(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व दिवाळी २०२२ ह्या विशेषांकात प्रकाशित झालेला वैद्य अरुणा टिळक यांनी लिहिलेला लेख)
पंचामृत स्नानं समर्पयामि ’गणपतीची पूजा असो सत्यनारायणाची पूजा असो की त्या षोडषोपचार पूजेत पंचामृताचा वापर असतोच असतो. देवाला नैवेद्य म्हणून आपण पाच फळे ठेवतो. व पूजेनंतर आपण ते प्रसाद म्हणून ग्रहण करतो. पण या सगळ्याच्या मागे आपल्या शास्त्राचा इतका सखोल विचार व अभ्यास दडला आहे हे आपण समजून घेणे गरजेचे आहे.
आपल्या शरीराच्या सुयोग्य वाढीसाठी अन्नाची गरज आसते. ते जेवण ताजे, योग्यवेळी खाल्ले तर शरीर वृद्धीसाठी उपयोगी ठरते. दररोजच्या आहारात आपण पाच प्रकारची फळे खाणे गरजेचे असते. देवाची पूजा सकाळी करतो. मग त्या फळांचे सेवन पण सकाळीच करणे अपेक्षित असते. रस्त्यावर फळे कापून विकतात त्यात पाच प्रकार असतातच. आपल्या प्रकृतीनुसार त्यांचे सेवन करणे हितावह असते.
त्याचप्रमाणे पंचामृत हे सुद्धा अबालवृद्धांना सेवन करणे हितकारक ठरते. कसे ते आता बघूया. बरेचदा आपला आहार हा आपल्या धर्मानुसार ठरतो. ऋतुनुसार बदलतो. देश कालसापेक्ष बदलतो. आपल्या आहाराची पद्धत शास्त्रासंमत असते शरीरात घेतला जाणारा आहार व्यक्तीचे आरोग्य घडवतो. उत्तम आरोग्य सौंदर्य वाढवते. त्याला आयुष्यमान करतो.
धर्मामध्ये पंचामृताला अमृताची उपमा दिलेली आहे. पृथ्वीवरील पाच अमृतासमान अन्नपदार्थ म्हणजेच पंचामृत. देवीदेवताच्या स्नानप्रसंगी याचा वापर होतो. दक्षिणेकडील मंदिरामध्ये आजही देवांना स्नानाच्यावेळी तांबे हंडे भरून स्नान घालतात. तर आषाढीला विठुरायाला ततततततसुद्धा पंचामृत स्नान हे कळश्या भरभरून घालताना आपण बघतो.
पंचामृत
पंचामृत म्हणजे पाच पदार्थांचे एकत्रीकरण दूध, दही, तूप, साखर, मध. यातील प्रत्येक अन्नघटकांचे विशेष महत्त्व आहे.
दूध
कामधेनोः समुदभूतं देवर्षि पितृ तृप्ति दम् ।
असे हे अमृतापेक्षा श्रेष्ठ म्हणजे दूध असेच वर्णन दूधाचे केले जाते. या एकाच दूधापासून अनेक पदार्थ तयार होतात, दही, ताक, तूप असे एकापेक्षा एक सरस व सात्त्विक पदार्थ आपल्याला दुधापासून मिळतात. दुधाएवढे महत्त्व कोणत्याच पदार्थाचे नाही. प्रथम जन्मसाक्य असे मातेचे दूध नंतर गाईचे, म्हैस, बकरी, उंटिण अशा प्राण्यांपासून मिळते. सध्या बाजारात मिळणारे दूध प्रक्रिया केलेले आसते. ताजे दूध मंद आचेवर तापवावे. दूध हे वीर्यवर्धक, त्रिदोषनाशक क्षयनाशक, मैथुनशक्तीवर्धक आयुः वर्धक, बलकारक, जठराग्नि प्रदिप्त करणारे आहे. तसेच ते अतिसार पित्त, ज्वर, त्वचारोग, अग्निमांद्यात फायदेशीर आहे. त्यात असणाऱ्या कॅल्शियम, प्रोटिन्स, व्हिटॅमिन बी… इ. गुणांमुळे कुटुंबातील सर्व जणांनी दररोज दूध घेणे आवश्यक ठरते.
