त्यांनी देवदासला चे राज्य मिळवण्यासाठी अनेक देवांना आज्ञा दिली. कोणाचाच उपाय चालला नाही.

शेवटी नाईलाज झालेली भगवान शंकर, सकल विघ्नहर्ता श्रीगणेशांना शरण गेले.

भगवान श्री शंकरांना या संकटातून मुक्त करण्यासाठी श्री गणेशांनी ढुंढिराज नावाचा अवतार घेऊन दिवोसाला उपदेश केला. मुक्ती दिली.

काशीचा विरहात अहंकार रहीत झालेल्या शंकरांनी परत आल्यावर नियम घालून दिला की माझ्या पूर्वी ढुंढिराजाची पूजा होईल.

आजही भगवान विश्वनाथाच्या मंदिराच्या समोर भगवान श्री ढुंढिराज भक्तांच्या विघ्नाना दूर करीत विराजमान आहेत.

— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

प्रा. स्वानंद गजानन पुंड
About प्रा. स्वानंद गजानन पुंड 306 Articles
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी म्हणजे येथे संस्कृत विभाग प्रमुख रूपात कार्यरत. २१ ग्रंथात्मक श्रीगणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रिकार्ड मध्ये विक्रम रूपात नोंद. श्रीमुद्गलपुराण कथारूप आणि विश्लेषण ही ९ खंड १७०० वर पृष्ठांची ग्रंथमालिका. विविध धार्मिक ,शैक्षणिक, सामाजिक संस्थांमधून २१०० वर प्रवचन, व्याख्याने

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..