नवीन लेखन...

न्यु सेंच्युरी थिएटर – न्युयॉर्क

आज दिनांक ६ ऑक्टोबर. १९२१ साली याच दिवशी न्युयॉर्कमध्ये उच्चभ्रु असं ब्रोडवे थिएटर उभारण्यात आलं होतं. त्या थिएटरचं नाव होतं न्यु सेंच्युरी थिएटर. हे थिएटर न्युयॉर्कमधील नावाजलेलं शहर मॅनहॅटन येथे वसलेलं होतंं. थिएटरची आसन व्यवस्था १७०० इतकी होती. या संपूर्ण थिएटरचं स्थापत्य हबर्ट जे. क्रॅप यांचं होतं आणि या थिएटरवर मालकी हक्क शुबर्ट या संस्थेचा होता. या थिएटरचं मूळ नाव अल जॉलसन असं होतं. शुबर्टस् ने ते विकत घेतलं त्यावेळी त्याचं जॉलसन्सचं ५९ वे स्ट्रीट थिएटर असं नामकरण करण्यात आलं. ६ ऑक्टोबर १९२१ ला सिगमंड रॉमबर्ग्सच्या बोंबो नामक सांगितीक खेळाने थिएटर सर्वांसाठी खुलं करण्यात आलं. पुढे २ वर्षांनंतर , कॉन्स्टॅंटिन स्टानिस्लावस्कीच्या मालकीचे असलेले मॉस्को आर्ट थिएटर संस्थेचा अमेरिकन प्रिमिअर हा कार्यक्रम तिथे आयोजित केला गेला.

या थिएटरचं अनेकदा वेगवेगळ्या कारणाने वेगळ्या नावाने नामकरण करण्यात आलं, जसं की ,

  1. Jolson’s 59th Street  Theatre (1921-1931)
  2. Central Park Theatre (1931)
  3. Shakespeare Theatre (1932-1934)
  4. Venice Theatre (1934-1942)
  5. Jolson’s 59th Street  Theatre (1942)
  6. Molly Picon Theatre (1943)
  7. Jolson’s 59th Street  Theatre (1943)
  8. New Century Theatre (1944-1954)

यात Jolson’s 59th Street  Theatre हे नाव Jolson यांंचा आदर करण्यासाठी दोनदा ठेवण्यात आलं. यातील Central Park Theatre हे फक्त चित्रपटगृह म्हणून वापरण्यात आलं. ८ एप्रिल १९४४ रोजी थिएटरचं नाव New Century Theatre असं ठेवण्यात आलं. हे नाव ठेवण्यापूर्वी थिएटरचं नुतनीकरण करण्यात आलं.

१९४० चा उत्तरार्ध ते १९५० चा पूर्वार्ध या कालखंंडात NBC Studio नामक संस्ठेने New Century चा वापर टी.व्ही. वरील कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणासाठी केला. १९५४ साली थिएटर कायमस्वरुपी बंद करण्यात आले आणि १९६२ साली हे थिएटर पाडण्यात आले.

— आदित्य दि. संभूस 

#New Century Theatre #New York  #Drama #Television

Avatar
About आदित्य संभूस 78 Articles
मराठी नाट्य चित्रपट कलाकार, दिग्दर्शक, लेखक...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..