नवीन लेखन...

वृत्तपत्र विक्रेता दिन

पावसाळा असो की हिवाळा, भल्या पहाटे उठायचं. वर्तमानपत्राचे गठ्ठे ताब्यात घ्यायचे. कोण सायकलवरुन तर कोण चालत घरोघरी वर्तमानपत्र पोहोच करण्याचा नित्यक्रम पाळणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा १५ ऑक्टोबर हा सन्मान दिन. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस २०१८ पासून ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’ म्हणून साजरा होत आहे.

माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम हे एक थोर शास्त्रज्ञ म्हणून सर्वत्र परिचित आहेत. मात्र बालपणी आपल्या कुटुंबीयांना आर्थिक हातभार लावण्यासाठी त्यांनी वृत्तपत्र वितरणाचेही काम केले होते, हे फारच कमी लोकांना माहिती आहे. स्वत: डॉ. कलाम यांनी आपल्या “विंग्ज ऑफ फायर’ या आत्मचरित्रात याबाबत उल्लेख केला आहे.

वृत्तपत्र विक्रेत्यांचे आपल्या रोजच्या आयुष्यातही एक महत्त्वाचे स्थान आहे. आपण झोपेतून उठण्यापूर्वी, रोजच्या ताज्या बातम्या देणारी वृत्तपत्रे पहाटेच आपल्या घरापर्यंत पहाटे पोहचवण्याचे काम ही मंडळी अविरतपणे करत असतात, तेही पाऊस, थंडी, वारा याची तमा न बाळगता. या विक्रेत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्य आहे,

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या दृष्टीने हा कष्टाचा गौरव करणारा, अभिमानाचा दिवस असल्याच्या भावना आहेत.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..