नवीन लेखन...

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व व्यायाम

ज्येष्ठ नागरीक वयोमर्यादा ६५ ते ७५ वर्षापर्यत. अशा नागरिकांना असंख्य समस्या आड येतात. कधी कधी तर त्या आपल्याला समजतही नाहीत. साधारणपणे नेहमीची समस्या जवळजवळ सारखीच असते. या म्हणजे ज्येष्ठ नागरीकाला कधी कधी चक्कर येतात. याला आपण साधारणपणे व्हर्टिगो असे म्हणतो. तसेच पायाच्या पोटऱ्या प्रंचड दुखतात. तेल लावून अथवा औषध घेऊन त्यात उपाय सापडतील, असे नाही. या पोटऱ्याजवळ गुडघे दुखणे हीदेखील कायमची बाब असते. त्याचबरोबर कंबर दुखणे अथवा पाठ दुखणे, हेदेखील नित्याची बाब होऊन बसते. कधी कधी हात वर केला तर तो आखडतो. मग तो उजवा असो वा डावा असो पंरतु यावर उपाय सापडत नाही. कधी कधी मानच आखडते. किती फिरवण्याचा प्रयत्न केला तर अतिशय दुखते. दुर्दैवाने या समस्यांना उपाय सापडत नाही. याचे कारण म्हणजे आपण कधी व्यायाम करत नाही.

नियमितपणे अथवा एकसारख्या केल्याने सर्व समस्या आपोआपच सुटत जातात.

साधारणपणे ६० ते ७० लोकांपर्यत व्यायाम करणेच आवडत नाही, आपण लक्षच देत नाही. हाताने आडवे, तिडवे हात मारणे अथवा उगाचच पायाने उडया मारणे, याला व्यायाम कधी म्हणत नाही. खरे म्हणजे पातंजली ऋषींनी योगाचा प्रसार भारतात केला.

हा योग हरीव्दार येथे राहाणारे बाबा रामदेव यांनी तो उचलून धरला. आपल्याकडे सरकारी गृहरचना जेव्हा सोसायटी असते तेथे अनेक लोक आपली जाहिरात लावून योगाचे महत्त्व सांगतात. पातंजलीप्रमाणे ते म्हणतात की, योग खरोखरच शिकायचे असेल तर गुरू असणे आवश्यक असते. आता टी.व्हीवर दररोज सकाळी बाबा रामदेव यांचे “आस्था” या ठिकाणी गुरुचे धडे देतात. तर हे गुरू आपण कशाप्रकारे करू शकतो. ते जमण्यासारखे असते नाही तर तुमच्या सहकारी संस्थेमध्ये जर कोणी चांगला गुरू असेल तर हे काम होऊ शकेल. सहकारसंस्थेमध्ये काम करणारे असतील जरुर जावे, पण गुरू असणे इष्ट आहे. ठाण्यामध्ये अण्णा व्यवहारे नावाचे हे गृहस्थ मदत करू शकतात. तसेच आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट नावाचे लोक नेहमी अशाप्रकारे काम करतात. पण जर कोणी लोकांनी मिळून केले तर हे शिक्षण एका महिन्यात शिकता येईल, इतके सोपे असते. म्हणूनच असे गुरू कुठे तरी मिळवणे एका महिन्यात बंद होईल. ही खात्री बाळगा. पण व्यायाम करणे अत्यंत इष्ट आहे हे खरे आहे व ते आपण आपल्या सोसायटीतील लोक सहज करु शकतात.

