जाणून घ्या, कोणत्या दिशेला डोके ठेवून का झोपू नये

आपल्या दिनचर्येतील सर्वात महत्त्वपूर्ण अंग शयन आहे. शयन म्हणजे झोप. मनुष्य, पशु-पक्षी, झाडे-झुडपं सर्वजण शयन करतात. झोप कशाप्रकारे आल्या स्वास्थ्य आणि चेतनेसाठी लाभदायक ठरू शकते, यासाठी शास्त्रामध्ये विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. झोपताना पाय दक्षिणेकडे असू नयेत आणि उत्तर दिशेकडे डोके ठेवून झोपू नये. अशा स्थितीमध्ये झोपल्यास मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. येथे जाणून घ्या, शास्त्रामध्ये झोपण्याशी संबंधित सांगण्यात आलेल्या काही खास गोष्टी…

दिवसभर काम करून आपण थकून जातो. आपल्या शरीरातील उर्जा कमी होते. अशावेळी शरीराला आरामाची आवश्यकता असते. शरीराला आराम देण्यासाठी आपण झोपतो. जेव्हा आपण झोपेतून उठतो तेव्हा स्वतःमध्ये ताजेपणा, स्फूर्तीचा अनुभव करतो. झोपल्यानंतर आपल्यामध्ये पुन्हा उर्जा एकत्र होते, ज्यामुळे आपल्याला काम करण्याची ताकद मिळते. झोपेचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी थेट संबंध आहे. याच कारणामुळे आपल्या ऋषीमुनींनी या संदर्भात काही नियम तयार करून ठेवले आहेत. या नियमांचे पालन केल्यास झोपेचा अधिकाधिक लाभ प्राप्त होऊ शकतो. संध्याकाळी झोपू नये, झोपताना पाय दक्षिणेकडे करू नयेत असे निर्देश शास्त्रामध्ये देण्यात आले आहेत.

पुढे जाणून घ्या, झोपेशी संबंधित इतर काही खास गोष्टी

– रात्री जेवण केल्यानंतर लगेच झोपू नये. झोपण्यापूर्वी सद्ग्रंथांचे अध्ययन आणि देवाचे स्मरण करावे. झोपण्यापूर्वी उद्या करावयाची कामाची आखणी केल्यास उत्तम राहते. पूर्व आणि दक्षिण दिशेला डोके करून डाव्या अंगावर झोपावे. बेडरूममध्ये प्रसन्न चित्र लावणे उत्तम ठरते.

– झोपण्यापूर्वी भजन किंवा आवडते संगीत ऐकावे. यामुळे मन तणावरहित होते. मन शांत असेल तर झोप शांत लागते. सूर्योदयापूर्वी झोपेतून उठावे. सूर्योदयानंतर झोपेतून उठल्यास शरीरात आळस राहतो.

पूर्व किंवा दक्षिण दिशेला डोके करून झोपणे विज्ञान सम्मत प्रक्रिया आहे. यामुळे आजार दूर राहतात. सौर जग ध्रुवावर आधारित आहे. ध्रुवाच्या आकर्षणाने दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रगतीशील विद्युत प्रवाह आपल्या डोक्यात प्रवेश करतो आणि पायाच्या माध्यमातून बाहेर पडतो.

– अशा स्थितीमुळे जेवण सहजपणे पचते. सकाळी आपण झोपेतून उठल्यानंतर मेंदू शांत आणि शरीर उर्जावान असते. यामुळे झोपताना पाय दक्षिणेकडे करू नयेत.

डाव्या अंगावर झोपणे –
डाव्या अंगावर झोपण्यामागे वैज्ञानिक कारणही आहे. ही प्रक्रिया स्वर विज्ञानावर आधारित आहे. आपल्या नाकातून आत आणि बाहेर जाणार श्वास स्वर असतो. डाव्या नाकपुडीतून श्वास घेण्याच्या आणि सोडण्याच्या क्रियेला चंद्र स्वर म्हणतात. अशाप्रकारे उजव्या बाजूचा सूर्य स्वर असतो. सूर्य स्वर आपल्या शरीरात उर्जा निर्माण करतो, यामुळे अन्न पचण्यास मदत होते. यामुळे शास्त्रामध्ये डाव्या अंगावर झोपण्यास सांगितले आहे.

Avatar
About सुषमा मोहिते 34 Articles
सुषमा मोहिते या आरोग्यविषयक लेखन करतात. त्या “आरोग्यदूत” या WhatsApp ग्रुपच्या Admin पदाचीही जबाबदारी सांभाळतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…