नवीन लेखन...

प्रमाण परीक्षा

 

मला अजूनही आठवतंय, माझ्या आठवणीनुसार त्याकाळी अकरावी ssc ची परीक्षा होती आणि 12 वी इंटरची परीक्षा. त्यावेळच्या 12 वी च्या इंटर च्या परीक्षेच इतक वजन होत की आताच्या double graduate ला सुद्धा इतक महत्व नाही. पुढचे  शिक्षण घेण्यासाठी इंटर ची परीक्षा हीच एकमेव प्रमाण परीक्षा होती . इंटर ची परीक्षा पास झाला म्हणजे तो विद्यार्थी पुढचे शिक्षण घेण्यास पूर्णपणे सक्षम झाला असे समजण्यात येई . काय तो इंटर च्या परीक्षेचा दरारा. 75 % मार्क म्हणजे डिस्टीनशन आणि हेच  सर्वात जास्त मार्क्स 75 % मार्क मिळवणारा मुलगा खूप हुशार समजला जायचा.

आणि आज पहिलं तर प्रत्येक पायरीवर वेगवेगळी प्रमाण परीक्षा !

आमच्या ssc , बारावी , पदवीधर या परीक्षांना काही महत्वच उरलेल नाही .अगदी कचरा परीक्षा झाल्या आहेत.  , मार्क मात्र पहा 98%, 97% इतक असूनही पुढच्या शिक्षणासाठी वेगळी प्रमाण परीक्षा द्यायलच हवी , बरं पुढच्या प्रमाण परीक्षा सुध्दा  याच अभ्यास क्रमावर घेतल्या जातात मग  हे मार्क फक्त social मीडिया वरती दाखवण्यासाठी असतात का असा प्रश्न पडतो ! , त्या मारकांची किंमत शून्य ठरते  !

ssc आणि बारावीच्या परीक्षांची लायकीच नसेल तर घेतात कशाला ? सरकारी धंदा तेजीत आणि मुलं बसतात मार्क मोजीत असा सगळा महाराष्ट्रातल्या शिक्षणाचा बॅन्ड बाजा वाजलेला आहे. आमच्या राज्यकर्त्यांना सुद्धा याची लाज  वाटत नाही .

याची कारणं  पुढील लेखात ,

प्रतिक्रिया अपेक्षित .

— गणेश वेलणकर

 

Avatar
About गणेश वेलणकर 2 Articles
साधारण 20/ 25 वर्षा पूर्वी मासिकातून , नियतकालिकातून , साहित्य लेखन सध्या facebook ,twitter , whatsapp वरुन वैचारिक लेखमाला वैचारिक चर्चा - अत्यंत आवडता विषय तसेच संगीत साधना , नवीन गाण्यांची निर्मिती food प्रोसेसिंग चे अनेक courses केले .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..