नवीन लेखन...

मुक्तीच्या वळणावर थांबलेली नदी

(आपण नदीच्या पाण्याचा प्रचंड प्रमाणावर वापर करत आहोत. नदीकाठावरील जंगल उद्ध्वस्त झाले आहे. वाढत्या तापमानामुळे हिमालयातील बर्फही झपाट्याने वितळत आहे. भविष्यात नदीला पाणी न मिळाल्यास तिच्या प्रवाहावर व पर्यावरणावर काय परिणाम होईल. या लघु कथेच्या माध्यमाने…)

एक थकलेली, पराजित, तहानलेली नदी पाण्याच्या शोधात भयाण निर्जन वाळवंटात भटकत होती. तिच्या प्रवाही स्वरात आधीचा आत्मविश्वास विरघळून गेला होता. मार्गात तिला जीवनाचे कुठलेही लक्षण दिसत नव्हते. तिला काठावर कुठेही मनुष्य दिसला नाही, जनावर दिसला नाही आणि पक्षी ही दिसले नाही. अचानक आकाशात तिला एक गिधाड तिच्या डोक्यावर घिरट्या मारताना दिसला. पूर्ण शक्ति एकवटून नदीने त्याला विचारले, “गिधाड भाऊ, मिळेल का मला कुठे जीवनदायी पाणी? गिधाड राक्षसी हास्य करत म्हणाला, ताई, पाण्याचे विचारू नको. पण पुढच्या वळणावर तुला निश्चित मुक्तीचा मार्ग सापडेल. नदी त्या वळणावर पोहोचली. तिथे एक शुष्क वडाचं झाड होतं. त्याच्या फांदीवर एक प्रेत झुलत होतं. झाडाखाली प्राण्यांच्या कवट्यांचा एक मोठा ढीग साचलेला होता. गिधाडांची गोंडस मुले त्या कवट्यांच्या ढीगांवर उड्या मारत फुटबॉल खेळताना दिसली. ते हेलावणारे भयाण दृश्य पाहून नदीच्या अंतर्मनातील आशेचा शेवटचा थेंब ही सुकून गेला. त्या भयाण निर्जन वाळवंटात नदीचा अंत झाला. आकाशात घिरट्या मारणाररा गिधाड शांतपणे तिच्या मृत देहावर उतरला.

 

Avatar
About विवेक पटाईत 202 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..