दूध हे उत्तम रसायन द्रव्य सांगितले आहे.
यज्जरोव्याधि विध्वांसि भेषजम् तद् रसायनम् ॥ रसायन शब्दाच्या अनेक व्याख्या आहेत. म्हातारपणाचा नाश (जरा) तारुण्यरक्षण व रोगहरण करणारे औषध म्हणजे रसायन.
दही
तापसून घड केलेल्या दुधाला विरजण लावले की, त्यापासून दही मिळते. दह्याला विरजण लावल्यावर दह्याची बरणी त्या जागेवरून हलवू नये. 4 से 5 तासांनी त्यावर थोडेसे पाणी आलेले दिसले की योग्य दही लागले असे समजावे. मंद खादू, स्वादाम्ल अम्ल, अम्ल असे दह्याचे पाच प्रकार आयुर्वेदात सांगितले आहेत.
चरकाचाऱ्यानुसार दही स्वादिष्टदीपक, स्निग्ध, आंबट, उष्ण व पौष्टिक आहे. आजारपणात विशेषतः वायुनाशक, अतिसार, विषमज्वर, अरुचि मूत्रकृच्छावर, दही उत्तम आहे.
पण पित्तप्रकृतीच्या व्यक्तींनी दही जास्त खाल्ल्यास हातापायाची आग डोळ्याची जळजळ, चक्कर येणार, आंबट ढेकर येणे यासारखे त्रास होऊ शकतात. वातप्रकृतीच्या माणसांना दह्याने फारसा त्रास होत नाही. पण कफप्रकृतीच्या माणसांना दह्याने फारसा त्रास होत नाही पण कफप्रकृतीच्या माणसांनी ज्यांना दम्यासारखे आजार आहेत. सयनसचा त्रास आहे. अशांनी दही टाळावे.
मधमुरे दही खाण्याने, मंद दही खाण्याने शरीराला अपायकारकच ठरते. तर आंबट दही रक्त दूषित करते. सोरिअॅसिस. इसब, नायटा इ. विकार उत्पन्न करते. अॅसिडिटी केस लवकर गळणे, पिकणे. संधिवात, रक्तस्त्राव होणे. इ. विकार करते.
दही खाण्यासंबंधी नियम
1) दही दररोज खाऊ नये.
2) दही गरम करून खाऊ नये.
3) दही रात्री खाऊ नये.
4) न तापविलेल्या दूधाचे दही खाऊ नये.
गैरसमज
1) दही थंड आहे. असे नसून यही उष्ण आहे. 2) गोड दही सर्वात चांगले वैद्यकियदृष्टया किंचित आंबट चांगले हेमल, शिशिर वर्षात दही दिवसा खाण्यास हरकत नाही.
तूप –
लोण्याला कडवून त्यापासून तूपाची निर्मिती होते. सर्व प्रकारच्या दुधापासून तूप बनते पण गाईच्या दुधापासून बनलेले दूध सर्वश्रेष्ठ असते. सर्व प्रकारच्या धार्मिक कृत्यात आहारीय म्हणजे याचा वापर होतो. शर्वसाधारणपणे खाण्यासाठी ताजे कढवलेले तर औषधासाठी जुने तूप औषधी असते. अकराशे वर्ष जुन्या तुपाला महाघृत असे म्हणतात. जुन्या तुपामध्ये जखमा भरण्याचा असा दिव्य शिवाजी महाराजांच्या काळात गडावर तुपाचे रांजण भरलेले असत. गुण असतो. कितीही मोठ्या जखमा या पुराणघृताने भरून येत असत.
