नवीन लेखन...

प्रोजेक्ट – ‘मय्यत’ !

दुसरे दिवशी सकाळीशेपेवाडीला  डिगा पाटलाकडे गेलेला वामन्या दुपारी खाली मानेने परतला.
“काय झालं?देले का पैसे?”मोहन्याने विचारले.
वामन्याने नकारार्थी मुंडी हलवली.
“का? काय मनला ? आडर देताना लाज नाय वाटली अन बिलाला का नाय म्हणतुया ,भाड्या?”
“त्यो म्हंतु ‘कवटी फुटल्याचा बाद बिलाचा हिसाब !’ असा वायदा होता!.”
“मंजी? यदा मरुस्तोर पैसे देणार नाय का काय? एक थूतरित हाणायची का नाय !” मोहन्या चिडून बोलत होता.
“काय थूतरित हणणार? पैलेच तेचा गाल आवळा धरल्यागत सुजलाय! समद्या थोबाडावर धोदरा आलाय त्यो वायलाच!”
“मंजी,अक्षी दत्यागत!”
“व्हय ! पण असं कशानं व्हतं आसन ?”
“पाटील अंगठीचा खडा तळहाता कड वळवून मुस्काटात मारीत आसन !” मोहन्या कडे सगळ्याच  प्रश्नाची उत्तरे होती!

समोरून सदा येत होता. डाव्या गालावर उपरणे धरले होते.
“कार सदा ,हि कोणची पूजा म्हणायची सकाळची का सांचाची ?”वामन्याने विचारले.
“सकाळचीच हाय!जरा अंग चढून आलंय . मनून उठाया उशीर झाल्ता. ”
“अन गालाला काय झाली?”
“काय नाय सुजलाय !”
मोहन्याने बारीक निरीक्षण केले. गालात आवळा धरल्या सारखी सूज होती.
“तू कह्याला गेलतास यदा पाटलाकडे ?”मोहन्याने नेमका प्रश्न विचारला.
“तुमच्याकून म्हायती घेतली. सांच्या पाटलाकडं ‘गरुड पुराण’ लावता का विचारायला गेल्तो! निस्त्या मारुती पूजा अभिषेकात भागात नाही! चार पैशाची अपेक्षा होती!गाला वर चार बोट घेऊन आलो!”
गालावर हात ठेवून सावकाश दूर जाणाऱ्या सदाला पाहताना मोहन्या वामन्याच्या डोळ्यांच्या कडा का आणि केव्हा ओल्या झाल्या त्यांनाहि कळले नाही.

— सु र कुलकर्णी

आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.
(हि माझी कथा -विदूषक १९९९च्या दिवाळी अंकात सु र आळंदकर या नावाने ‘भोवनीच मयत ‘ या शीर्षका खाली लिहली होती.)

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..