मधुरम मधुरिका – मधुरिका पाटकर

याखेपेची फोटोची गोष्ट थोडी वेगळय़ा प्रकारची आहे… प्रसिद्ध टेबल टेनिसपटू मधुरिका पाटकरचे हावभाव कॅमेऱयात चित्रबद्ध झाले आहेत…

नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये (कॉमनवेल्थ गेम्समध्ये) सांघिक टेबल टेनिस प्रकारात हिंदुस्थानी महिलांनी जबरदस्त कामगिरी करत सिंगापूरला जोरदार धक्का दिला. या स्पर्धांमध्ये सुवर्णपदकाची कमाई करत हिंदुस्थानी महिलांनी देशाच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला. यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेंच्या दुहेरीत मौमा दास आणि मधुरिका पाटकर यांनी हिंदुस्थानला आघाडी मिळवून दिली. आपल्या खेळात, सरावात सातत्य राखत मधुरिका पाटकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांत यशाची मोहोर उमटवली आणि तिच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला.


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

मधुरिका पाटकर हे नाव गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने समोर आलं ते तिच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे. तिला शिवछत्रपती पुरस्कारानं (२००८-२००९) सन्मानित केले असून तिचा युथ नॅशनल चॅम्पियनशिप (२००६) अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. गुरू शैलजा गोहाड यांच्या तालमीत मधुरिकाने टेबल टेनिसचा उत्तम सराव करत अनेक स्पर्धांतून उठावदार कामगिरी केली आहे.

खेळात वेगळं नाव कमावलेल्या आणि शेकडो पदकांवर यशाची मोहोर उमटवणाऱया मधुरिकाचं प्रोफाइल शूट करण्याची पहिली संधी मला २०१३ साली मिळाली. तिच्या याच पदकांसोबत तिचा एक फोटो टिपायचा मला मोह आवरला नाही. सुरुवातीला स्टुडिओ लाइटस्मध्ये तिचे काही फोटो मी टिपले. नंतर बॅकग्राऊंडला तीन ते चार लाइटस् ठेवून तिचा फोटो टिपायचा मी प्रयत्न केला. आकाशात चांदण्या चमकाव्या तसा या चमकदार कामगिरी केलेल्या मधुरिकाचा फोटो टिपण्याचा माझा प्रयत्न होता. एरव्ही आपल्या खेळानं समोरच्याला गारद करणारी मधुरिकाचा चेहरा काहीसा अबोल वाटत होता. कॅमेऱयाच्या समोर अनेक कलाकार, खेळाडू निःशब्द होताना मी पाहिले आहेत. अनेक दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्रीही याला अपवाद नाहीत. लाइटस्, कॅमेरा आणि ऍक्शन हे त्यांच्यासाठी कितीही नेहमीच जरी असलं तरीही लाइटस् लावल्यानंतर अनेकांच्या चेहऱयावर भीती दिसते. या कॅमेरा फिअरमुळे फोटो टिपणं म्हणजे भावनांशिवाय एखाद्याचं केवळ छायाचित्र कॅमेराबद्ध करणं होय. आणि म्हणूनच समोरची व्यक्ती कॅमेरा, लाइटस् आणि तिथल्या वातावरणाशी मिसळत नाही तोवर त्याला बोलतं करत, त्याला त्या वातावरणशी एकरूप करत, त्याचा चेहरा खुलवणं हे माझ्यासाठी एक फोटोग्राफर म्हणून सगळय़ात महत्त्वाचं काम ठरतं.

मधुरिकाच्या चेहऱयावरील हावभाव लक्षात घेऊन तिच्याशी काहीवेळ बोलून तिच्या खेळाचा आलेख समजून घेतला. या गप्पांच्या वेळी मधुरिका चांगलीच खुलली आणि तिच्या चेहऱयावरचे हावभाव हळूहळू बदलू लागले. स्टुडिओ लाइटस्चा वापर करून इनडोअर शूट करण्याऐवजी तिचं स्टुडिओच्या आवारात आउटडोअर शूट केलं. या वेळी तिच्या हातात तिने कमावलेली पदके होती आणि या पदकांसोबत उभी असलेल्या मधुरिकाच्या चेहऱयावरचं स्मितहास्य बघण्याजोग होतं. हे शूट झाल्यानंतर आम्ही पुन्हा इनडोअर शूटसाठी स्टुडिओत गेलो आणि इथेही गोड चेहऱयाच्या मधुरिकाचे फोटो मला टिपता आले.

या शूटनंतर विविध माध्यमांतून आणि अनेकदा प्रत्यक्ष तिच्याकडून तिच्या खेळाचा प्रवास वेळोवेळी समजत होता. नुकतंच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये तिला मिळालेल्या यशानंतर तिचं आणखी एक शूट करायचं आम्ही ठरवलं. या वेळी तिचे खेळतानाचे – ऍक्शन फोटो टिपायचे असं आम्ही ठरवलं होतं. यासाठी आम्ही मुलुंड जिमखान्याच्या टेबल टेनिस कोर्टमध्ये गेलो आणि तिथे सुरुवातीला इनडोअर शूट केलं. यानंतर एक आउटडोअर शूटही केलं. या वेळी मधुरिका कॅमेऱयासाठी चांगलीच तयार झाली होती. तिच्या चेहऱयावर योग्य ते हावभाव होते आणि नेमकं काय हवंय हे समजून घेऊन ती वावरत होती. या वेळी मला फोटो काढणं खूपच सोपं झालं होतं आणि म्हणूनच एकापाठोपाठ एक अशा अनेक फोटोंची सिरीजच मला या वेळी टिपता आली.

मधुरिका खेळाच्या बाबतीत खूपच शिस्तप्रिय आहे. तिच्या यशाचं ती कधीच प्रदर्शन मांडत नाही. काही क्षण यशाच्या आनंदात घालवल्यानंतर त्यात फार न रमता लगेच पुढच्या स्पर्धेच्या तयारीला ती लागलेली असते. सराव, खेळातलं सातत्य, त्यासाठीची तयारी, सततचा आंतरराष्ट्रीय प्रवास यातच तिचा अधिक काळ तिने घालवलेला दिसतो. खेळातल्या याच प्रामाणिक प्रयत्नामुळे मधुरिकाच्या यशाचा आलेख आजवर नेहमीच चढता राहिलेला दिसतो. तिचा हा आलेख उत्तोरोत्तर उंचच उंच जात राहील आणि या हिंदुस्थानी सुवर्णकन्येचं नाव देशाच्या क्रीडा इतिहासात अनेकदा सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल हे नक्की.

— धनेश पाटील
dhanuimages@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..