नवीन लेखन...

सुप्रसिद्ध अभिनेते सतीश दुभाषी

सतीश दुभाषी यांचा जन्म १४ डिसेम्बर १९३९ रोजी कारवार यथे झाला. दुभाषी हे मुळचे कारवारचे. सतीश दुभाषीचे आजोबा मंगेश दुभाषी हे थोर गृहस्थ होते, ते विद्वान असल्यामुळे त्यांना ‘ ऋग्वेदी ‘ ही पदवी प्राप्त झालेली होती. त्यांनी बरीच नाटके लिहिली परंतु एकही रंगभूमीवर आले नाही. सतीश हा त्याच्या मुलाचा मुलगा आणि त्याच्या मुलीचा मुलगा म्हणजे पु. ल. देशपांडे . सतीश दुभाषीचे वडील एका खाजगी कंपनीत कामाला होते. त्याचे शिक्षण पार्ले येथील टिळक विद्यालयात झाले.
शाळेत त्यांना नाटकात काम करावेसे वाटे परंतु पहिल्यादा तोंडाला रंग लावला तो ‘ अंमलदार ‘ नाटकातील वेटरचे काम केले तेव्हा . ते नाटक त्यांच्या शाळेच्या संमेलनात झाले. पुढे त्यांनी अरुण सरनाईक यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकात काम केले. मामा पेंडसे आणि राजा पटवर्धन यांनी त्याच्या अंगातील अभिनयाचे गुण ओळखले. विशेषतः मामा पेंडसे यांनी त्यांना सांगितले तू या प्रांतात प्रवेश कर. पुढे शिक्षण झाल्यावर ते नाटकात कामे करू लागले पुढे ते ‘ ओरिएंट हायस्कूल ‘ मध्ये शिक्षकाचे काम करू लागले आणि अर्थवेळ एका खाजगी कलासमध्ये ‘ गणित ‘ शिकवू लागले . ते गणित उत्तम शिकवत हे मला त्याचे डोंबिवलीमधील रहाणारे त्यावेळचे विद्यार्थी श्री. गजानन गोखले यांनी सांगितले. . ते म्हणाले त्याची खडू पकडण्याची खास वेगळी स्टाईल होती. अगदी सिगारेट पकडण्याची असते तशी ते पकडत . गोखले म्हणाले त्यावेळी ते आम्हाला वेगळेच आणि बिंधास वाटे. ते इतके उत्तम शिकवत की आम्ही कधीही त्याचा क्लास चुकवला नाही. ते नाटकात काम करत असत हे आम्हाला उशीर कळले.
विश्राम बेडेकरांच्या ‘ वाजे पाऊल आपले ‘ मध्ये त्यात त्यांनी डॉक्टर ऐनापुरे यांची भूमिका त्यांनी केली . ते त्यांचे पहिले व्यावसायीक नाटक. त्या वेळी त्यांना ४० रुपये नाईट मिळाली. तेव्हा त्याच्या मनात असा विचार आला पंधरावीस मिनिटे स्टेजवर उभे राहण्यासाठी ४० रुपये , हे काही अफलातून आहे असे सतीश दुभाषीना वाटले.
पुढे त्याची अनेक नाटके आली. त्यात शांतता कोर्ट चालू आहे धुम्मस , बेईमान , अबोल झाली सतार , चक्रव्यूव्ह , ती फुलराणी , माणसाला डंख मातीचा . अबोल झाली सतार या नाटकाने त्यांना खऱ्या अर्थाने व्यावसायिक रंगभूमीवर ‘ पुश ‘ केले. ती फुलराणी तर आजही अनेकांच्या स्मरणात आहे . त्यात त्याच्याबरोबर भक्ती बर्वे आणि शशिकांत राजाध्यक्ष काम करत असत. त्यांचे दुसरे नाटक म्हणजे ‘ माणसाला डंख मातीचा ‘ त्यात सतीश दुभाषी , भक्ती बर्वे , सुनीला प्रधान यांनी काम केले होते. त्यात एक वेगळाच विषय मांडला होता. जर प्रेक्षक कमी असतील तर संतीष दुभाषी जरा एक्सप्रीमेन्ट करत , काही आणखी वेगळे करता येते ते का बघत. कन्या ही सासुरासी जाये या नाटकात त्यांनी राजेश या नावाची खलनायकी भूमिका केले आहे. त्यात अक्षरशः प्रेक्षक संतापात असत इतके जबरदस्त काम त्यांनी केले आहे. सूर राहू दे हे त्याचेच आणखी लोकप्रिय नाटक. शिरिष पै यांच्या ‘ हा खेळ सावल्यांचा ‘ त्यात त्यांनी डॉक्टर मार्लिनची भूमिका सतीश दुभाषी यांनी केली आहे. तर दारुड्याची भूमिका अरुण सरनाईक यांनी केली आहे. दुभाषी यांची गंभीर भूमिका यात आहे. त्याची धुम्मस मधली भूमिका खरी आव्हानात्मक होती. त्याचप्रमाणे ती फुलराणीचा प्रयोग अफाट रंगे.
त्यांनी तीन चित्रपटात कामे केली होती . चांदोबा चांदोबा भागलास का , बाळा गाऊ कशी अंगाई आणि सिहासन . सिहांसन मधील डिकास्टा दुभाषी यांनी असा काय केला की तो आजही विसरला जाऊ नाही. अरुण सरनाईक विरुद्ध सतीश दुभाषी आणि डॉक्टर श्रीराम लागू विरुद्ध सतीश दुभाषी . याची जी शब्दाची आणि अभिनयाची जी जुगलबंदी आहे त्याला आजही तोड नाही. दुर्देवाने चित्रपटसृष्टीचे त्याच्याकडे उशीरा लक्ष गेले. विशेषतः ती फुलराणीचे अमाप यश सतीश दुभाषीच्या डोक्यात गेले आणि ते आपल्याच कैंफात राहू लागले.
आपल्या अतिरेकी वागण्याने त्याच्यामधील आणि मृत्यूमधील अंतर झपाट्याने कमी झाले आणि ह्या कसलेल्या बुद्धीमान नटाचा मृत्यू ध्यानीमनी नसताना १२ सप्टेंबर १९८० रोजी झाला.
— सतीश चाफेकर.
Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..