नवीन लेखन...

राष्ट्रवाणी

वाजपेयींची मृदूवाणी
अडवाणींची अडवाणी
संघाची एक वाणी
भाजपची केविलवाणी

सोनियांची सोन वाणी
राष्ट्रीयांची टंगळ मंगळ वाणी
लालूची बडबड वाणी
मायावती ची माया वाणी
मुल्ला मुलायमची मुलायम वाणी
ललिताची धमकावणी
प्रमुखांची गुरकावणी
ममताची रुसु बाई वाणी
पडद्याआडची चंद्रावाणी
वीरप्पन ची मिशाळवाणी
दाऊदची आतंकवाणी
मुशर्रफ मग्रूरवाणी
बुशची धमकावणी
सद्दाम ची उद्दाम वाणी

सारी बोल घेवड्यांची वाणी
सारी वाचीवीरांची वाणी
काही नाही तिच्यात पाणी

वाणी वाणी एकच वाणी
स्वातंत्र्यवीरांची
हुतात्म्यांची
देशभक्तांची राष्ट्रवाणी

— विनायक अत्रे.

दिनांक: १३/०१/२००३.


(ममता- ममता बॅनर्जी, ललिता- जयललिता तामिळनाडू मुख्यमंत्री, चंद्रा- चंद्राबाबू- आंध्र मुख्यमंत्री, प्रमुख- शिवसेनाप्रमुख, मुलायम- मुलायमसिंग यादव, मायावती- मध्यप्रदेश मुख्यमंत्री,  दाऊद- दाऊद इब्राहिम स्मगलर, मुशर्रफ- पाकिस्तान अध्यक्ष)

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..