मिळविण्यातील आनंद

आस राहते सतत मनी,   मिळत नसते त्याचेसाठी

प्रयत्न सारे होत असती,  हाती नाही ते मिळविण्यापोटी….१,

प्रयत्नात तो आनंद होता,  धडपड होती, होती शंका

मिळविण्याच्या त्या लयीमध्यें,  जिद्द मनाची आणिक हेका….२,

यश मिळते जेंव्हां पदरी,  धडपड सारी थंडावते

ज्याच्या करिता सारे सोशीले,   त्यातील उर्मी निघून जाते….३,

यशांत नाही आनंद तेवढा,   मिळविण्यात जो दिसून येई

कांहींतरी ते मिळवायचे,   याच विचारी रमून जाई….४

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1581 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…