मैं खयाल हूँ किसी और का

मैं खयाल हूँ किसी और का मुझे सोचता कोई और हैसरे आईना मेरा अक्स है पसे आईना कोई और है

मैं किसी के दस्ते तलब में हूँ तो किसी के हर्फेदुआ में हूँमैं नसीब हूँ किसी और का मुझे मांगता कोई और है

कभी लौट आयें तो न पूछना सिर्फ देखना बडे गौर सेजिन्हें रास्ते में खबर हुई कि ये रास्ता कोई और है

अजब एतबार ब एतबारी के दरमियां है जिंदगीमैं करीब हूँ किसी और के मुझे जानता कोई और है

वही मुन्सिफों की रिवायतें वही फैसलों की इबारतेंमेरा जुर्म तो कोई और था पर मेरी सजा कोई और है

तेरी रोशनी मेरी खद्‌दो खाल से मुख्तलिफ तो नहीं मगरतू करीब आ तुझे देख लूं तू वही है या कोई और है

जो मेरी रियाजते नीमशब को सलीम सुबह न मिल सकीतो फिर इस की मानी तो ये हुए के यहां खुदा कोई और है(सलीम कौसर)

स्वतःची ओळख हा समस्त मानवजातीतील विद्वान आणि वैज्ञानिकांसमोरील एक कळीचा प्रश्न ठरला आहे. “माणूस कोण?” या प्रश्नाचे सर्वमान्य उत्तर आतापर्यंत कुणीही देऊ शकलेले नाही. गझलकारांनी मात्र आपापली हृदये लढवून आणि डोकी खाजवून अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती प्रत्येकाला रूचतील आणि समजतीलच असे मात्र नाही. सलीम कौसर नावाच्या शायराने स्वतःचा शोध घेण्याचा केलेला प्रयत्न या

अतिसुंदर आणि काहीशा अवघड गझलेत व्यक्त झालेला आहे.

शायर फर्मावतो

: मी दुसऱ्या कुणाचा तरी विचार (खयाल) आहे आणि माझा विचार तिसराच कुणीतरी करतो. (मी म्हणजे काय हे मलाही अजून नीटसं उमगलेलं नाही.) आरशासमोर आहे ते माझं प्रतिबिंब (अक्स) आणि आरशामागे मात्र (पसे आईना) दुसरंच कुणीतरी आहे.

मी हात जोडून केलेल्या कुणाच्या तरी मागण्यात (दस्ते तलब) आहे तर कुणीतरी आशीर्वाद म्हणून उच्चारलेल्या शब्दांत (हर्फेदुआ) आहे. मी कुणाचं तरी नशीब आहे आणि मला मागणारी व्यक्ती मात्र तिसरीच कुणीतरी आहे.

रस्त्याने गेलेले लोक पुन्हा कधी दिसलेच तर त्यांना कधी काही विचारू नका. फक्त लक्षपूर्वक त्यांच्याकडे पहा. अहो, रस्त्याने जाता जाता ज्यांच्या लक्षात आलं आहे की हा रस्ता भलताच आहे, त्यांना प्रश्न विचारून तुम्हाला कसली उत्तरं मिळणार आहेत !

आयुष्य कसं आहे बघा. निरनिराळ्या प्रकारच्या श्रद्‌धा आणि विश्वासानं भरलेलं ! मी कुणा भलत्याच्याच जवळ आहे आणि आणि मला समजावून घेणारं मात्र आणखीच भलतं कुणीतरी आहे. त्याच त्या न्यायाधीशांच्या परंपरा (रिवायतें) आणि तेच ते निकालांचे अर्थ (इबारतें). अहो माझा गुन्हा काय आणि तुम्ही शिक्षा देताहात कोणती ! गुन्हा एक आणि शिक्षा वेगळीच हा अजबच न्याय झाला.

तुझे तेज माझ्या आकृतीपासून (खद्‌दोखाल) अलग (मुख्तलिफ) बिलकुल नाही; पण जरा जवळ तर ये. मला बघू दे. तो तूच आहेस की आणखी कुणीतरीच आहेस !

मध्यरात्रीला (नीमशब) जागून केलेल्या माझ्या साधनेला (रियाजत) ज्याअर्थी फळ मिळालं नाही त्याअर्थी इथे परमेश्वरसुद्‌धा तुम्ही आम्ही मानतो तो नक्कीच नाही. तो परमेश्वरही भलताच कुणीतरी आहे !!

चाहती हूँ मिट जाऊं तुझमें
बाहों में आकर मिलाकर बदन
चूम लूं उन होठों की आग प्यारे
मिलन-दर्द में हो जाऊं मगन.

असीम हे ईश्वर! गरिमा तुम्हारी
और मुझे ज्ञात मैं एक धूलीकण
लेकिन सजाने चरण तुम्हारे
धूल ही है मेरा आभूषण.About डॉ. आनंद बोबडे 232 लेख
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…