तूप हे श्रेष्ठ बलशाली अन्नपदार्थ आहे. तूप अत्यंत गुणकारी जल, बुद्धी, स्मृती, मेधा, ज्ञानशक्ती वाढवणारा स्निग्ध पदार्थ आहे. ’तूप खाईल त्याला रूप येईल.’ या म्हणीप्रमाणे योग्य प्रमाणात तुपाचे सेवन फायदेशीर ठरते. त्रिदोषनाशक तुपात खूप जीवनसत्त्वे असतात. ए, डी, इ. व सी जीवनसत्त्वे मिळतात.
गरम गरम वरणभात, लिंबाची फोड वव तुपाची धार यासारखा उत्तम आहार नाही. छोट्या मुलांपासून वृद्धापर्यंत सात्म्य…….
साजुक तूप खाताना (माझे केलोस्टेरॉल वाढेल हा किंतसुद्धा मनात आणू नये.) आनंदाने खावे. आयुर्वेदामध्ये अनेक औषधी तूपे बनविली जातात व त्याचा विविध व्याधींमध्ये उपयोग होतो.
साखर –
उसाच्या रसापासून तयार होणारा स्फटिकसदृश कणांना साखर म्हणतात.त उसाच्या रसापासून गूळ व साखर तयार करतात. पूर्वी गूळ स्वस्त होता तर साखर महाग होती. त्यामुळे साखरेला महत्त्व आले. खरे पहाता पोषक घटकांनुसार गूळ साखरेपेक्षा चौप्पट पौष्टिक आहे. साखर मधुर, वीर्यवर्धक, नेत्रहितकारक, पौष्टिक थंड व पित्तनाशक आहे.
रक्तामध्ये जाऊन त्वरित मिसळण्याच्या गुणधर्मामुळे साखर मधुमेहासारख्या आजारात वर्ज्य ठरते पण मधुमेहात कूिेश्रिूलशाळर मध्ये रक्तातील साखर जेव्हा कमी होते तेव्हा मात्र हीच साखर त्या पेशंटचा प्राण वाचवते. जुलाबात / अतिसारात, जलसंजीवनीमधील साखर, पेशंटला खरोखरच संजीवनी देते.
मध
गूळ व साखर हे मानवनिर्मित गोड पदार्थ आहेत. मध हा एकमेव निसर्गनिर्मित गोड पदार्थ आहे. चिकट पारदर्शक अत्यंत मधुर आणि वजनदार मध उत्कृष्ट असतो. चिकट व पारदर्शक माधच खरा असतो. शीतल, लघु (हलका मधुर लाद वाडी दूर करतो. मधाचा सर्वोत्तम फायदा म्हणजे स्वरयंत्रण सुधारतो, मधामध्ये पण जखमा भरण्याचा गुण आहे. रोजचा वापर आहात केल्याने त्वचेचा रंग उजळतो. यात रक्तशुद्धी हा महत्त्वाचा गुण असतो.
आयुर्वेदशास्त्रानुसार मध हा योगवाही असतो म्हणजे ज्या पदार्थाबरोबर याचा संयोग केला जातो त्याचे गुणधर्म वाढतात.
आयुर्वेदात अनेक औषध ही मधाच्या अनुपानानाबरोबर म्हणजे मधाबरोबर दिली जातात. आपण टिव्हीवरील अनेक कुकरीशमध्ये बघतो की पदार्थ बनवताना त्यात मध घालून गरम करतात हे चुकीचे आहे. मध कधीही गरम करू नये किंवा अगदी गरम पाण्याबरोबर पण घेऊ नये.
तूप व मध समान मात्रेत विषसमान असतो.
पंचामृत सेवन
या पाच पदार्थाचे एकत्रीकरण म्हणजे पंचात यामध्ये प्रामुख्याने गाईच्या दूध, तूप व दह्याचा वापर केला जातो. पंचामृत व पंचगव्य है। आपली अतः व बाह्यशुदाधी करतात. सर्व गोष्टी 1/1 चमचा फक्त तूप व मधाचे असमान प्रमाण असते.
