नवीन लेखन...

चित्रपट बाळकडू – प्रेक्षकांसाठी कडू डोस

balkadu-movie-poster

महाराष्ट्राचे प्रेरणा स्थान असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विचारांवर आणि जीवनप्रवासावर एका चित्रपटातूनतरी कथा मांडता येण्यासारखी नाही; तरी पण बाळकडूच्या निमित्ताने बाळासाहेबांचे विचार मराठी माणसांसाठीच्या अपेक्षित असलेल्या काही संकल्पना “बाळकडू”च्यानिमित्ताने जोमाने आणि प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाकडूने आणि लेखकाकडून करण्यात आला आहे.

बाळकडूची कथा फिरते बाळकृष्ण पाटील (उमेश कामत), या तरुण शिक्षक असलेल्या मध्यवर्ती व्यक्तीरेखा भोवती जो सिनेमाचा नायक ही आहे.सुरुवातीला बाळकृष्णला महात्मा गांधी पासून स्वातंत्र्यपूर्व व त्यानंतरच्या काळातील विविध नेत्यांचे आणि पुढार्‍यांचे आवाज कानामध्ये ऐकू येत असतात. त्यामधील एक आवाज हा बाळासाहेबांचा देखील असतो. यासाठी बाळकृष्ण उपचारासाठी डॉक्टरांकडे जातो. कालांतराने सर्व नेत्यांचे आवाज ऐकायला येणे बंद होतात ! फक्त बाळासाहेब ठाकरेंचा आवाज त्याचा कानात अखेरपर्यंत घुमत असतो. मराठी माणसावर होणार्‍या अन्यायाविरुध्द पेटून उठलेच पाहिजे, मराठी माणसांचे हक्क-अधिकार, मराठी भाषा, मुंबईत मराठी माणसांचे कमी होत चाललेले प्रमाण अश्या मराठीच्या मुद्यांवरील सततची गर्जना व त्यामुळे निर्माण झालेली मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आणि त्यामुळे पेटून उठलेले मन, त्यातच शिक्षकीपेक्षेची मिळालेली जोड मग पुढे त्यातून उभा राहिलेला लढा, संघर्ष हे सर्व बाळकडू मधून दाखवण्यात आले आहे.

balkadu movie posterमहत्त्वाचं म्हणजे कथेची बांधणी योग्य प्रकारे झाल्यामुळे चित्रपटातील अनेक प्रसंगांशी एकमेकांना सांगड घालता आलेली आहे. जसं की शाळेतला मुलांनी रेखाटलेली व्यंगचित्रे असतील त्याची बाळासाहेबांनी विरोधकांवर आसुड ओढण्याची वापरलेली युक्ती असेल किंवा टॅक्सी वर उभं राहून जनतेला दिलेलं भाषण हे प्रसंग पुन्हा विचार करुन प्रेक्षकांना भुतकाळातल्या आठवणींमध्ये रममाण करायला लावतात. उमेश कामत यांनी प्रसंगानुरुप खुबीने केलेली संवादफेक हे आणखीन एक वैशिट्य; त्याचप्रमाणे बाळासाहेबांचा आवाज अगदी हुबेहूब व अकृतिम वाटतो.

चित्रपटात बाळकृष्णच्या आईची भूमिका सुप्रिया पाठारेंनी उत्तमरित्या साकारली आहे. नेहा पेंडसे नायकाची हिरॉइन आहे हे नव्याने सांगण्यासारखी गोष्ट नसली तरी ही नायिका करारी, परखड आणि तितकीच आधुनिक विचारांची दाखवण्यात आली आहे. टिकू तस्लानिया, आनंद इंगळे, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, भाऊ कदम, जयवंत वाडकर, शरद पोंक्षे, महेश शेट्टी, अभय राणे यांच्या भूमिका कमी कालावधीच्या असल्या तरी सुध्दा प्रत्येक कलाकाराने कौशल्यपूर्ण अभिनय करण्यात यश मिळवले आहे.

चित्रपटात गाणी सुमार दर्जाची असली तरी अधूनमधून येणारी “साहेब”ही गर्जना चित्रपटाची कथा कमी कंटाळवणी करण्यात पुरेशी आहे. अजित-समीर यांचं संगीताची व इतर गाण्यांची मोहिनी प्रेक्षकांवर फारकाळ चालेल असे वाटत नाही.

कथेतल्या लोकल ट्रेन मध्ये दिलेले भाषण व तरुण सहप्रवाश्याचा हात धरुन त्याला दादर स्टेशनच्या परिसरात आपल्यासोबत अक्षरश: जबरदस्तीने आणत, किती मराठी माणसं उद्योग-धंदा करु शकतात हे आजच्या काळात दाखवणे म्हणजे हास्यापद आणि काल्पनिक वाटतातं. दुसरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी एका सामान्य माणसाला आपल्या केबीन मध्ये बोलावून “उपदेशाचे डोस” पाजणे म्हणजे कथा अवास्तवपणा निर्माण केल्यासारखा आहे. ऐतिहासिक पात्रांचं दर्शन होणे आणि त्यांचे आवाज ऐकू येणं हे “मुन्नाभाई एम.बी.बी.बी.एस”, “शिवाजी राजे भोसले बोलतोय”, “खोखो” यासारख्या चित्रपटातून पहायला मिळाले असल्यामुळे कथेत तितकी नाविन्यता वाटत नाही.

तांत्रिकदृष्ट्या चित्रपट ठीक असला तरी, बाळासाहेबांचा मुळ उद्देश लेखकाला नीट न सांगता आल्यामुळे पटकथेची बाजू खुपच खिळखिळी आहे, त्यामुळे चित्रपटाचा शेवट रटाळवाणा वाटतो.

स्वप्ना पाटकर यांची पहिलीच निर्मिती असलेला “बाळकडू” हा चित्रपट काही प्रमाणात तरी प्रेक्षकांचे लक्ष पोस्टर किंवा प्रोमोज द्वारे आकर्षीत करण्यात यशस्वी ठरला असला, तरीपण हा चित्रपटात बाळासाहेबांच्या आवाजामुळे मराठी अस्मितेची क्रांती घडवेल असे बाळकडूचे वर्णन करता येण्यासारखे नाही. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर आधारीत “बाळकडू” प्रेक्षकांच्या काळजाला भिडण्यात काहीप्रमाणात तरी अपयशी ठरलायं.

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..