नवीन लेखन...

परीकथेतील सुंदर गाव

Standardization is the process of developing and implementing technical standards. ग्रामीण भागाचे सर्व प्रथम standardization झाले पाहिजे होते. लाखो कोटी रुपये खर्च करूनही आम्ही जगाला आमचे एकही खेडे दाखवण्या योग्य करू शकत नाही हे सत्य नाकारू शकत नाही. घरांची रचना, त्यांच्या समोरील आंगणे, (खरेतर घरासमोरील बाग म्हणायचे होते ) त्यांची पाणी पुरवठा योजना, त्यांची मलनिस्सारण योजना या बाबत ग्रामीण भागातील एखादा सरपंच सुद्धा अनभिज्ञ आहे हि आजची परिस्थिती आहे.

मी अमेरिकेतील रूट (राउट) ६६ या त्यांच्या देशातील पहिल्या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करून तिथली खेडी पाहीली आहेत. आपल्या देशात शहरांमध्ये जागांचा तुटवडा आपण समजू शकतो पण ग्रामीण भागातील जमीनी वर्षानुवर्षे पडीक पडलेल्या असतात. घरा बाजूची मोकळी जागा अनेक ठिकाणी उकिरडा असे म्हणता येईल अशी असते.युरोप मधील अनेक खेडी जणू काही परीकथेतील जगा सारखी सुंदर दिसतात.घरांच्या रचना , रंगसंगती , सभोवताली असलेल्या बागा ,ग्रामीण भागातील रस्ते , शाळा ,चर्चेस , लहान लहान दुकाने,पाहीली की मन थक्क होते. आपल्याकडे असे गाव का दिसत नाही याचे आश्चर्य वाटत राहते.कुणी असा प्रयत्न का करीत नाही हा विचार मनात येऊन दुखः होते. नाही म्हणता अण्णा हजारे यांचे गाव याला थोडासा अपवाद समजला जाईल. पण सौंदर्य आणि स्वच्छता या बाबतीत आपण खूप मागासलेले आहोत हे सत्य नाकारता येणारच नाही.

” नगर रचना ” हा प्रकारच मुळी आमच्या ग्रामीण भागात कुणालाही माहीत नाही हि परिस्थिती आहे. कुणीही कशीही घरे बांधतो ,घर समोरचा परिसर स्वच्छता न करता ठेवतो , हे पाहिल्यावर आमची मानसिकताच मुळापासून बदलणे गरजेची आहे याची प्रकर्षाने जाणीव होते.

आमचे धुरंधर राजकारणी युरोप , अमेरिकेत फिरायला जातात आणि काय बघतात हेच समजत नाही. ‘ती’ मंडळी जर करू शकतात तर आपण का करू शकत नाही हे मला पडलेले एक कोडे आहे. ग्रामीण भागात युरोपातील किवा अमेरिकेतील खेड्या प्रमाणे निदान एकतरी ‘ मॉडेल गाव ‘ तयार होणे गरजेचे आहे. आपल्याकडे पाणी मुबलक आहे पण नियोजन नाही , आपल्याकडे मनुष्य बळ प्रचंड आहे पण काम करण्याची मानसिकता नाही .पैसा आहे पण वापरता येत नाही. हे एकट्या दुकट्याचे काम नाही .

मोदी सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी खूप चांगला प्रकल्प खासदारांना दिला आहे. सचिन तेंडुलकरांनी एक गाव दत्तक घेतले आहे.ते गाव त्यांनी खूप चांगले सजवले आहे.पण या बाबतीत फार प्रचंड वेगाने काम करण्याची गरज आहे.मग लोकसभा आणि राज्य सभेतील इतर खासदारांचे काय ? दरवर्षी किमान ७५० खेडी आम्ही का बदलू शकत नाही ? खेड्यांची सुधारणा , खेड्यांना जोडणारे रस्ते ,दळण वळणाची आधुनिक साधने हि जर प्रत्तेक खेड्यात असतील तर हा देश युरोप अमेरिकेला तोडीस तोड होण्यास काहीही हरकत नाही.

पण मागास वर्गीयांच्या साठी निर्माण केलेल्या आण्णा भाऊ साठे महामंडळातील खाल्लेल्या कोट्यावधी रुपयांच्या सुरस कथा ऐकल्यावर खूप संताप येतो. लाखो रुपयांची माया जमवण्याच्या मानसिकतेतून हा देश कधी बाहेर येणार ? तरुण पिढी समोर काय आदर्श आहे यांचा ?

यासाठी तातडीने गावांचे Standardization करण्याची नितांत गरज आहे.आमचा तरुणांना शिर्डीच्या पायी वा-या करण्यासाठी प्रोत्साहन देणारे राजकारणी नकोत. तर याच तरुणांचे बळ आणि बुद्धी देशासाठी कशी लागेल याचा विचार करणारे नेते या देशाला हवे आहेत .पायी चालत जाणारे हजारो तरुण मी जेव्हा पाहतो तेव्हा खुद्द शिर्डीच्याच साई बाबांना मला साकडे घालावेसे वाटते ….. बाबा आता तुम्हीच हे सर्व थांबवा !!!! तरुणांना देशकार्या साठी कामाला लावा !!!! स्वार्थी नेते तरुणांना आमिष दाखवून वापरून घेत आहेत .

— चिंतामणी कारखानीस

 

चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस 75 Articles
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..