नवीन लेखन...

खटकणारी आडनावं बदलण्याचे काही अुपाय

कुणाला वडिलोपार्जित मालमत्ता भरपूर मिळते तर कुणाला काहीच मिळत नाही. पण आडनावाचा वारसा मात्र नको असला तरी मिळतो. आडनाव कसंही असलं तरी ते जन्मभर आपल्या नावासमोर लावावंच लागतं. काही आडनावं भारदस्त असतात तर काही लाजिरवाणी असतात. मराठी आडनावात कर्तृत्व आहे, गुणावगुण आहेत, घरातले पदार्थ आहेत, घरातल्या वापरातल्या वस्तू आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, भाज्या आहेत, व्यवसाय आहेत, निवास आहेत…वगैरे.

खरं म्हणजे मराठी आडनावात काय नाही असं म्हणावंसं वाटतं..

आडनावातील काही अक्षरं बदलवून, चांगला अर्थ असलेलं आडनाव धारण करणं :: ढेकणेचे देखणे, गीधचे गीत, बोंबलेचे महाशब्दे, डास चे गुणगुणे वगैरे.
>> पूर्वजांच्या निवासाचं शहर किंवा स्थान दाखविणारं आडनाव धारण करणं. मुंबअीला स्थायिक झालेल्या कुटुंबानं नागपुरे, नागपूरकर किंवा नागपूरवाले असं आडनाव धारण करणं.
>> आनुवंशिक गुण किंवा कला असलेल्या कुटुंबानं त्या कलेलाच आडनावाचं स्वरूप देणं. गाणार, चित्रकार, कलाकार, तबलजी, बासरीवाले वगैरे.
>> आडनावंच सोडणं. पण या अुपायामुळं, आनुवंशिकतेचं साधर्म्य दाखविण्याचा अुद्देशच असफल होअील.
>> आडनाव/नाव बदलविण्यासाठी किंवा त्यात झालेल्या चुका सुधरविण्यासाठी, ठराविक फॉर्म भरून आणि ठरलेलं शुल्क भरून तो फॉर्म, संचालक, शासन मुद्रण, लेखनसामुग्री व प्रकाशन संचालनालय, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड, मुंबअी 400004 येथे द्यावा. नंतर महाराष्ट्र शासन, हे बदल, गॅझेट मध्ये प्रसिध्द करतं. या नंतर हा बदल, अेका अिंग्रजी आणि अेका मराठी वृत्तपत्रात, छोट्या जाहिरातीच्या स्वरूपात, त्या व्यक्तीला स्वखर्चानं प्रसिध्द करावा लागतो. त्या नंतर हा बदल कायदेशीर समजला जातो. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र फॉर्म भरावा लागतो.
>> खरं म्हणाल तर ही व्यवस्था, जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या गावीही करायला हवी.
>> आडनाव कसंही असलं तरी ते बदलविण्याची मानसिकता अजून आपल्या समाजात आलेली नाही. आमची ओळख पुसली जाअील याची भिती वाटते. शिवाय बदल अंमलात आणण्यासाठी बराच खटाटोप करावा लागतो. त्यापेक्षा आडनाव न बदललेलंच बरं असा विचार करतात.
>> विवाह करतांनाच, खटकणारं आडनाव बदललं तर अपत्यांचं बदललेलं आडनावच रूढ होअील.
>> कुणाला, आडनावं बदलविण्याचे आणखी काही अुपाय सुचल्यास फेसबुकवर कळवावं.

अशाच प्रकारचा अेखादा अुपाय योजिला तर … डोअीफोडे, मानमोडे, कानफाटे, चाटुफळे, बहिरट, गाढवे, अुंदरे, डुकरे, कुत्ते, हगवणे, पातळहागे, रगतचाटे, झुरळे, गांडोळे, गेंडे …. अशासारखी विक्षिप्त, लाजिरवाणी, भयानक, निंदाजनक, किळसवाणी, हास्यास्पद, अश्लील … अशी आडनावं नाहीशी होअून, लेकीसुना, मुलंमुली, विद्यार्थी वगैरेंचा मनस्ताप नाहीसा होअील.

मराठी ज्यांची मातृभाषा आहे अशा कुटुंबांच्या आडनावांचा संग्रह करण्याचा छंद, मी १९६३ सालापासून जोपासला आहे. मराठी आडनावांच्या नवलकथा या मथळ्याखाली मी अनेक लेख लिहिले आहेत, भाषणं दिली आहेत आणि टीव्हीवर मुलाखतीदेखील दिल्या आहेत.

प्रमाण नगण्य असलं तरी खटकणारी आडनावंही बरीच आहेत. गाढवे, कुत्रे, कुत्ते, ढेकणे, पिसाट, आगलावे, माणूसमारे, चाटुफळे, किरकिरे, कुरकुरे, बोबडे, बोंबले, भामटे, लुगडे, लंगोटे,..

असे शेकडो.

अशी आडनावं धारण करून लेकीसुना, विद्यार्थी, मुलंमुली, समाजात वावरताना किती मनस्ताप सहन करीत असतील याची कल्पनाच करवत नाही.

माणसाला जन्मतःच सहा बाबी मिळतात. नाव, आडनाव, मातृभाषा, धर्म, ज्या देशात जन्म झाला त्या देशाचं नागरिकत्व आणि ज्या कुलात जन्म झाला त्या कुलाकडून मिळालेलं आनुवंशिक तत्व. यातील नाव, आडनाव आणि धर्म बदलता येणं शक्य आहे. नागरिकत्वही बदलता येतं पण मूळ देशाचा शिक्का कपाळावर असतोच. कोणतीही व्यक्ती १८ वर्षांची झाली की तिला या तीन बाबी कायदेशीररित्या बदलण्याची मुभा असावी असं मला वाटतं.

खटकणारी मराठी आडनावं बदलून घेतली तर पुढच्या पिढ्यातील मुलामुलींना मनस्ताप सहन करावा लागणार नाही. चांगलं आडनाव असण्याचे किती फायदे असतात याची जाणीव, खटकणारी आडनावं धारण करणाऱ्या व्यक्तींनाच असू शकते.

— गजानन वामनाचार्य

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..