श्री गणेश अवतारलीला ११ – श्री वल्लभेश अवतार
निर्गुण, निराकार, परब्रह्म, परमात्मा, भगवान श्रीगणेशांचा सर्वाद्य अवतार आहे, श्रीवल्लभेश अवतार. चैत्र शुद्ध द्वितीयेला होणारा हा श्रीवल्लभेश अवतार सगुण-साकार रूपातील सर्वप्रथम अवतार होय. […]
निर्गुण, निराकार, परब्रह्म, परमात्मा, भगवान श्रीगणेशांचा सर्वाद्य अवतार आहे, श्रीवल्लभेश अवतार. चैत्र शुद्ध द्वितीयेला होणारा हा श्रीवल्लभेश अवतार सगुण-साकार रूपातील सर्वप्रथम अवतार होय. […]
भगवान ब्रह्मदेवांनी सरस्वती, श्री विष्णूंनी पुष्टी, श्री शंकरांनी योगिनी, देवी आदिशक्तीने मोहिनी आणि भगवान श्री सूर्यांनी संजीवनी नामक कन्येला निर्माण करून आपल्या या कन्या भगवान गणेशांना समर्पित केल्या. या पाच कन्यांशी विवाह केल्याने श्रीगणेशांना पंचकन्यापती गणेश म्हणतात. […]
श्री मुद्गल पुराणात अत्यंत मोजक्या वेळेसाठी झालेल्या गणेशांच्या अवतारांपैकी एक अवतार श्री शूर्पकर्ण अवतार. या अवताराचे नाव मोठे सुंदर आहे. शूर्पकर्ण. येथे कान सुपासारखे, म्हणताना केवळ त्याच्या आकाराचा नव्हे तर गुणांचा विचार महत्त्वाचा आहे. […]
आजही भगवान विश्वनाथाच्या मंदिराच्या समोर भगवान श्री ढुंढिराज भक्तांच्या विघ्नाना दूर करीत विराजमान आहेत. […]
सामान्यत: श्रीगणेशांचे अवतार देवतांच्या संरक्षणासाठी होतात. पण राक्षसांच्या संरक्षणासाठी झालेला अवतार आहे चतुर्भुज अवतार. […]
वैशाख शुद्ध पौर्णिमेला सूर्योदय समयाला भगवंतांनी त्याच मूर्तीतून पुष्टिपती अवतार धारण केला. भगवान श्री कृष्णांनी मांडलेली दोन पुष्टिपती गणेश यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा आणि पुणे जिल्ह्यातील सुपे येथे विद्यमान आहेत…… […]
स्वर्ग जिंकलेला मायाकर पाताळात गेला. या भीषण संकटाच्या वेळी पूर्वी केलेल्या तपाच्या आधारे श्री शेषांनी प्रार्थना केल्यावर भगवान त्यांच्या मनातून श्रीशेषात्मज रूपात प्रकट झाले. […]
भगवान गणेशांचा भाद्रपदातील जन्मोत्सवा असो की माघ महिन्यातील. अनेक जागी गणेश जन्म म्हटला की एकच कथा ऐकवली जाते. देवी पार्वतीने अंगावरच्या मळापासून गणपती तयार केला. इ. गंमत अशी आहे की देवी पार्वतीच्या अंगावरच्या मळापासून झालेल्या उमांगमलज अवताराची जी कथा आपण ऐकतो ती ना भाद्रपद चतुर्थीची आहे ना माघ चतुर्थीची. ती कथा आहे कार्तिक शुद्ध चतुर्थीची. […]
चार हात, लाल रंग, सोंडे सह असलेला अवतार हे या द्वापार युगातील आपल्या सगळ्यात जवळच्या अवताराचे वैशिष्ट्य असल्याने सामान्यतः गणेशमूर्ती याच स्वरूपात केल्या जातात. या अवताराचा प्रगटोत्सव देखील भाद्रपद शुद्ध चतुर्थीचाच आहे. […]
भाद्रपद चतुर्थी चा अवतार शिवपार्वती यांच्या घरी झाला असल्याने त्या चतुर्थीला स्वर्गाची चतुर्थी तर विनायक अवतार महर्षी कश्यपने आणि अदितीच्या घरी झाला असल्याने या चतुर्थीला पृथ्वीवरची चतुर्थी म्हणतात. अशा या विनायक अवताराची जन्मतिथी आहे माघ शुद्ध चतुर्थी.
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions