नवीन लेखन...

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जन्म दि. १ मार्च १९५१ रोजी बख्तियारपूर येथे झाला.

बिहारच्या बख्तियारपूर जिल्ह्यात जन्मलेल्या नितीश कुमार यांचं सुरुवातीचं शिक्षण याच जिल्ह्यातील श्री गणेश हायस्कूलमध्ये झालं. नंतर त्यांनी पाटणाच्या इंजिनिअरींग कॉलेजमधून मॅकेनिकल इंजीनियरींगचं शिक्षण पूर्ण केलं.
नितीश कुमार ज्येष्ट स्वातंत्र्य सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश नारायण (जेपी) यांच्या विद्यार्थी आंदोलनात तयार झाले.

१८ मार्च १९७४ रोजी पाटणातील विद्यार्थी आणि युवकांनी सुरु केलेलं आंदोलन जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात देशभर पसरलं. यात केंद्रातील इंदिरा गांधी सरकारविरोधात प्रचंड असंतोष व्यक्त झाला. या आंदोलनात नितीश कुमार यांनी देखील सहभाग घेतला होता. या आंदोलनानंतर देशात आणीबाणी घोषित झाली. त्यानंतर नितीश कुमार यांना देखील भोजपूर जिल्ह्यातील दुबोली गावातून अटक झाली. याच काळात नितीश एक नेते म्हणून घडले. त्यांनी जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, कर्पूरी ठाकुर आणि जॉर्ज फर्नांडिस या देशातील दिग्गज नेत्यांकडून राजकारणाचे धडे घेतले. आणीबाणी संपल्यावर १९७७ मध्ये बिहारची विधानसभा निवडणूक झाली. येथूनच नितीश कुमार यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. नितीश नालंदाच्या हरनौत विधानसभा मतदारसंघातून जनता पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढले आणि हरले.१९८० मध्ये ते लोकदलाचे उमेदवार होते. तेव्हा दुसऱ्यांदाही ते पुन्हा हरले.१९८५ मध्ये अखेर नितीश लोकदलाच्या तिकिटावर हरनौतमधून आमदार झाले.

१९८७ मध्ये नितीश कुमार बिहारच्या युवक लोकदलाचे अध्यक्ष झाले.१९८९ मध्ये त्यांच्याकडे जनता दलाच्या महासचिव पदाची जबाबदारी देण्यात आली. १९८९ मध्ये नितीश ९ व्या लोकसभा निवडणुकीत निवडून आले आणि खासदार झाले. यानंतर १९९० मध्ये एप्रिल ते नोव्हेंबर ते पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्या केंद्रातील सरकारमध्ये कृषी आणि सहकारी मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री झाले. १९९१ मध्ये लोकसभा निवडणुकीत नितीश पुन्हा एकदा खासदार झाले. जवळपास दोन वर्षांनंतर १९९३ मध्ये नितीश कुमार यांना कृषी समितीचं प्रमुखपद मिळालं. या दरम्यान, १९९४ मध्ये नितीश जनता पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता पक्षाची स्थापना केली. मात्र, समता पक्ष १९९५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत हारला. या पराभवानंतर नितीश कुमार यांनी भाजपसोबत आघाडी केली.

१९९६ आणि १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत नितीश पुन्हा खासदार म्हणून निवडून आले.१९९८-९९ पर्यंत ते केंद्रीय रेल्वे मंत्री होते. २००० साली नितीश यांच्या राजकीय प्रवासाला कलाटणी मिळाली. या वर्षी नितीश पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले. त्यांचा हा कार्यकाळ ३ मार्च २०२० ते १० मार्च २००० असा केवळ आठवडाभराचा राहिला. मात्र, याच वर्षी ते वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय कृषी मंत्री झाले. २००१ मध्ये नितीश यांच्याकडे रेल्वेचा अतिरिक्त प्रभार पण आला.
२००४ च्या लोकसभा निवडणुकीत नितीश पुन्हा एकदा निवडून आले. मात्र, त्याच्या पुढच्याच वर्षी नितीश पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री झाले. वर्ष २००५ मध्ये नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. २०१० मध्ये बिहारच्या जनतेने नितीश यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवलं. मात्र, कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी घेत नितीश यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. तसेच जीतन राम मांझी यांना मुख्‍यमंत्री बनवलं.
२२ फेब्रवारी २०१५ रोजी नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या निवडणुकीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील आघाडीचा पराभव केला आणि महागठबंधनचं सरकार आलं. मात्र, लालू प्रसाद यादव यांच्या राजद आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूचा प्रवास फार काळ टिकला नाही. १८ वर्षांनी एकत्र आलेले हे दोन्ही पक्ष पुन्हा वेगळे झाले. २० महिन्यांनी २६ जुलै रोजी नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. तसेच १५ तासात भाजपच्या मदतीने पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली. नुकतेच लोकसभा निवडणुकीला अवघे काही दवस उरले असताना नितीश कुमार पुन्हा एकदा आरजेडीला सोडून भाजपाशी हातमिळवणी केली असून नितीश कुमार एकाच टर्ममध्ये तिसऱ्यांदा किंगमेकरची भूमिका निभावताना दिसत आहेत. आतापर्यंत नितीश कुमारांनी एकूण नऊ वेळा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4333 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..