नवीन लेखन...

ऊन पावसाचा खेळ…

पावसाची गोड गाणी
तुझ्या सांगू का कानात…
चिंब चिंब भिजण्याला
चल जाऊया रानात…

थेंब थेंब पावसाचा
तुझ्या गालाव पडेल…
खाली येत ओघळून
दोन ओठांशी भिडेल…

गार वा-याची झुळूक
तुला सोसणार नाही…
तवा मिठीत येण्याची
उगा करशील घाई…

माझ्या पाठीशी येईल
दोन्ही हाताचे कुलूप…
तुझ्या मोकळ्या केसांना
सखे येईल हुरूप…

गाणं गात पावसाचं
जवा जमल गं मेळ…
सुरू होईल गं राणी
ऊन पावसाचा खेळ…

@प्रमोद जगताप
फलटणकर
8554857252

Avatar
About प्रमोद सुनिल जगताप 1 Article
कवी - लेखक

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..