नवीन लेखन...

मा. भगवान दादा

मा. भगवान दादा. त्यांना मी अनेक वेळा भेटायचो , त्यांच्या वाढदिवशी घरी जायचो मग खूप गप्पा , खूप आठवणी ते सांगत, एकदा मला म्हणाले , माझ्याकडे खूप गाड्या होत्या . त्यातली एक गाडी माझ्या मित्राला आवडली . त्याला मी देऊन टाकली . पुढे माझी सांपत्तिक स्थिती नाजूक असताना , दादरच्या माझ्या घरासमोरच्या फुटपाथवरून पायी जात होतो , माझा तो मित्र सरळ गाडी घेऊन न थांबता निघून गेला .’ तेव्हा दादा मला म्हणाले , ‘अरे अजून कुठल्याही इथल्या टॅक्सिवाल्याला, माणसाला सांग, दादांनी बोलवले आहे, हातचे काम टाकून येतील.’

मी निरुत्तर झालो होतो.

भगवान दादांना सहज म्हणालो दादा अभिताभ तुमच्यासारख्या स्टेप्स टाकतो नाचताना तेव्हा दादा माझ्याकडे डोळे वटारून म्हणाले, अरे तो नाचतो तेव्हा त्याचा कमरेवरचा भाग कसा असतो ते नीट पहा, दादांचे त्यावेळेला पाय अधू होते परंतु त्यानी मला ते कसे नाचत याची झलक दाखवली. दादाचे खूप किस्से आहेत . खरे तर दादांच्या घरी मला माझा मुलुंडचा मित्र सतीश शिंदे यांच्यामुळे जात येत होते.

‘दादा हा ग्रेटच होता.’

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..