नवीन लेखन...

खेचून मिळवा

तो तर देत नसतो कांहीं,
घ्यावे लागते खेचूनी  ।
शक्ती लावूनी खेचा सारे,
देईल परि ढील सोडूनी  ।।

जरी असला दयेचा सागर,
केवळ मागणें मान्य नसे  ।
तुटून तुमचे प्रयत्न होता,
ओजळीने तो देत दिसे  ।।

व्यर्थ घालवी जीवन कांही,
स्वार्थीपणाच्या मागणी पायी  ।
वेडे ठराल तुम्हींच परि,
काळ मात्र कधी थांबत नाही  ।।

धडपड करा, लुटून घ्या
सांघिकतेच्या भूमिकेतूनी  ।
जाच न होई दुजास त्याचा,
हीच भावना उरी बाळगूनी  ।।

— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2102 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..