या ठिकाणी ज्या व्यक्तींचा अग्नि मंद असतो, जे खूप आजार असतात, ज्यांना मधुमेह असतो अशांनी पंचामृताचे सेवन करू नये. तसेच आयुर्वेदानुसार प्रत्येक व्यक्तिची प्रकृती ही भित्र-भित्र असते. त्यामुळे वात पित्त कफानुसार त्यातील घटकद्रव्ये ही वापरावी । वातप्रकृतीच्या व्यक्तीमध्ये रूक्षत्व जास्ती असते. अशावेळी त्यांनी तूप- 1 चमचा तर मध अर्धा चमचा वापरावा पित्तप्रक-कृतीच्या व्यक्तींनी दह्याचे प्रमाण कमी घ्यावे तर दूधाचे प्रमाण अधिक घ्यावे. तर कफप्रकृतीच्या लोकांनी दही, तूप, कमी तर मधाचे प्रमाण थोडे अधिक घ्यावे.
या सर्व गोष्टी व्यक्तिसापेक्ष असल्याने आपल्या वैद्यांकडे जाऊन व्यवस्थित विचारून घ्याव्यात.
हल्ली आढळणारा विकार म्हणजे तळीं ऊशषळलळशपलू आणि तो तर तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वामध्येच दिसतो. हातळींच्या कमतरतेमुळे सांधे दुखणे, टाचा दुखणे, कंबर दुखणे इ. लक्षणे होतात रक्ताच्या । तपासणीनंतर हे कळून येते. अशावेळी मी खूप रुग्णांवर पंचामृताचा । प्रयोग केला आहे. मात्र हे पंचामृत सकाळच्या वेळी घेणे नंतर दहा मिनिटे काही न खाणे. त्याने खूप फायदा होतो.
पंचामृताचा उपयोग गर्भिणी अवस्थेत पूर्णपणे नऊ महिने करणे फायद्याचे ठरते. त्यामुळे होणारे बाळ हे तेजस्वी त्वचेचे चांगल्या रूपाचे निपजले. तसेच छोट्या मुलांनासुद्धा दररोज छोट्या वाटीभर पंचामृत देणे त्यांच्या उत्तम वाढीसाठी फायदेकारक ठरते. त्यामुळे पंचामृत सेवन सर्वच वयात करणे उत्तम!
पंचामृत स्थान हे जसे देवाना घालतात. तसेच ते प्रत्येक व्यक्तीला पायदेमंद ठरते. सौंदर्याची जोपासना ही फक्त तरुणपणीच करायची असते असे आपण समजतो. पण परदेशात 70 वर्षाची आजीबाई सुद्धा नेमाने पार्लरची पायरी चढते. स्वतःला तरुण समजते व तारुण्य जोपासते पण आपण भारतीयांनी आधीपासूनच काळजी घेतली तर आपण वार्धक्याला नक्कीच लांब ठेऊ शकतो.
निसर्गाने प्रत्येकाला जे रूप दिले आहे ते जोपासणे आपल्या हातात आहे. सौंदर्यवर्धनासाठी त्वचा व केसांची विशेष काळजी घेणे आवश्यक ठरते. त्वचा म्हणजे फक्त चेहरा नव्हे तर संपूर्ण शरीराची त्वचा. आपण पंचामृताचा सौंदर्यात कसा उपयोग होतो ते
दूध
दूधात फॅट्स असतात. खनिज द्रव्ये असतात. प्रदूषणामुळे त्वचा रूक्ष होते कोरडी होते. कालांतराने काळवंडते. अशा या निस्तेज त्वचेला सश्रेु येण्यासाठी 1) दूध लिंबूरस समप्रमाणात घेऊन त्याने त्वचा घासावी. मोनालीसा दूधाने आंघोळ करत असे पण आपण आंघोळीच्या पाण्यात (1 बादलीत पाव लिटर दूध) घालावे. आठवड्यातून किमान एकदा दूध चंदन उन्हाळ्यात दररोज लावावे.
