नवीन लेखन...

नवीन घर घेणार्‍यांनो.. सावधान

नवीन घर घेणाऱ्यांनो सावधान !!! सर्व मराठी मध्यमवर्गीयांसाठी  महत्त्वाचा सल्ला

इलेक्शनच्या तोंडावर अनेक  राजकीय नेत्यांनी या बिल्डर-डेव्हलपरकडे ठेवलेले पैसे परत मागायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक बिल्डर-डेव्हलपर्सच्या पायाखालची माती सरकली आहे. कारण त्यांनी विकसित केलेल्या अनेक गृहसंकुलांमध्ये गिऱ्हाईकच नाही. कोटींच्या घरातले फ्लॅट इथेकुणाला परवडणार आहेत?

पण राजकारण्यांना इलेक्शनसाठी त्यांचं काळं धन  परत करण्याशिवाय गत्यंतर नाही, त्यामुळे बिल्डर-डेव्हलपरला जागांचे भाव खाली आणण्याशिवाय गत्यंतर  नाही. त्यामुळे रिअल इस्टेट म्हणजे राहत्या जागांचे भाव झपाट्याने खाली येणार यात शंकाच नाही.

शहापूरमध्ये तीन महिने पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष्य असतानाही तिथल्या एका मोठ्या प्रोजेक्टसाठी त्या बिल्डरने तर आघाडीच्या हिंदी सिनेमा नटीचा चेहरा वापरून लोकांनी स्वस्तातले  फ्लॅट घ्यावेत म्हणून जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. सोबत कार, दागिने, किचन अक्सेसरीज वगैरे निःशुल्क देण्याचं आमीषही दाखवलंय.

पण मराठी मध्यमवर्गीयांनो सावधान. हीच वेळ आहे एकजूट दाखवण्याची. या जाहिरातींना भुलून धावू नका.  कारण बड्या बिल्डर-डेव्हलपर लॉबीची  नुकतीच एक गोपनीय मीटिंग झाल्याचं समजतं.  त्यात त्यांनी जागांचे भाव ५० टक्क्यांपर्यंत उतरू द्यायचे नाहीत, अशी स्ट्रॅटेजी आखल्याचं  समजतं. केवळ २५ टक्क्यांपर्यंत भाव उतरवले तर मिडलक्लास जागांवर उड्या मारेल आणि रिअल इस्टेट तेजीत येईल अशी त्यांची योजना  आहे. पण मराठी मध्यमवर्गीयांनो ध्यान्यात घ्या.

तुम्ही एकजूट ठेवा. जागांचे भाव आता आहेत  त्याच्या निम्मे येईपर्यंत घाई करू नका. हा गेम ऑफ पेशन्स आहे. प्रचंड होल्डिंग कपॅसिटी असलेले बिल्डर जिंकतात की घरांची गरज असलेला सर्वसामान्य जिंकतो, हे आता लोक  बघतायत. यात काही बँकाही भरडल्या जाण्याचा
संभव आहे. बिल्डरांना कोट्यवधी रुपयांचं कर्ज देणारी एक बँक सध्या डगमगते आहे. अनेक बँकांना गिऱ्हाईके नाहीत. कारण ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, असेच लोक सध्या जागा विकत घेताहेत. इथल्यापेक्षा दुबईतले घर  स्वस्त झाले आहे.

मराठी मध्यमवर्गीयांनो  जागांचे भाव कृत्रिमरीत्या वाढवणाऱ्या बिल्डरांना नमवण्याची हीच संधी आहे. तुम्ही जर एकजूट दाखवून पेशन्स दाखवला आणि जागांचे भाव  ५० टक्के खाली आल्याशिवाय नवे घर घेणार  नाही अशी धमक दाखवली तर सर्वसामान्य लोकांना ग्राण्टेड धरणाऱ्या बिल्डरांना कायमचा  धडा शिकवता येईल.

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..