नवीन लेखन...

ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे

ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे जन्म ७ ऑगस्ट १९६४ रोजी झाला.

माधवी गोगटे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली, त्यांनी १९८७ साली ‘सूत्रधार’ चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये प्रवेश केला. १९९० मध्ये आलेल्या ‘घनचक्कर’ या चित्रपटातील त्यांची भूमिकाही विशेष लोकप्रिय ठरली होती. ‘घनचक्कर’या मराठी चित्रपटातून त्यांना प्रसिद्धी मिळाली. या यशानंतरही त्यांनी मागे वळून पहिले नाही. त्यानंतर त्या ‘सत्वपरीक्षा’ या मराठी चित्रपटातही दिसली.

माधवी गोगटे यांनी मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं होतं. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या.  ‘भ्रमाचा भोपळा’, ‘गेला माधव कुणीकडे’ ही त्यांची नाटकं तुफान गाजली होती. राजेश कोळंबकर लिखित आणि संतोष पवार दिग्दर्शित ‘अंदाज आपला आपला’ या नाटकात त्या दिसल्या होत्या. विशेष म्हणजे त्यांनी अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केलं होतं.

माधवी गोगटे यांच्या हिंदी मालिका ‘मिसेस तेंडुलकर’, ‘कोई अपना सा’, ‘ऐसा कभी सोचा न था’, ‘एक सफर’, ‘बसेरा’, ‘बाबा ऐसो वर ढुंडो’, ‘ढुंड लेंगी मंजिल हमें’, ‘कहीं तो होगा’ या हिंदी मालिकेत झळकल्या. सोबतच “तुझं माझं जमतंय” या मराठी मालिकेतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..