दही
त्वचेवर असंख्य बारीक बारीक छिद्रे असतात. त्यातून शरीरातील ढेुळपी बाहेर काढली जातात. अशावेळेस ही छिद्रे व्यवस्थित अवस्थेत असणे आवश्यक असते. योग्यवेळी ती पूर्ण उघडी करून त्यातील मल बाहेर काढून ती पुन्हा बंद होणे आवश्यक असते. त्वचेच्या Cleaning Scrubbing Process मध्ये दही महत्त्वाचे काम करते.
तसेच केसांच्या पोषणासाठी दही खूप महत्त्वाचे काम करते.
1) दही व मुलतानी माती कालवून केसांच्या मुळाशी लावावी. 2) मेंदीमध्ये दही घालून ती लावल्यास केसांना Natural Glow येतो. 3) आवळा पावडर दही अर्धा ते एक तास लावून ठेवावे.
तूप थंडीच्या दिवसात त्वचा जास्त कोरडी होते. शुष्क वातावरणात अजून शुष्क होते. त्वचेवर पापुद्रे सुटतात. खाज येते. अशावेळी तेलापेक्षासुद्धा तूप त्वचेत जिरवणे अधिक फायद्याचे ठरते. म्हातारपणी होणाऱ्या रूक्षतेवर कोरडेपणावर तूपाचा बाह्य व अभ्यंतर उपयोग चांगला होतो.
म्हातारपणी मलबद्धता ही एक मोठी समस्या असते. अशावेळी दूध तूप घेतल्याने फायदा होतो. तसेच झोप न लागणे ही एक मोठी समस्या असते. अशावेळी गाईचे तूप, काश्याच्या वाटीने पायाला चोळावे. (रात्री झोपताना) खूप फायदा होतो.
लहान मुलांनी व वृद्धांनी अंगाला तेलाप्रमाणेच तूप त्वचेवर चोळून जिरवावे. त्वचा कोमल होते.
साखर –
साखर त्वचेवर चोळली असता मृत त्वचा निघून जाते. त्वचेचा रूक्षपणा कमी होतो.
1) लिंबू रस साखर
2) मर्धा साखर
3) दही साखर
4) गुलाबपाणी साखर
5) केवडा पाणी साखर हे पाचही स्क्रबस उत्तम कार्य करतात.
मध –
सौंदर्यवृद्धी हा मधाचा नैसर्गिक गुण आहे. त्वचेला विविध पोषक द्रव्यांचा पुरवठा करणे आवश्यक असते. योग्य त्या प्रमाणात पोषक द्रव्ये मिळाल्यास त्वचा टवटवीत दिसते. त्वचेवरील ढेुळपी मध खेचून काढतो. अंतःत्वचा मऊ करतो. Naturally Skin Defoxify करतो.
मर्धा कोमट पाणी घेऊन गुळण्या केल्यास घशाला आराम मिळतो. कफाचा त्रास कमी होतो. सितोपलादि चूर्ण मधाबरोबर घेण्याने म्हातारपणी होणारो कफ, खोकल्याचे त्रास कमी होतात.
म्हातारपणी डोळ्यातून पाणी येणे ही समस्या बऱ्याच जणांना असते. अशावेळी मधाचे अंजन डोळ्यात रोज करावे. त्यात फायदा होतो. तर दूधाच्या घड्या डोळ्यावर ठेवल्याने डोळ्यांना थंडावा मिळतो.
अशारितीने पंचामृताचा बाह्य व अभ्यंतर उपयोग हा आबालवृद्धांना खूपच फायदेशीर ठरतो.
म्हणूनच म्हणावेसे वाटते की, ’देवाला पंचामृती स्नान व पंचामृताचे अभ्यंतर पान॥ देई तुम्हा आरोग्य दान. ’
(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व दिवाळी २०२२ ह्या विशेषांकात प्रकाशित झालेला वैद्य अरुणा टिळक यांनी लिहिलेला लेख)
-वैद्य अरुणा टिळक
Leave a Reply