घुमान साहित्य संमेलनाचे थेट प्रक्षेपण

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हटले की वाद,विवाद,चर्चा यांना उधाण यायलाच पाहिजे. या त्रिकुटाशिवाय साजरे झालेले संमेलन नजिकच्या भूतकाळात तरी दिसत नाही. घुमानच्या संमेलनातसुद्धा असेच अनेक वाद ऊफाळून आले. त्यातूनही मार्ग काढून हे संमेलन आता होत आहे आणि त्याला पंजाब सरकारचे समर्थन आणि सहकार्यही लाभले आहे. मात्र तरीही संमेलनाला वादाची फोडणी हवीच या न्यायाने आता एक नवी चर्चा सुरु झालेय. या संमेलनाबाबत महाराष्ट्र सरकार उदासिन असल्याची शंका खुद्द अ. भा. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांनीच उपस्थित केले.

या संमेलनाचे आकाशवाणी आणि दूरदर्शनवरुन मोफत प्रसारण व्हावे यासाठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष भरत देसलडा यांनी प्रस्ताव पाठवला होता. मात्र या प्रसारणासाठी दूरदर्शनने पाच लाख रुपये मागितल्याची माहिती माधवी वैद्य यांनी दिली. आकाशवाणीनेही पैसे मागितल्याचे त्यांनी सांगितले.  मराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्र आणि पंजाब सरकारचे सहाय्य, तसेच इतरही मार्गातून पैसे मिळत असताना पाच लाख रुपयाच्या थेट प्रक्षेपणासाठी सरकारची पुन्हा मनधरणी करणे योग्य आहे का?

आपणही लिहा आपले मत. मराठीसृष्टीचे सभासद असाल तर थेट लॉगिन करुन लिहायला सुरुवात करा. फेसबुकद्वारे लॉगिन करुनही आपण लिहू शकता.

[fep_submission_form]

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..