नवीन लेखन...

काव्यातील गुरु

एकलव्यापरीं शिकलो विद्या,  गुरुद्रोणा विणा  ।

काव्यामधल्या जाणून घेतल्या,  साऱ्या खाणाखुणा  ।।  १

 

शोधू लागलो प्रथम गुरुला,  पद्य रचनेसाठीं  ।

कुणी न शिकवी कला श्रेष्ठ ही,  राहून माझे पाठी  ।।  २

 

उठत होती भाव तरंगे,   अन आकाशी भिडती  ।

शब्दांनी परि पकड न येता,  निष्टूनी ती जाती  ।।  ३

 

मार्गदर्शक तो भेटत नाही,  खंत लागे मना आता  ।

व्याकूळ झाला जीव बघूनी,  मनाची ही दुर्बलता  ।।  ४

 

गोविंदाग्रज नि केशवसूत,  आणिक ग.दि.मा.  ।

तांबे- बोरकर- यशवंत,   सर्वजण आले कामा  ।। ५

 

ग्रंथ तयांचे सारे जमवूनीं,  एकत्र ठेवियले  ।

शब्द भावना यांची सांगड,  मन करुं लागले  ।।  ५

 

द्रोण मुर्तिपरी भासूं लागली,  त्यांची ग्रंथ संपदा  ।

काव्यामधली स्फूर्ति मिळूनी,  आनंदी झालो सदा  ।।  ६

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..