ज्येष्ठ नागरिकांचे पहिले लक्ष म्हणजे अनियमितपणा. रात्री झोपताना खूप उशीर होतो. सकाळी केव्हाही उठावे. नंतर झोप अंगावर येते. आठ साडेआठ नऊ वाजेपर्यत उठतात. मग चहापाणी खाणे पिणे सुरू होते, हा अत्यंत अनियमितपणा दिसून येतो. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकानी मग तो स्त्री असो वा पुरुष असो त्याने रात्री दहा वाजता झोपलेच पाहिजे असा नियम प्रत्येकाने तंतोतंत पाळलाच पाहिजे. जर आपण रात्री दहा वाजता झोपलो तर सहापर्यत सहज उठू शकतो. उठल्यावर स्वतःची अंथरुणे व पांघरून घडी करून ठेवावी. तसेच बाथरुममध्ये जाताना डोळयावर पाणी मारावे व चष्मा असेल तर पाण्याने धुवून ठेवाल. सकाळचा चहा कोणीतरी करतेच त्यातं एक अथवा दोन चांगली बिस्किटे खावी, नंतर पेपर वाचणे चांगले. पेपर झाल्यानंतर शौच मुखमार्जन झाल्यावर दाढी करणे काम करणे होते. आपले अंतरवस्त्रे आपणच स्वतःच धुणे आवश्यक असते. कारण आपले कपडे अस्वच्छ असतात ते आपणच धुवावे. या कपड्याने वरचा सगळा थकवा निघून जातो व झडझडीत वाटते. तसेच आंघोळीला कोणी गार पाणी घेते तर कोणी गरम पाणी घेते. पाणी कोणतेही घ्यावे ज्याचा त्याचा प्रश्न असतो. मात्र आंघोळ झाल्यावर कपडे करून व्यायाम करणे, अत्यंत इष्ट असते. व्यायाम साधारण ३० ते ४० मिनिटे सहज करता येतो. मग न्याहारी घ्यावी, कोण सकाळी आंघोळीच्यावेळी नागरिकाने घेतलेच पाहिजे दुधात भरपूर कॅल्शियम असतेच. तसेच बरोबर प्रत्येकाने १०० ग्रॅम चांगले बदाम १०० ग्रॅम अक्रोड याची मिक्सरने पूड करुन एक एक चमचा अवश्य घ्यावे. नास्ताबरोबर काहीतरी खातोच, त्यात इडली-सांबार अथवा डोसा अथवा कांदा-पोहे, उपमा, शिरा, धिरडे आवश्यक असते. हे संपल्यावर हिरव्या सालीचे केळे खाणे आवश्यक असते. एक लक्षात ठेवा जर आपण नियमितपणे व्यवस्थित खाणे. केळे खाल्ले तर मानवाचे आयुमर्यादा वाढते, दहा वर्षानी वाढते. हा सृष्टीचा नियम आहे. आहार नेहमी संतुलित घ्यावा. माणसाने फिरावे पण खूप फिरणे व्यायाम होऊ शकत नाही. तसेच हल्ली मद्यपान करणे हे एक सिबॉल स्टेट्स झाले आहे. माणसाने कोणत्याही प्रकारे सेवन केल्याने त्याचबरोबर मांसाहार खाणे तसेच इतर काही तेलकट खाणे याचा प्रकृतीवर वाईट परिणाम होतो. रात्री झोपताना अॅसिडीटी वाटते व मन बैचेन होते. प्रत्येकाने आपले पोट अवश्य कमी करावे त्याने शरीराला त्रास होतो. वरील व्यायाम केल्यास पोट कमी होते. आम्हाला डॉक्टरांनी दोन पेग घ्यावयास सांगीतले असे कोणीतरी सांगतो, पण त्यात काहीच अर्थ नाही. प्रत्येकाने आपण कसे वागतो ते स्वतःच ठरवावे तरच माणसाला मनःशांती मिळते. मांसाहार घेताना बोकडाचे मटण कधीही खाऊ नये कारण त्याने कोलेस्टेरॉल वाढतो. इतर चिकन अथवा मासे खाण्यात काहीच हरकत नाही. मात्र जे मांस-मासे खात नाही त्याने भाजीपाला मटकी उसळ तसेच हर प्रकारचे सूप वगैरे अन्न खाणे योग्य आहे.

आता ज्येष्ठ नागरिकांमध्ये एक नवीन गोष्ट दृष्टीस येते. ते म्हणजे विसरभोळेपणा.

कधी कधी समोरच मनुष्य आपल्या समोर जातो. पण त्याला कोणीही ओळखत नाही.

तसेच आपल्याकडे पाहून ज्येष्ठ नागरिकास आपल्याला कोण म्हणून विचारतात. माणसाची स्थिती फारच विचित्र होते. शेवटी वेळ निभावली जाते. विसरभोळेपणा जरी असला तरी हा अतिशय गंभीर प्रकार आहे. एका वेळेस ठीक परंतु वारंवार विसरणे अथवा आपण कोण म्हणणे हे प्रत्येक वेळी अतिशय गंभीर बाब आहे. कारण ज्येष्ठ नागरिक रोज नियमितपणे जेवत असतो. कालांतराने त्याचे जेवण हळूहळू कमी असते. त्यामुळे आपल्या रुद्राभिसरण सतत इतर रक्तात मिसळत असतात. परंतु कालांतराने हे रक्त मेंदूपासून व्यवस्थित पुरत नाही व हे रक्त मेंदूला खूपच कमी पडते व त्यामुळे आपल्याला अशा प्रकारची भावना तयार होते जर लक्ष दिले नाही तर हळूहळू हा विसरभोळेपणा वाढत जातो. भाजी आणल्यावर पत्नीने आपला बाजारात काय सांगितले हे तरी विसरून जातो. पण हे डॉक्टरला दाखविणे अत्यंत चांगले. ही गोष्ट अगदी निष्कारण मानली जातात. कारण हा जर मेंदूला रक्त कमी पडला तर त्याचे परिणाम फार भयावह होतात. याला इंग्रजीमध्ये अॅनेवैक्सीया असे म्हणतात. आणि हे डॉक्टर दाखविणे अत्यंत चांगले आहे. मात्र डॉक्टर अतिशय चांगला असावा व कोणीही कसलीही कॅप्सूल घेऊन जातो व रोगी परत घरी येतो म्हणूनच चांगला आपल्या परिचयाचा तसेच माहिततच डॉक्टर असावा. आहारसंहितेमध्ये याला स्मृतीविस्मरण असे म्हणतात. व याला लवण म्हणजे मीठ याने निश्चित अपाय होतो. आपल्याला सोडियम कमी पडतात व म्हणूनच जर जास्तीत जास्त अर्धा चमचा टाटा सॉल्ट (टाटा मीठ) दिवसातून दोनदा घेतल्यास फरक पडतो. तरी पण डॉक्टरने आपले रक्त तपासणे आवश्यकच असते. यात सोडियम, पोटॅशियम व क्लोरीन याची तपासणी करणे इष्ट आहे.

सोडियम १३६ ते १४६

पोटॅशियम ३.५ ते ५.४

क्लोरीन ९६ ते १०८

हे सर्वात कमीत कमी अथवा जास्तीत जास्त असतात मात्र आपल्यात रक्तातील सोडियम १३६ पेक्षा कमी असू नये व ते कमी झाल्यास हा फार गंभीर मामला असतो.

-श्री. मदन देशपांडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..