नवीन लेखन...

पालघर पोलिसांचे शतश: आभार !

पालघर पोलिसांना संयम / चिकाटी / निष्पक्षपणाबद्दल धन्यवाद.

विरार येथे एका अल्पवयीन मुलीला एका माथेफिरु तरुणाने चाकूने भोसकून जख्मी केले.

२० जुलै २०१५ रोजी अशी बातमी वर्तमान पत्र / टीव्ही आणि इतर मिडियामध्ये आली होती.

लिंक : http://www.lokmat.com/storypage.php?catid=1&newsid=7205769

काही संघटनांनी / लोकांनी त्या तथाकथित ‘पुरुषाला’ ताबडतोब पकडा / अटक करा / शिक्षा करा अशी मागणीही पोलिसांकडे केली.

तेंव्हा नकार न सहन करू शकणा-या, गुंड प्रवृत्तीच्या, माथेफिरु, विकृत मनोवृत्तीच्या पुरुषांपैकी कुणाचे तरी आणखी एक कृत्य असं गृहीत धरून पुरुषांबद्दल चिढ निर्माण करणारी, पुरुषांपासून असुरक्षितता वाढवणारी भावना या बातमीमुळे जन – मानसात दृढ होण्यास पूरक होणार इतक्यात पालघर पोलिसांकडून या संदर्भातील पुढील चौकशीची बातमी आली. (बातमी : २५ / २६ जुलै २०१५ ) त्यात त्या मुलीने खरं कारण लपवण्यासाठी, स्वत:च्या बचावासाठी हा बनाव करून स्वत:च स्वत:स चाकू मारून जख्मी केले. असे तपासांती निष्पन्न झाले.

लिंक : http://www.lokmat.com/storypage.php?catid=1&newsid=7321807

पुरुष आक्रमक असतात, पुरुष माथेफिरु असतात, प्रेम प्रकरणात अपयश आल्यास नैराश्येतून हल्ला करतात, शारीरिक / मानसिक नुकसान करतात. स्त्री-पुरुष प्रकरणात बहुतेक पुरूषच दोषी असतात, कायद्याची मदत आणि सहानुभूती स्त्रीलाच मिळते, संघटनांचा / लोकांचा दबाव अशी पार्श्वभूमी असतानाही पालघरच्या संबंधित पोलिसांनी संयम दाखवत, पूर्वगृह दूषित न होता तपास केला / सत्य शोधून काढले आणि पुरुषांबद्दल द्वेष निर्माण करणा-या एका बातमीचा खरा पैलू दाखवला. त्याबद्दल पालघर पोलिसांचे शतश: आभार.

सरसकट सर्व पुरुषांबद्दल समाजात विशेषत: स्त्री वर्गात एक भीतीचा,  असुरक्षिततेचा जो (गैर) समज पसरलेला आहे याचा ( गैर ) फायदा घेण्याची वृत्ती काही स्त्रियांमध्ये दिसून येते त्याचे वाण अल्पवयीन स्त्रियांपर्यंत पोहोचले असल्याचे या प्रकरणावरून सूचीत होत आहे का?

पालघर पोलिसांप्रमाणे इतर जणही कुठल्याही स्त्री-पुरुष प्रकरणांकडेही लिंगभेद / पक्षपात न करता पाहतील अशी आशा आहे.

पालघर पोलिसांचा संयम / चिकाटी /निष्पक्षपणा याचं मनापासून कौतुक.

पुन्हा एकदा पोलिसांचे आभार आणि धन्यवाद.

-आकाश

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..