नवीन लेखन...

सह्याद्रीतील महादरी-सांधण व्हॅली

“महाराष्ट्रात गड-किलल्यांवर चढाई करणं जितकं साहसी आणि थरारक तितकच इथल्या दर्‍या-खोर्‍यां मध्ये भटकण्याचा अनुभव स्मरणीय आणि हो अॅडव्हेंचरस सुध्दा! कारण दरीतून चालण्याचा अनुभव म्हणजे एका दगडावरुन दुसर्‍या खडगावर, आणि मार्ग थेट उतराईचा असल्यामुळे ‘रॅपलिंगचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स’ म्हणजे काय ते कळतं;सांधण व्हलीतून ट्रेक करताना हे सारं काही अपल्या गाठीशी असतं; गडमाथ्यावरुन घाटातून पाहिलेली दरी प्रत्यक्षात मात्र पार करताना कशी असू शकते हे सांधण व्हॅली पार केल्यावरच कळून चुकतं,अश्या या विशालदरीचा वेध…”

सांधण व्हॅली पार करण्यासाठी किंबहुना त्याचा अनुभव घेण्यासाठीची वाटचाल सुरु होते साम्रद गावापासून कसारा स्थानकापासून सामरदला येण्यासाठीचं अंतर हे दोन तासांचं;साम्रद हे दिडशे घरांचे गाव. इथे पोहोचताच आपल्यला रतनगड, लांबवर सह्याद्रीतील अतिशय कठीण अशी कळसूबाईची डोंगररांग, त्यातून थेट लक्ष वेधून घेणारे अलंग, मदन, कुलंग,आजोबागडसारखे उंचच किल्ले व चोहीकडे जंगल. अश्यातच आपण पायवाट काढुन सांधणच्या दिशेने प्रस्थान व ४-५ मिनिटे गेल्यावर काहिसं खाली उतरलो की सुरु होतो सांधणव्हॅली क्रॉस करण्याचा प्रवास. वाट तशी रुंदच म्हणून पावले जपून टाकावी लागतात, कारण काही मोठमोठे दगडधोंडे, शिळा पडलेल्या दिसतात. बर्‍यापैकी आत चालल्यावर व नजर उंचावून पाहिली की लक्षात येते, आपण थेट डोंगराच्या मधोमध खोदलेल्या भेगेत आहोत. ही भेग जवळपास ४५०-५०० फूट खोल आणि २५ फूट रुंद. केवआहातरी १० फूट देखील, आणि एक किलोमीटर लांब! हाच आहे सांधण व्हॅलीचा निसर्गनिर्मित राकट आविष्कार. ‘सांधण व्हॅली ‘ला ” द व्हॅली ऑफ शॅडो” म्हणून देखील संबोधतात. अधून-मधुन अरुंद ठिकाणी डोकावणारी उन्हाची तिरीप अंगावर झेलत, दगडधोंडे पार करत आपण छोट्या आणि रुंद अश्या ओढ्यापाशी येऊन थबकत, तो पार करताना अगदी छाती पर्यंत पाणी असल्यमुळे बॅगा डोक्यावर घेणयावाचून गत्यंतर नाही;ग्रुपनी असलो की सामान कुठेतरी खडगावर ठेवायचं आणि मनमुराद पोहण्याचा देखील आनंद घ्यायचा. तो पार केल्यावर मग पुन्हा एकदा खडगावरुन चालण्याचा थ्रील सुरू होतो. मधून मधून असे ओढे आणि लहानसे धबधबे आपल्यासाठी नित्याचेच होउन जातात आणि याचं पाणी देखील मधूर आणि शध्द.म्हणजे पाण्याच्या बाटल्या संपल्या आणि तहान लागली की या पाण्याची साथी आहेच ती अगदी दरी पार करे पर्यंत. त्यानंतरचा मार्ग हा लाहान-मोठे खडग पार करून किंवा साठलेल्या पाण्यातून वाट काढत जाण्याचा असा आहे.दरी जशी रुंद होत जाते तसा तीचा उतारदेखील वाढतच जातो. म्हणजे मग डोंगरकडय़ाजवळ आलो असे समजावे.
त्यानंतर आपण एका महत्वाच्या पॅचवर येउन पोहोचतो जिथे रॅपलिंगचा थरार आणि ‘फुल्ल टू अॅडव्हेंचर’ ची कमाल आहे. ६०फुटाहुन थेट खाली येणं केवळ एका दोरखंडाच्या सहाय्याने आणि निर्धास्तपणे हा निश्चितच एक ‘रॅपफुल’ अनुभव आहे. हा पॅच पार केल्यावर व थोडं चालल्यावर ४० फुटाचा दुसर्‍या पॅचसाठी आपण सज्ज होतो. मग अनुक्रमे १२ आणि १५ फुटाचे असे दोन पॅचेस पार करावे लागतात. मग मधुनच येणारा मोठा ओढा पार करुन झाला की नंतरची पायवाट साधी-सरळ पण ओभड-धोबड व छोट्याश्या उतार्‍यानी युक्त असून ती पार करत आपण फोटोग्राफीचा पण आनंद लुटू शकतो.
दरीतील वाट विविध गावांकडे वळते, पैकी एक वाट जाते डेहणे गावाच्या दिशेने. दगडमाती तुडवत, खडगामधून, जंगलासारख्या ठिकाणहून वाट काढत अनेक शेतं आपल्या नजरेस पडतात. अन् वस्ती देखील नजरेस पडते. काही अंतर पायपीट केल्यावर व डावीकडच्या दिशेने वळल्यावर आपण डेहणेगावात येऊन पोहतो व महादरी पार केल्याचा आनंद चेहर्‍यावर ओसंडून वाहिल्यावाचुन रहात नाही.
सांधणव्हॅली चा ट्रेक करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी हमखास घ्यावी ती म्हणजे, अनुभवी ग्रुपसोबतच इथे जावे.गरज असल्यास एखाद्या गावकर्‍याला सोबत घ्यावे. खडगं, पाणी व जंगलातून वाट काढावी लागत असल्यामुळे, अनेकदा सरपटणार्‍या प्राण्यांशी गाठभेट होते, मग पायाच्या संरक्षासाठी म्हणून चांगले बुट घालणे व कपड्याची एखादी जोडी सोबत असणे अत्यावश्यकच आहे. धाडस म्हणून चुकून देखील एकट्याने जाणे टाळावे. तसंच दरी पार करताना रात्र झाल्यास रहाण्याची सोय तिथेच होऊ शकते, म्हणून त्यासाठी तंबूंची व्यवस्था आपल्यासोबत असलेली बरी. जेवण्याची सोय देखील असू द्यावी. पाण्याचा प्रवाह असल्यामुळे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची योग्य ती खबरदारी घ्यावी. गावकर्‍यांना आगाऊ सूचना दिल्यास खाण्याची व्यवस्था होते. पण तयार जेवण सोबत देखील न्यायलाच हवं.
जर तुम्ही ट्रेक प्लॅन करत असाल आणि अॅडव्हेंचरची एंजॉयमेंट घेऊ इच्छीत असाल, तर सांधण व्हॅली
त ट्रेकफुल अनुभव मिळेल एवढं मात्र नक्की.

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..