शांत निद्रा

शांत अशा त्या मध्यरात्री, उंच पलंगी मऊ गादीवरी
लोळत होतो कुशी बदलीत,  निद्रेची मी प्रतीक्षा करी….१,

निरोगी माझा देह असूनी,  चिंता नव्हती मम चित्ताला
अकारण ती तगमग वाटे,  बघूनी दिशाहिन विचारमाला….२,

प्रयत्न सारे निष्फळ जावूनी,  निद्रा न येई माझे जवळी
धूम्रपान ते करण्यासाठी,  उठूनी सेवका हाक मारली….३,

बऱ्याच हाका देवून झाल्या,  परि न सेवक तेथे आला
मागील दारी जावूनी बघता,  दिसला तो मज शांत झोपला….४

कांहीं क्षण मी बघत राहीलो,  शांत शरिरी शांत झोप ती
हेवा वाटूनी त्या निद्रेचा, येवूनी पडलो गादीवरती…५

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८४०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1585 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…